रिया चक्रवर्तीला एनसीबीकडून अटक | २५ बॉलिवूड सेलिब्रिटी चौकशीसाठी फेऱ्यात अडकणार

मुंबई, ८ सप्टेंबर : सुशांत सिंह राजपूत प्रकरणी एनसीबीकडून अभिनेत्री रिया चक्रवर्तीला अटक करण्यात आली आहे. आज तिसऱ्या दिवशी एनसीबीकडून रियाची चौकशी होत होती. त्यानंतर एनसीबीने रियाला अटक केली. सायंकाळी साडे चार वाजता तिची आरोग्य तपासणी आणि कोव्हिड चाचणी केली जाणार आहे. आज सकाळी 10.30 वाजल्यापासून एनसीबी रियाची चौकशी करत होती. काल आणि परवा तब्बल 13 तास रियाची चौकशी झाली.
मागील दोन दिवसांपासून रियाचीही एनसीबीकडून चौकशी करण्यात आली. मंगळवारचा रियाची चौकशी होण्याचा हा तिसरा दिवस. चौकशीच्या याच सत्रांतून समोर आलेल्या माहितीनुसार आता रियानं एका महत्त्वाच्या गोष्टीची कबुली दिली आहे. आपण BUD ने भरेलली सिगरेट ओढायचो हे तिनं कबुल केल्याचं म्हटलं जात आहे. याचा अर्थ रिया गांजाची सिगरेट ओढत होती. सुशांतसोबत ही सिगरेट ओढत असल्याची कबुली तिनं दिली.
रियाच्या घरातून ताब्यात घेण्यात आलेल्या काही उपकरणांमुळं हा खुलासा होऊ शकता आहे. एनसीबीनं रियाच्य घरातून तिचा जुना मोबाईल फोन, लॅपटॉप, टॅब अशा गोष्टी ताब्यात घेतल्या आहेत. ज्यांच्या फॉरेंसिक चाचणीत ही माहिती समोर आली.
ड्रग्स प्रकरणात एनसीबीने मोठी कारवाई केली आहे. प्रसार माध्यमांना मिळालेल्या माहितीनुसार एनसीबीने डोजियर तयार केले आहे. यात २५ बॉलिवूड कलाकारांची नावे आहेत. हे डोजियर एनसीबी एसआयटीने तयार केले आहे. या यादीमध्ये सेलेबल्सची नावे ए, बी आणि सी प्रकारात समाविष्ट करण्यात आली असून लवकरच एनसीबी बॉलिवूडमधील या कलाकारांना बोलवणार आहे. रिया-शोविक, ड्रग्ज पॅडलर आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणांची तपासणी केल्यानंतर ही यादी तयार केली गेली आहे, अशी माहिती आज तकने दिली आहे.
News English Summary: The process of Rhea Chakraborty’s arrest by the Narcotics Control Bureau (NCB) is underway after three days of questioning in connection with drugs-related allegations in the Sushant Singh Rajput case. The 28-year-old actor, named as an accused in the CBI investigation into Sushant Singh Rajput’s death on June 14, had denied consuming drugs. Her brother Showik was arrested last week.
News English Title: Actress Rhea Chakraborty arrested by NCB Marathi News LIVE latest updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
RVNL Share Price | आज शेअर कोसळला, पण लॉन्ग टर्ममध्ये आहे प्रचंड फायद्याचा, ही असेल टार्गेट प्राईस - NSE: RVNL
-
IRFC Share Price | पीएसयू शेअरने 1 महिन्यात 9.37 टक्के परतावा दिला, ही आहे पुढीची टार्गेट प्राईस - NSE: IRFC
-
IRB Infra Share Price | इन्फ्रा कंपनी शेअर फोकसमध्ये, टार्गेट प्राईस अपडेट, यापूर्वी 808 टक्के परतावा दिला - NSE: IRB
-
Vodafone Idea Share Price | थेट शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक रेटिंग डाऊनग्रेड, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
IRB Infra Share Price | शेअर प्राईस 43 रुपये, आयआरबी इन्फ्रा कंपनी शेअरला SELL रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB
-
Jio Finance Share Price | शेअर्स रेटिंग अपडेट; जिओ फायनान्शिअ शेअर ठरेल फायद्याचा, सकारात्मक अपडेट - NSE: JIOFIN
-
RVNL Share Price | मल्टिबॅगर आरव्हीएनएल शेअर्स BUY, SELL की HOLD करावा? तज्ज्ञांकडून फायद्याचा सल्ला - NSE: RVNL