27 January 2025 1:57 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर 42 टक्क्यांनी घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा इशारा, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: SUZLON IREDA Share Price | इरेडा शेअर मालामाल करणार, आयसीआयसीआय ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA EPFO Certificate Alert | पगारदारांनो तुमच्या पगारातून EPF कापला जातोय, हे 'प्रमाणपत्र' घेतलं का, अन्यथा अडचणीत सापडाल Yes Bank Share Price | येस बँक शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: YESBANK Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर घसरतोय, पण ब्रोकरेज फर्म बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN Shark Tank India | 'इससे अच्छा तो ठेला लगा लो', शार्क टँक सीझन 4 मध्ये अनुपम मित्तलने स्पर्धकांचा अपमान का केला IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, मजबूत कमाईची संधी सोडू नका
x

BLOG : खरंच जगणे कठीण आहे ?

Blog, Life, Difficult Life

राम तसा दहावीला खूप हुशार होता, बोर्डात आला होता. घरची कामं करत करत रामने हा पराक्रम केला होता. घरची परिस्थिती बेताचीच आईवडील शेतमजुरी करायचे. पुढे रामने परिस्थिती पाहून शिक्षणाला रामराम ठोकायचा निर्णय घेतला आणि एका सावकाराच्या दुकानात कामाला लागला. रामचे आईवडील व नातेवाईक समाधानी झाले चला मुलगा कमवता झाला. सावकारही रामला कवडीमोल देऊन त्याच्याकडून भरपूर कामं करवून घ्यायचा. कालांतराने रामला हेच रोजचे रटाळ थोड्याफार पैश्यांसाठी लोकांसाठी जगणे चांगले वाटू लागले. त्याच्यातील कल्पकता संपुष्टात येत होती, नवीन काहीतरी शिकण्याची जिज्ञासा लोप पावत होती. स्वतंत्र जीवन जगण्याच्या इच्छाशक्तीचा ऱ्हास होत होता. जगण्यातील स्वाभिमानाला तर मरगळ अली होती. राम सावकाराच्या कवडीमोल पैश्याच्या, आईवडिलांच्या अपेक्षांच्या ओझ्याच्या आणि समाजातील थोतांड, दिखाऊ आणि अनावश्यक प्रतिष्ठेच्या भयानक व बाहेर निघण्यासाठी दार नसलेल्या चौकटीत अडकला होता तरी त्याला त्याच्यातच आनंद मानून रोज सावकाराच्या दुकानात जावं लागत असे.

सावकार अनेक वाईट काम करत असे, जसे की गरजवंतांच्या नाईलाजाचा फायदा घेऊन अमाप व्यजदाराने त्यांना पैसे देऊ करणे आणि त्यांची पिळवणूक करणे. दुकानातील वस्तू मोजमापाच्या प्रमाणात घोळ करणे, अतिशय दुय्यम दर्जाच्या वस्तू अव्वाच्या सव्वा दराने विकणे, उधारीच्या चाराचे पाच करणे, अन्न धान्यात व इतर वस्तूंमध्ये भेसळ करणे इतके सगळे वाईट कामं करण्यात रामचाही सहकार्य लाभत असे कारण तो तेथे नोकरी करत होता. कधी कधीतरी रामच्या मनात यायचं की सावकार जे करता ते चुकीचं करत आहेत. राम कडून त्याच्या आईवडिलांनाही सावकारांच्या सर्व अमानवीय आणि अवैध कृत्यांची माहिती मिळत असे. राम एखाद्या वेळेस म्हणायचं सावकाराच्या विरुद्ध तक्रार करायची काय ? आई वडील म्हणायचे जाऊदे मरु दे आपल्याला काय करायचं ? असे काहीतरी त्यांना समजलं की ते तुला नोकरीवरून काढतील आणि आपलं जे व्यवस्थित चालंय ते खोळंबेल म्हणून गप्प राहिलेलं बर.

राम आणि त्याच्या आईवडिलांप्रमाणेच देशातील सर्वांची समज झाली आहे आणि हे समाजाच्या आणि देशाच्या सर्वांगीण विकासाला खूप हानिकारक आहे. जो तो फक्त आपलं आणि आपलंच हित पाहतो आहे. आपल्या समोर जे अवैध आणि अनैतिक घडत असते एक तर ते निमूटपणे पाहणे, सहन करेन आणि दुर्लक्ष करणे याची सर्वांना सवयंच झाली आहे. कुणालाही वाटत नाही की अशी अनैतिक आणि अवैध कृत्ये कायमचे संपायला पाहिजे, कडाडून त्याचा विरोध करायला पाहिजे. मग कोणीही त्याला कायदेशीर विरोध करत नाहीत आणि जे एखादे विरोध करायचा प्रयत्न करतात त्यांना इतरांची साथ मिळत हे पाहून अशी कृत्ये करणाऱ्या सर्व अमानवीय शक्तींना बळ मिळतो व सर्वसामान्यांची जास्तच अर्थिक, सामाजिक, मानसकी कोंडी व्हायला सुरुवात होत असते.

आजच्या कोणत्याही सरकारी कार्यालयात अशीच कृत्ये घडताना पहायला मिळतात. अगदी खालच्या स्तरापासून म्हणजे शिपाई पासून ते अगदी वरच्या म्हणजे त्या त्या विभागाच्या/मंत्रालयाच्या सचिवांपर्यंत सर्वांच्या भ्रष्टाचाराच्या रोपांना सर्वसामान्य जनतेने सतत खत पाणी टाकून खूप मोठी करून सोडली आहेत. अतिरिक्त पैसे खर्च न करता आज आपल्या देशात कुणाचेही दहा पैश्याचा काम होत नाही याबद्दल कोणाचेही दुमत नसले पाहिजे. सर्वांना कळतंय हे चुकीचे आहे पण वळत मात्र नाही कारण त्यांना स्वतःची कामं करून घेणे महत्वाचे वाटते. भ्रष्टाचाराचा सुत्रच असा झालाय की जिथे जिथे सरकार तिथे तिथे भ्रष्टाचार. जो पर्यंत हे सर्वसामान्य जनता आपल्या स्वतःच्या स्वार्थीपणाच्या चौकटीतून बाहेर पडून भ्रष्टाचार करणाऱ्या कर्मचारी किंवा अधिकाऱ्यांविरुद्ध कायदेशीर रित्या आवाज उठवत नाहीत तो पर्यंत हे भ्रष्टाराचा घातक रोग बरा होणार नाही. ते विचार करता की, मी जर या संबंधित अधिकाऱ्यांची कुठे तक्रार केली तर माझे काम होणार नाही या चिंतेत ते भ्रष्टाचाराला प्रोत्साहन देतात.

राजकीय पक्ष, मंत्रालये आणि मंत्रिमंडळातही याच बाबी सर्रास पहायला मिळतात. मी काही बोललो तर माझे वरिष्ठ नेते, अधिकारी नाराज होतील माझ्यावर काही कारवाई करतील माझा यात मोठा नुकसान होईल. त्यापेक्षा काही न करता गप्प मूग गिळून बसलो तर काय हरकत? आपल्याला काय करायचं आहे? आपलं सर्व सुरू आहे ना व्यवस्थित (काहीही ठीक नसताना सुद्धा) मग गप्प राहायचं हीच शिकवण घरातून आणि समाजातून दिले जते. एखाद्याला हे सर्व बदलायचं असतं पण ज्यांच्यासाठी हे करायचं असतं त्यांचीच साथ मिळत नाही. सकाळ पासून संध्याकाळपर्यंत फक्त स्वतःचेच आयुष्य जगण्यात व्यस्थ झालेला नागरिक आपल्या स्वतःच्या स्वार्थी आयुष्याच्या चौकटीतून बाहेर आले पाहिजे. भारतीय संविधानाने व सरकारने दिलेले सर्व कायदेशीर हक्क, अधिकार गाजवले पाहिजे, जबाबदऱ्यांचे निष्पक्ष निस्वार्थपणे पालन केले पाहिजे. जगण्याला प्रश्न न समजता वरदान म्हणून  जगले पाहिजे. जगण्यासठी व स्वतःच्या स्वार्थासाठी इतरांच्या, शारीरिक, मानसिक आणि वैचारिक गुलामीच्या चौकटीतून मुक्त होण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि स्वाभिमानाने जगले पाहिजे मग पहा जगणे कसे अगदी सहज व सोपे होईल.

लेखक – शिवाजी बळीराम जाधव
Mobile – ७५८८२१०१४३

हॅशटॅग्स

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x