21 November 2024 5:03 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE ICICI Mutual Fund | ICICI चा धमाकेदार फंड पाहिलात का, 5 लाखांचे झाले 3.5 करोड, इथे वाढवा पैशाने पैसा - Marathi News Home Loan Alert | तुम्ही सुद्धा होम लोन घेताय का; थांबा या 5 गोष्टींचा तटस्थपणे विचार करा, फायदा होईल - Marathi News Job Opportunity | तरुणांनो लाखोंच्या घरात पगार घेण्याची वेळ आली; ITBT मध्ये 526 जागांसाठी मेगा भरती सुरू, पटापट अर्ज करा Railway Ticket Booking | तिकीट कॅन्सल करण्याऐवजी ट्रान्सफर करा कॅन्सलेशन चार्जेसपासून वाचाल; पहा नवा नियम काय सांगतो Credit Card Instruction | फालतूचा खर्च थांबवण्यासाठी क्रेडिट कार्ड बंद करत आहात; मग ही बातमी फक्त तुमच्यासाठी - Marathi News
x

कंगना राणौत हिने मुंबईला शहाणपण शिकवण्याची गरज नाही - आ. आशिष शेलार

BJP MLA Ashish Shelar, Bollywood actress Kangana Ranaut, Marathi News ABP Maza

मुंबई, ४ सप्टेंबर : कंगनाच्या मुंबईच्या वक्तव्यावरून वातावरण पेटलं आहे. यावरून कंगनाला मुंबईत न येणाचा सल्ला देणाऱ्यांना कंगनाने पुन्हा एक आव्हान दिलं आहे. कुणाच्या बापात हिम्मत असेल तर मला रोखून दाखवा, असं म्हणत कंगनाने आपण ९ सप्टेंबर रोजी मुंबईत येणार असल्याचं सांगितलं आहे.

‘अनेकांनी मला मुंबईत परत न येण्याची धमकी दिली आहे. त्यामुळे आता मी येत्या आठवड्यात ९ सप्टेंबर रोजी मुंबईत प्रवास करणार आहे. मुंबई एअरपोर्टला उतरण्याची वेळ मी तुम्हाला ठरली की सांगेन. कुणाच्या बापात हिम्मत अशेल तर मला रोखून दाखवा’,असं ट्विट कंगनाने केलं आहे.

दरम्यान, कंगनाची याच ट्विटवर प्रतिक्रिया देताना भाजपचे खासदार परवेश साहिबसिंग वर्मा यांनी थेट उद्धव ठाकरेंच्या कार्यालयाला मेन्शन करत ‘मुंबई कोणाच्या बापाची आहे का? हे महाराष्ट्रात चाललंय काय…असं ट्विट केल्याने अजून वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, वाद वाढण्याची शक्यता आणि मुंबईकरांचा रोष ओढवून घेण्याची शक्यता बळावल्याने आता अभिनेत्री कंगना राणौतबाबत भाजप आमदार राम कदम यांच्या वक्तव्यापासून भाजपने हात झटकलेत. कंगनाचे समर्थन करणाऱ्या भाजपने यू टर्न घेतला आहे. पत्रकार परिषद घेऊन आमदार आशिष शेलार यांना सारवासारव करावी लागली. राम कदम यांनी झाशीच्या राणीशी कंगना राणौतची तुलना केली होती. मात्र अखेर भाजपला या प्रकरणातून हात झटकावे लागले. कंगना राणौत हिने मुंबईला शहाणपण शिकवण्याची गरज नाही, असे शेलार यांनी म्हटले आहे.

सुशांतसिंह प्रकरणात वेगवेगळी वक्तव्ये करत प्रकरण संभ्रमीत करण्याचा प्रयत्न काही लोकं करत आहेत. कंगना यांनी मुंबई किंवा महाराष्ट्रबद्दल कोणतेही व्यक्तव्य करत शिकवण्याचा प्रयत्न करू नये. याबद्दल सहमत असण्याचा प्रश्नच येत नाही. कंगना यांच्या मागे राहून वार करण्याचा प्रयत्न संजय राऊत यांनी करू नये. राम कदम यांच्या झाशीची राणी या कंगनाबद्दलच्या वक्तव्याबद्दल, ज्यांनी आपले व्यक्तीगत मत व्यक्त केले आहे, त्यावर ते खुलासा करतील, सर्व नागरिकांना सन्मानाने बघितलं पाहिजे. सन्मानाची भूमिका प्रत्येक व्यक्तीला बघण्याची असली पाहिजे. ही त्यांची भूमिका आहे त्याच्यात काही चुकीचे नाही, असे आशिष शेलार म्हणाले.

 

News English Summary: The BJP, which supports Kangana, has taken a U-turn. MLA Ashish Shelar had to take a press conference. Ram Kadam had compared Kangana Ranaut to the Queen of Jhansi. But in the end, the BJP had to shake hands with this issue. “Kangana Ranaut does not need to teach Mumbai wisdom,” BJP MLA Ashish Shelar said.

News English Title: BJP MLA Ashish Shelar slams Bollywood actress Kangana Ranaut Marathi News LIVE Latest Updates.

हॅशटॅग्स

#Ashish Shelar(44)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x