न्यायालयाने समज देऊनही पुन्हा ट्विट | म्हणाली या सरकारपेक्षा बॉलीवूड माफिया, हृतिक रोशन बरे
मुंबई, २८ नोव्हेंबर: बॉलिवूडची अभिनेत्री कंगना रनौतच्या कार्यालयावर (Bollywood Actress Kangana Ranaut Mumbai Office) मुंबई महापालिकने अनधिकृत असल्याचा ठपका ठेऊन कारवाई केली होती. मात्र, मुंबई हायकोर्टाने मुंबई पालिकेची कारवाई अवैध असल्याचा म्हणत पालिकेचा जोरदार दणका दिला होता. कार्यालयावरील तोडकाम प्रकरणाची कंगनाने मुंबई हायकोर्टात (Mumbai High Court) याचिका दाखल केली होती. काल कोर्टाने या याचिकेवर आपला निकाल दिला होता. कंगना रणौतच्या बंगल्यावर केलेली महापालिकेची कारवाई मुंबई हायकोर्टाने अवैध ठरवली आहे.
त्याचवेळी दुसरीकडे कंगनालाही व्यक्ती आणि ठाकरे सरकारविरोधात टीका करण्यास बजावले आहे. कंगना रनौतच्या कार्यालयावर मुंबई पालिकेनं तोडकाम केले होते. या प्रकरणी मुंबई हायकोर्टात सुनावणी पार पडली होती. यावेळी न्यायाधीश शाहरुख काथावाला व न्यायाधील रियाझ छागला यांनी कंगनाची सुद्धा कानउघडणी केली होती.
‘मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी करणे, व्यक्तींविरोधात आक्षेपार्ह विधाने करणे, सरकारच्या विरोधात विधाने करणे या कंगनाच्या कृतीला हायकोर्ट मान्यता देत नाही. त्याच्याशी हायकोर्ट सहमत नाही. कंगनाने भविष्यात असे ट्विट करण्यापासून स्वतःला रोखावे’ अशी शब्दांत हायकोर्टाने कंगनाला समज दिला होती. मात्र कंगनाने न्यायालयाने दिलेल्या समजकडे पूर्ण दुर्लक्ष केल्याचं पाहायला मिळत आहे.
कंगनाने ट्वीट करत म्हटलं की, गेल्या काही महिन्यात मी महाराष्ट्र सरकारकडून एवढे कायदेशीर खटले, शिव्या, अपमान सहन केला आहे की आता मला बॉलिवूड माफिया, आदित्य पांचोली आणि हृतिक रोशनसारखे लोक चांगले वाटू लागले आहेत. मला माहीत नाही की माझ्यात असं काय आहे की ज्याचा लोकांना इतका राग येतो.
News English Summary: Kangana tweeted that in the last few months, I have endured so many legal cases, insults, insults from the Maharashtra government that now I feel good about people like Bollywood Mafia, Aditya Pancholi and Hrithik Roshan. I don’t know what is in me that makes people so angry.
News English Title: Actress Kangana Ranaut compare State government with Aaditya Pancholi and Hrithik Roshan news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा
- Bank Account Alert | कमी पगारात सुद्धा तुमच्या बँक खात्यात पैसा टिकेल आणि वाढेल सुद्धा, 'या' 5 टिप्स फॉलो करा
- NBCC Share Price | पीएसयू NBCC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मिळेल मजबूत परतावा - NSE: NBCC
- Infosys Share Price | इन्फोसिस शेअरमध्ये तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: INFY
- RVNL Share Price | आरव्हीएनएल कंपनीबाबत फायद्याची अपडेट, बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार शेअर - NSE: RVNL
- Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: JIOFIN
- Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांना दर महिन्याला 20,000 रुपये मिळतील, ही सरकारी योजना ठरेल खूप फायद्याची
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, स्टॉक मालामाल करणार - NSE: RELIANCE
- PPF Investment Formula | PPF मध्ये फक्त पैसे गुंतवू नका, या फॉर्म्युल्याने PPF बचत करा, मिळेल करोडमध्ये परतावा
- Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा इशारा, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: SUZLON