क्रिकेटपटूंच्या पत्नी, स्टार्स ड्रग्जचे सेवन करतात | शर्लिन चोप्राचा मोठा गौप्यस्फोट
मुंबई, २४ सप्टेंबर: अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूच्या तपासादरम्यान बॉलिवूडमधील ड्रग्ज कनेक्शन समोर आलं. त्यानंतर सध्या बॉलिवूडमध्ये ड्रग्ज कनेक्शनबाबत जोरदार चर्चा सुरू आहे. एनसीबीने रिया चक्रवर्ती, ड्रग पेडलर्ससह अन्य जणांना अटक केली आहे. सांगितले जात आहे की अमली पदार्थ नियंत्रण ब्यूरोच्या (NCB) रडारवर कमीत कमी 50 हून अधिक सेलिब्रिटी आहेत. यामध्ये बड्या निर्मात्यांबरोबरच दिग्दर्शकांचाही समावेश आहे. अमली पदार्थाबाबत तपास करीत असलेल्या एनसीबीने अभिनेत्री दीपिका पादुकोनसह श्रद्धा कपूर, सारा अली खान, रकुल प्रीत सिंह आणि अन्य जणांचा चौकशीसाठी समन्स पाठविला आहे. एका अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे.
दरम्यान, बॉलिवूडनंतर आता क्रिकेट वर्तुळावर ड्रग्ज सेवनाचा आरोप होत आहे. पार्ट्यांमध्ये बॉलिवूड स्टार्स, क्रिकेटपटूंच्या पत्नी ड्रग्जचे सेवन करतात, असा धक्कादायक खुलासा बॉलिवूड अभिनेत्री शर्लिन चोप्राने केला आहे. अनेक मोठ्या पार्ट्यांमध्ये बॉलिवूड स्टार्स आणि क्रिकेटपटूंच्या पत्नी ड्रग्ज घेतात. बॉलिवूड स्टार्सच्या पत्नीही ड्रग्जचे सेवन करताना स्वत: मी पाहिले आहे, असेही शर्लिनने म्हटले आहे. ती एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होती.
बॉलिवूड इंडस्ट्रीतील काही जण स्टार्स आणि क्रिकेट विश्वातील काही जण ड्रग्ज घेत असल्याची कबुली शर्लिनने दिली आहे. कोण ड्रग्ज घेत होतं, याची माहिती मी एनसीबीला देईन, असेही ती म्हणाली.
शर्लिन म्हणाली, केकेआरची मॅच पाहायला मी कोलकाता येथे गेले होते. मॅचनंतर आफ्टर मॅच पार्टीचे आयोजन करण्यात आलं होतं. त्या पार्टीमध्ये मी पाहिलं की, क्रिकेटर्स, बॉलिवूडचे काही सेलेब्स ड्रग्जचे सेवन करत होते. तेथे सर्वांसोबत मी डान्स आणि मस्ती केली. मी डान्स करता करता खूप थकले होते. तेव्हा मी फ्रेश होण्यासाठी वॉशरूममध्ये गेले. तेथे जे सुरू होतं ते पाहून मला खूप आश्चर्य वाटलं. आमच्या क्रिकेट सुपरस्टार्सच्या पत्नी कोकिन स्नॉट करत होते. मला पाहून त्यांनी स्माईल केली. मीदेखील स्माईल केली आणि तेथून निघाले. मला वाटलं की, मी चुकीच्या ठिकाणी आले आहे. त्यानंतर मी पाहिलं की, सर्व जणांच्या गप्पा रंगल्या होत्या. पार्टी करत होते. काही क्रिकेट्सच्या गर्लफ्रेंड्सदेखील ड्रग्ज घेत होत्या. एकानंतर एक अशा पार्ट्या होत राहतात.”
शर्लिनने अप्रत्यक्षपणे किंग खान आणि अभिनेत्री दीपिका पादुकोणवर निशाणा साधला. बॉलिवूडमध्ये ज्या मोठ्या पार्ट्या असतात, तेथे ड्रग्जचे सेवन होते. कोण कोण ड्रग घेत, हे सर्वांना माहिती आहे. किंग खान काय सेवन करतात, कसे आहेत हे सर्वांनाच माहिती आहे. ड्रग्जच्या सेवनामुळे अभिनेत्री दीपिका पादुकोण डिप्रेशनमध्ये गेली होती, असा गंभीर आरोप शर्लिनने या स्टार्सवर केला होता. मात्र, शर्लिनने कुठल्याही क्रिकेटर किंवा त्यांच्या पत्नीच्या नावाचा उल्लेख केला नाही.
News English Summary: “The wives of cricketers were snorting white powder i.e. cocaine. Seeing this I wondered why they are doing this then smiled at me. Then I smiled back at them and I left from there. I felt that I had come to the wrong place. After that, I saw that all of them are gossiping, partying,” Sherlyn Chopra said.
News English Title: Actress Sherlyn Chopra big revealed about cricketers wife consumes drugs in party Marathi News LIVE latest updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- Health Insurance Premium | हेल्थ इंश्योरेंसचा प्रीमियम कमी करायचा असेल तर करा केवळ 'हे' एक काम; मोठी बचत होईल
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, स्टॉक मालामाल करणार, मोठा परतावा मिळणार - NSE: TATAPOWER
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन
- 5 Star Rating Cars | 10 लाखांपेक्षा कमी किंमतीच्या 5 स्टार रेटिंग कार खरेदी करण्याचं स्वप्न पाहत आहात, मग इथे लक्ष द्या
- EPF Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला EPFO ची जास्तीत जास्त किती पेन्शन मिळेल; अर्ली पेन्शन नियम काय सांगतो