24 November 2024 3:48 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Multibagger Stocks | पैशाचा पाऊस पाडतोय हा मल्टिबॅगर शेअर, तब्बल 4300% परतावा दिला, फायद्याची अपडेट - BOM: 543620 IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Sarkari Schemes | गुंतवणुकीसाठी 3 फायद्याच्या सरकारी योजना, सरकार देईल 8.2% पर्यंत परतावा, माहिती जाणून घ्या - Marathi News SBI Online | सरकारी SBI बँकेची जबरदस्त योजना, 50,000 रुपयांची गुंतवणूक देईल 13 लाखांपर्यंत परतावा - Marathi News 8th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर, नव्या वर्षात पगारात 186 टक्क्यांनी वाढ होणार, अपडेट जाणून घ्या Penny Stocks | 10 रुपयाचा शेअर श्रीमंत करणार, 6 महिन्यात 116% परतावा दिला, संधी सोडू नका - BSE: 540259 Apollo Micro Systems Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट - NSE: APOLLO
x

एम्स समितीचे प्रमुख डॉ. गुप्तांविरोधात कपोकल्पित वृत्त सुरु | ऑडिओ क्लिपचा आधार?

AIIMS doctor Sudhir Gupta, Audio tape, Sushant Singh Rajput, Suicide theory

मुंबई, ५ ऑक्टोबर : काही दिवसांपूर्वीच एम्सने सुशांतच्या हत्येची थिएरी नाकारली. सुशांतने आत्महत्याच केली असा रिपोर्ट एम्सच्या समितीने सीबीआयला सुपूर्द केला आहे. मात्र सदर रिपोर्टवरून अचानक आक्रमक झालेले भाजपचे नेते आणि त्यांची सुशांतच्या कुटुंबीयांप्रती उफाळून आलेली माणुसकीची भावना आणि त्याचवेळी रिपब्लिक टीव्हीने सुरु केलेली ऑडिओ क्लिपची ओरड यांचा अचूक ताळमेळ लागला आहे.

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणाला आता पुन्हा वेगळं वळण देण्यास सुरुवात केली आहे. सुशांतने आत्महत्या केली असा रिपोर्ट देणाऱ्या एम्सच्या (AIIMS) डॉक्टरांची ऑडिओ क्लिप लीक झाल्याच्या बातम्या पेरण्यास सुरुवात झाली आहे. सदर क्लिपमध्ये सुशांतची हत्या झाली असं सांगितलं जातं आहे. ही ऑडिओ क्लिप एम्सचे डॉ. सुधीर गुप्ता (Dr Sudhir Gupta) यांची असल्याची देखील बातमी पसरवली जाते आहे. म्हणजे कूपरच्या डॉक्टरांवर दाखवलेला संशय कामी न आल्याने, फॉरेन्सिक रिपोर्टचा अहवाल देणाऱ्या एम्सच्या समितीचे डॉ. सुधीर गुप्ता प्रमुख असल्याने त्यांना संशयाच्या फेऱ्यात ओढलं आहे.

सुशांतच्या फॉरेन्सिक रिपोर्टचा अहवाल देणाऱ्या एम्सच्या समितीचे डॉ. सुधीर गुप्ता प्रमुख आहेत. टाइम्स नाऊने देखील सुधीर गुप्ता यांची ऑडिओ क्लिप आपल्या हाती लागल्याचा दावा केला आहे. यामध्ये डॉ. सुधीर गुप्ता म्हणाले, जेव्हा सर्वात आधी फोटो आपल्यासमोर आले तेव्हा ते पाहून सुशांतची हत्या झाली होती असंच वाटतं. ही ऑडिओ टेप सुशांतचा फोटो पाहिल्यानंतरची असल्याचं सांगितलं जातं आहे, मात्र तपासानंतर ही हत्या नसून आत्महत्या असल्याचं सांगण्यात आलं आहे आणि त्यानंतर ही ऑडिओ क्लिप समोर आणण्यात आली आहे ज्याला कोणताही आधार नाही.

विशेष म्हणजे आता एम्सच्या रिपोर्टबाबत सुशांतचं कुटुंबही समाधानी नाही. आता ही ऑडिओ क्लिप समोर आल्यानंतर याबाबत सुशांतच्या कुटुंबाने स्पष्टीकरण मागितलं आहे. ऑडिओ क्लिपला कोणताही तांत्रिक आधार नसतो आणि त्याचा फायदा घेत कपोकल्पित वृत्त पसरविण्यास सुरुवात झाली आहे. मात्र कायद्याच्या भाषेत तज्ज्ञ डॉक्टरांच्या समितीने अहवालात लेखी स्वरूपात काय लिहिलं आहे तेच अंतिम असतं आणि याची जाणीव या प्रसार माध्यमांना नसल्याचं दिसतं.

विशेष म्हणजे सदर वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर भाजपचे राज्यातील नेते देखील प्रसार माध्यमांच्या समोर येण्यास सुरुवात झाली आहे. सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणाचा तपास अद्याप पूर्ण झालेला नाही. असं असताना राज्य सरकारला निष्कर्ष काढण्याची एवढी घाई का झाली आहे?, सुशांतच्या कुटुंबीयांचा वारंवार अवमान केला जात असून शिवसेना नेत्यांनाही झालंय तरी काय?, असा सवाल करतानाच कदाचित शिवसेना नेत्यांना आत्मसाक्षात्काराचा आशीर्वाद प्राप्त झाला असावा, असा टोला भाजपचे आमदार राम कदम यांनी शिवसेनेला लगावला आहे.

अभिनेता सुशांतसिंह राजपूतची हत्या झाली नसून त्याने आत्महत्या केली असल्याचा अहवाल एम्सने दिला आहे. हा अहवाल आल्यानंतर शिवसेनेने भाजपवर टीका केली होती. आजही दैनिक ‘सामना’च्या अग्रलेखातूनही भाजपवर टीकास्त्र सोडण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर राम कदम यांनी शिवसेना आणि राज्य सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. सुशांतसिंग आणि त्यांच्या कुटुंबीयांचा अपमान करण्याचा सामना आणि महाराष्ट्र सरकारने जणू विडाच उचलला आहे. शिवसेना नेत्यांना काय झालं माहीत नाही. कदाचित त्यांना आत्मसाक्षातकाराचा आशीर्वाद प्राप्त झाला असावा, अशी टीका राम कदम यांनी केली आहे.

 

News English Summary: After the All India Institute of Medical Sciences (AIIMS) Forensic Medical Board ruled out the murder angle in Sushant Singh Rajput’s death in its report, a leaked audio tape of Dr. Sudhir Gupta has been accessed where he claimed that the late actor was ‘murdered’. Times Now has reported that a leaked audiotape has AIIMS chief Dr Gupta claiming that Sushant didn’t die by suicide but he was murdered. According to reports, he had made this statement after looking at the pictures of Sushant’s mortal remains. Sushant’s family is now demanding for a fresh forensic investigation.

News English Title: AIIMS doctor Sudhir Guptas audio tape saying Sushant Singh Rajput was murdered raises doubts over suicide theory Marathi News LIVE latest updates.

हॅशटॅग्स

#SushantSinghRajput(113)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x