नारायण राणेंच्या दाव्याला प्रत्यक्षदर्शीचा दुजोरा | पार्टीत दिशावर सामूहिक बलात्कार झाला
मुंबई, १९ सप्टेंबर : अभिनेता सुशांत सिंह राजपूतची एक्स मॅनेजर दिशा सालियन हिच्या मृत्यूप्रकरणी एका प्रत्यक्षदर्शीने मोठा खुलासा केला आहे. दिशाच्या मृत्यूच्या दिवशी पार्टीमध्ये तिच्यावर सामूहिक बलात्कार झाल्याचा खुलासा प्रत्यक्षदर्शीने ‘न्यूज नेशन’ या वृत्तवाहिनीकडे केला. त्या पार्टीमध्ये बॉलिवूडमधला एक स्टारसुद्धा उपस्थित होता, असंही त्याने सांगितलं.
“पार्टीमध्ये एकूण सहा जण उपस्थित होते. दिशाचा होणारा पती रोहन रॉयसुद्धा उपस्थित होता. चार जणांनी मिळून दिशावर बलात्कार केला. दिशाचा आवाज बाहेर ऐकू जाऊ नये म्हणून मोठ्या आवाजात गाणी लावली होती,” अशी धक्कादायक माहिती प्रत्यक्षदर्शीने दिली.
दिशाचा ८ जून रोजी मुंबईतील एका इमारतीतील चौदाव्या मजल्यावरून पडल्यामुळे मृत्यू झाला. गेल्या महिन्यात दिशाच्या वडिलांनी तक्रार दाखल केल्यानंतर मुंबई पोलिसांनी मृत्यूची चौकशी सुरू केली. दिशाबाबत अफवा पसरवल्या प्रकरणी त्यांनी मालवणी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. दिशाच्या मृत्यूनंतर एका आठवड्यानंतर १४ जून रोजी सुशांतचा मुंबईतील त्याच्या राहत्या घरी मृतदेह आढळला.
तत्पूर्वी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना काय म्हटलं होतं भाजप खासदार नारायण राणे यांनी:
“सुशांत सिंह राजपूतची माजी मॅनेजर दिशा सालियनच्या आत्महत्याची पोलिसांनी चौकशी का केली नाही, माझ्या माहितीनुसार तिने आत्महत्या केली नाही, तर तिची देखील हत्या केली आहे. तिच्यावर बलात्कार करुन तिला मारण्यात आलं आहे. तिच्या गुप्तांगावर जखमा आहेत. त्यामुळे पोलिसांनी त्या दृष्टीने तपास करायला हवा,” असे नारायण राणे म्हणाले होते. “सुशांत सिंह प्रकरणात मुंबई पोलीस कोणाला वाचवतंय,” असा प्रश्नही नारायण राणे यांनी त्यावेळी उपस्थित केला होता.
तसेच ३ दिवसांपूर्वी भाजप आमदार नितेश राणे यांनी दावा केला होता की, “दिशा सालियन आणि सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येचा थेट संबंध आहे. विशेष म्हणजे या संदर्भात आमदार नितेश राणे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहिलं आहे.
8 जून रोजी दिशा सालियान हिनं आत्महत्या केली होती. त्यानंतर 14 जूनला सुशांतनं देखील आत्महत्या केली. त्यामुळे दिशा सालियन आणि सुशांतच्या आत्महत्येचा थेट संबंध असल्याचं नितेश राणे यांनी म्हटलं होतं. 8 जूनला दिशा ज्या पार्टीत होती, तिथे तिच्यासोबत काही चुकीचं झालं होतं. ती तिथून निघाली होती. त्यावेळी तिनं सुशांतला फोनही केला होता. यावेळी दिशासोबत रोहन रॉय हा होता. दिशा इमारतीवरून पडली तेव्हा रोहन रॉय यानं तातडीनं खाली येणं अपेक्षीत होतं. मात्र, तसं झालं नाही. रोहन रॉय हा तब्बल 25 मिनिटांनी खाली आला. त्यामुळे रोहन रॉयची सीबीआय चौकशी होणे गरजेचं आहे असं त्यांनी म्हटलं होतं.
News English Summary: A new sensational fact has come to light in the case of the mysterious death of Disha Salian, the former manager of late actor Sushant Singh Rajput. An eyewitness has told News Nation that Disha Salian was gang-raped by 4 men in the party which she attended on the eve of her death on June 8. The person, who the media house claims was present at the party which the celebrity manager had attended in Juhu, said that Disha’s screams were suppressed behind the blaring music which was being played in the party.
News English Title: An Eyewitness Tells Media That SSR Ex Manager Disha Salian Was Gang Raped By 4 Men In The Party Marathi News LIVE latest updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा
- 15x15x15 Formula | श्रीमंतीचा राजमार्ग, 15x15x15 हा फॉर्म्युला वयाच्या 40 व्या वर्षी बनवेल करोडपती, फायदा जाणून घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोर असेल तरी सुद्धा मिळेल पर्सनल लोन; आता तुमचे काम रखडणार नाही, कसं समजून घ्या
- IRFC Share Price | IRFC शेअर विक्रमी उच्चांकावरून 69 टक्क्यांनी घसरला, आता फायद्याची अपडेट आली - NSE: IRFC
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर मालामाल करणार, मिळेल 57 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: RELIANCE
- BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कंपनीकडून फायद्याची अपडेट - NSE: BEL
- IRFC Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार IRFC शेअर, फायद्याची अपडेट, ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: IRFC
- Personal Loan EMI Calculator | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार किती असावा? अर्ज करण्यापूर्वी अटी जाणून घ्या
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATATECH
- Quant ELSS Tax Saver Fund | गुंतवणूक 10 हजारांची आणि नफा 3 कोटींचा; या फंडांची योजना करोडपती बनवतेय