23 February 2025 12:00 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Home Loan EMI | एसबीआय गृहकर्जाचे व्याजदर घटले, EMI मध्ये दरमहा इतकी बचत होऊन लाखोंचा फायदा होणार Gratuity on Salary | प्रायव्हेट नोकरदारांसाठी खुशखबर, ग्रॅच्युइटी एकूण 3,46,154 रुपयांची रक्कम खात्यात जमा होणार EPFO Money Alert | खासगी नोकरी करणाऱ्यांच्या खात्यात EPF चे 1,01,29,237 रुपये जमा होणार, तुमचा महिना पगार किती Personal Loan EMI | 'या' कामांसाठी पर्सनल लोन घेत असाल तर वेळीच थांबा, होतील गंभीर परिणाम, इथे जाणून घ्या माहिती SBI FD Interest Rate | 'या' बँका FD गुंतवणुकीवर उत्तम व्याज देत आहेत, 4 ते 6 लाखांच्या FD वर किती परतावा मिळेल पहा Home Loan Interest Rate | पगारदारांनो, 'या' बँका देत आहेत सर्वाधिक स्वस्त गृहकर्ज, घराची स्वप्नपूर्ती साकार होणार Horoscope Today | रविवार 23 फेब्रुवारी, कसा असेल 12 राशींच्या लोकांचा रविवार, तुमचे राशी भविष्य जाणून घ्या
x

पायल घोषचा RPI'मध्ये प्रवेश | २०१४ मध्ये राखी सावंतने केला होता प्रवेश

Actress Payal Ghosh, joins RPI, Union Minister Ramdas Athawale

मुंबई, २६ ऑक्टोबर: दिग्दर्शक अनुराग कश्यपविरोधात लैंगिक छळवणुकीची तक्रार केल्यामुळं चर्चेत असलेली बॉलिवूड अभिनेत्री पायल घोष हिनं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियामध्ये प्रवेश केला आहे. आरपीआयचे अध्यक्ष तथा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या उपस्थितीत पायलनं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा झेंडा हाती घेतला. २०१४ मध्ये विवादित वक्तव्य करण्यासाठी सर्वश्रुत असलेल्या राखी सावंतने आरपीआयमध्ये प्रवेश केला होता, मात्र त्यानंतर ती राजकारणात टिकलीच नाही.

गेल्या दोन तीन महिन्यांपासून पायल घोष चर्चेत आहे. तिनं दिग्दर्शक अनुराग कश्यपवर लैंगिक शोषण आणि गैरवर्तवणूकीचे आरोप केले आहेत. या प्रकरणी पायलला न्याय मिळावा यासाठी रामदास आठवले यांनी राज्यपाल कोश्यारी यांची देखील भेट घेतली होती. आता पायलनं रिपाइंत प्रवेश करून राजकारणात एन्ट्री घेतली आहे. पायल घोषला रिपाईच्या महिला मोर्चाचं उपाध्यक्ष बनवलं जाऊ शकतं,अशा चर्चाही सध्या सुरू आहेत.

पायल घोषने आपल्या जीवाला धोका असल्याचे सांगत वाय दर्जाची सुरक्षा देण्याची मागणीदेखील यावेळी आठवलेंनी केली होती. रामदास आठवले म्हणाले की, पोलीस तक्रारीनंतर देखील अनुराग कश्यपची अद्याप चौकशी झाली नसून, त्या संदर्भात राज्यपालांना निवेदन देण्यात आले. याआधी काल रामदास आठवले यांनी पत्रकार परिषदेमध्येत पायल घोषच्या पाठिशी रिपब्लिकन पक्ष असल्याचे म्हटले होते. त्यानंतर, पायल घोषणे आज रिपल्बिकन पक्षात प्रवेश केला आहे. दरम्यान, पायल घोषने अनुराग कश्यपविरोधात त्याचार केल्याचे आरोप केले असून, ओशिवरा पोलिसात तक्रार देखील दाखल केली. मात्र, अनुरागवर अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही.

 

News English Summary: Bollywood actor Payal Ghosh on Monday joined Union minister Ramdas Athavale-led Republican Party of India (A). Athawale appointed her vice president of women’s wing of his party. Ghosh was recently in news after she accused filmmaker Anurag Kashyap of sexual harassment. Athawale has been supporting Ghosh and had even taken her to Maharashtra Governor Bhagat Singh Koshiyari demanding justice for her. He has been demanding the arrest of Kashyap.

News English Title: Actress Payal Ghosh joins RPI in the presence of Union Minister Ramdas Athawale News Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Bollywood(88)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x