असे अनेक प्रसिद्ध लोक आहेत | जे आता पुन्हा सन्मान मिळवू शकणार नाहीत - सोनू सूद
मुंबई, १७ सप्टेंबर : कंगना रानौत सध्या लहान मोठ्यांपासून सर्वांनाच लक्ष करून अत्यंत संतापजनक ट्विट करत आहे. बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत हिने अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हिच्यावर आता निशाणा साधला आहे. उर्मिलाला स्पॉट पॉर्न स्टार म्हणत कंगना हिने तिच्या अभिनय कौशल्यावर देखील प्रश्न उपस्थित केला. त्यानंतर कंगना रनौत हिने तिच्या टीकेला सडेतोड उत्तर दिले. एक सुंदर विचार शेअर करत तिने ‘शिवाजी महाराज अमर रहें’ असे म्हटले आहे. तसंच ‘जय महाराष्ट्र, जय हिंद’चा ही नारा तिने दिला.
दुसरीकडे जया बच्चन यांची खिल्ली उडवताना कंगनाने थेट अभिषेक बच्चन आणि श्वेता नंदा या त्यांच्या दोन्ही मुलांचा उल्लेख केला आणि वाद अधिक कसा वाढेल याची काळजी घेतल्याचं पाहायला मिळत आहे.
दरम्यान सोनू सूद नेहमीच सोशल मीडियावर अॅक्टिव राहतो. त्याने नुकतंच एक असं ट्विट केलंय ज्यावरून अंदाज लावला जातोय की, त्याने नाव घेतला कंगनाला टार्गेट केलंय. सोनू सूदने त्याच्या ट्विटमध्ये लिहिले की, ‘सन्मान मिळवण्यासाठी समोर या. केवळ प्रसिद्ध होण्यासाठी नाही. असे अनेक प्रसिद्ध लोक आहेत जे आता कधीच सन्मान मिळवू शकणार नाहीत’.
इज़्ज़त कमाने निकलना।
मशहूर होने नहीं।
मशहूर तो बहुत से लोग हैं
जो अब कभी इज़्ज़त नहीं कमा पाएँगे।— sonu sood (@SonuSood) September 16, 2020
कंगना रणौत गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या वक्तव्यांमुळे चर्चेत आहे. जया बच्चन यांना टार्गेट केल्यावर कंगनाला अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींच्या टिकेचा सामना करावा लागत आहे. अशात असं मानलं जात आहे की, सोनूने हे ट्विट नाव न घेता कंगनाला टार्गेट करण्यासाठी केलंय.
दरम्यान जेव्हा कंगना रणौतने मुंबईची तुलना पीओकेसोबत केली होती तेव्हाही सोनू सूदने ट्विट केलं होतं. त्याने लिहिलं होतं की, ”मुंबई…हे शहर नशीब बदलतं. सलाम कराल तर सलामी मिळेल’.
सोनू सूद आधी कंगनाचा सिनेमा ‘मर्णिकर्णिका’मध्ये काम करत होता. त्याने ४५ दिवसांचं शूटींगही पूर्ण केलं होतं. पण नंतर कंगना दिग्दर्शनची कमान स्वत: हाती घेतल्यावर सोनूने सिनेमा सोडला. नंतर कंगनाने सोनूवर आरोप लावला होता की, त्याला एका महिलेच्या दिग्दर्शनाखील काम कराचयं नव्हतं. म्हणून त्याने सिनेमा सोडला.
News English Summary: Sonu Sood is quite active on social media and loves to express his views on various ongoing issues. Today, the actor shared some wise words on Twitter. He wrote, “Step out to earn respect. Not to be famous. There are many famous people who will never earn respect now.”
News English Title: Actor Sonu Sood target Kangana Ranaut indirectly in his tweet Marathi News LIVE latest updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- Health Insurance Premium | हेल्थ इंश्योरेंसचा प्रीमियम कमी करायचा असेल तर करा केवळ 'हे' एक काम; मोठी बचत होईल
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, स्टॉक मालामाल करणार, मोठा परतावा मिळणार - NSE: TATAPOWER
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- 5 Star Rating Cars | 10 लाखांपेक्षा कमी किंमतीच्या 5 स्टार रेटिंग कार खरेदी करण्याचं स्वप्न पाहत आहात, मग इथे लक्ष द्या
- Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन
- EPF Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला EPFO ची जास्तीत जास्त किती पेन्शन मिळेल; अर्ली पेन्शन नियम काय सांगतो
- Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांसाठी खास सरकारी स्कीम, महिना कमवाल 20,000 रुपये, जबरदस्त फायद्याची योजना
- Top Mutual Fund | शेअर्स नको, मग या टॉप 15 म्युच्युअल फंडांच्या SIP मध्ये पैसे गुंतवावा, दरवर्षी 64 टक्क्याने पैसा वाढवा