13 January 2025 8:09 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
EPFO Pension | खाजगी नोकरी करणाऱ्यांनो, 10 वर्ष नोकरी केल्यानंतर तुम्हाला इतकी EPF पेन्शन मिळणार, रक्कम जाणून घ्या WhatsApp Update | चॅटिंगसाठी शेड्युल करा नवे इव्हेंट्स, व्हाट्सअपने आणलं एक अनोखं फीचर, व्हाट्सअप अपडेट तपासून पहा Bank Account Alert | 1 वर्षाची बँक FD, सर्वात जास्त परतावा कोणती बँक देईल, इथे जाणून घ्या योग्य माहिती, पैशाने पैसा वाढवा Property Knowledge | मालमत्ता खरेदी करताना 'हे' एक काम जरूर करा, रजिस्ट्री प्रॉपर्टी खरी आहे की खोटी ओळखायला शिका IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअर 6 महिन्यात 40 टक्क्यांनी घसरला, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: IRFC BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसमध्ये रॉकेट तेजीचे संकेत - NSE: BEL Apollo Micro Systems Share Price | अपोलो मायक्रो सिस्टीम्स शेअर रॉकेट तेजीत, कंपनीबाबत अपडेट नोट करा - NSE: APOLLO
x

Aryan Khan Drugs Case | आर्यन खानचा जामीन पुन्हा फेटाळला

Aryan Khan Drugs Case

मुंबई, २० ऑक्टोबर | बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खान आणि त्यांचा मुलगा आर्यन खानच्या अडचणी कमी होताना दिसत नाहीत. कारण आजही जामीन अर्ज एनडीपीएसच्या विशेष न्यायालयाने फेटाळून लावला आहे. परिणामी शाहरुख खानच्या परिवारात पुन्हा निराशा पसरली आहे. त्यामुळे आर्यनला अजून पुढचे काही दिवस तुरुंगात राहावं लागणार आहे. मुंबईतील एक रॉयल क्रुझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात (Aryan Khan Drugs Case) आर्यन खान तीन ऑक्टोबरपासून एनसीबीच्या कोठडीत आहे.

Aryan Khan Drugs Case. The problems of Bollywood superstar Shah Rukh Khan and his son Aryan Khan do not seem to be diminishing. Even today, the bail application has been rejected by the special court of NDPS. So Aryan will have to stay in jail for the next few days :

शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसह इतर तिघांचाही जामीन अर्ज मुंबईतील विशेष एनडीपीएस न्यायालयाने फेटाळून लावला आहे. दरम्यान, आर्यनची अजून चौकशी करण्यासाठी एनसीबीने त्याची कोठडी वाढवून मागितली होती. आर्यनचा संपूर्ण प्रकरणात समावेश असल्याता धक्कादायक दावा एनसीबीने न्यायालयात केला आहे. त्यामुळे आर्थर रोड तुरुंगातील तिघांचा मुक्काम वाढला आहे. विशेष कोर्टाचे न्यायाधीश व्ही व्ही पाटील यांनी या प्रकरणावर सुनावणी घेतली. मागील गुरुवारी कोर्टात तिन्ही आरोपींच्या जामीन अर्जावरील सुनावणी पूर्ण झाली होती. पण न्यायालयाने आपला निकाल राखून ठेवला होता.

कारागृहातील सुटलेल्या एका कैद्याची माहिती:
कारागृहातील आर्यन खानची ही स्थिती त्याच कारागृहातील आणखी एका कैद्याने सांगितली आहे, जो नुकताच तुरुंगाबाहेर आला आहे. इतर कैद्यांप्रमाणे आर्यन खान तिथे दिलेले कपडे घालत नाही. त्याने तेच कपडे घातले आहेत, जे त्याच्या पालकांनी त्याला घरून पाठवले होते. तो 4500 रुपयांच्या मनीऑर्डरने फक्त पाणी, बिस्किटे आणि चिप्स खरेदी करतो. त्याने असाही दावा केला आहे की, आर्यनला त्याने आणि तुरुंगातील अधिकाऱ्यांकडून अनेक वेळा जेवण खाण्यास सांगितले होते, पण त्याने प्रत्येक वेळी नकारच दिला. तो भूक लागत नाही असे म्हणायचा. तो कैद्यांना पुरवले जाणारे अन्न नक्कीच घेतो, पण इतर कैद्यांना वाटून टाकतो.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचे मत नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही

News Title: Aryan Khan Drugs Case the bail application has been rejected by the special court of NDPS.

हॅशटॅग्स

#Crime Patrol(311)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x