22 January 2025 5:52 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | नोकरदारांनो बँक FD विसरा, 'या' म्युच्युअल फंड योजना 31 टक्केपर्यंत परतावा देत पैशाने पैसा वाढवतील Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, स्टॉक BUY करावा का - NSE: TATASTEEL Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप कंपनीच्या नफ्यात घट, तरीही ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: TATATECH Penny Stocks | प्राईस 88 पैसे, एका वडापावच्या किंमतीत 20 शेअर्स खरेदी करा, यापूर्वी 633% परतावा दिला - Penny Stocks 2025 Apollo Micro Systems Share Price | डिफेन्स कंपनी शेअरने 1 महिन्यात 53% परतावा दिला, खरेदीची संधी सोडू नका - NSE: APOLLO Infosys Share Price | आयटी स्टॉक इन्फोसिसवर टॉप ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस मोठा परतावा देणार - NSE: INFY Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल कंपनीबाबत मोठी अपडेट, शेअर मालामाल करणार - NSE: JIOFIN
x

करदात्यांचा पैसा विकास आणि कुपोषनावर खर्च व्हावा | कंगनाच्या सुरक्षा खर्चावरून टोला

Bollywood actress Swara Bhasker, Kangana Ranaut, Taxpayers money, Marathi News ABP Maza

मुंबई, ८ सप्टेंबर : अभिनेत्री कंगना राणौत हिनं मुंबईविषयी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर तिच्यावर अनेकांचारोष ओढावला गेला. ज्यानंतर कंगना विरुद्ध शिवसेना यांच्यातील संघर्षही विकोपास गेल्याचं चिन्हं आहे. त्यातच ड्रग्ज माफियांबाबत कंगना करत असणारे गौप्यस्फोट, कलाकारांच्या नावांचा खुलासा हे सारं पाहता तिला सुरक्षा पुरवण्यात यावी असा सूरही एका वर्गानं आळवला होता. ज्यानंतर केंद्रीय गृहमंत्रालयाकडून कंगनाला ‘Y’ दर्जाची सुरक्षा देण्याचा निर्णय घेण्यात आला.

कंगनाला सुरक्षा देण्यासंबंधीचा हा निर्णय़ होताच त्यावर संमिश्र प्रतिक्रिया उमटल्याचं पाहायला मिळालं. कलाविश्वातही याचे पडसाद उमटले. ज्यामध्ये कंगनाला पुरवण्यात येणाऱ्या सुरक्षेसाठी आम्ही देत असणाऱ्या कराच्या पैशांचा वापर तर केला जात नाही, अशा आशयाचा प्रश्न एका लोकप्रिय अभिनेत्रीनं विचारला.

‘मी फक्त तपासत होते, की यामध्ये (सुरक्षेसाठी) आम्ही करस्वरुपात भरणाऱ्या पैशांचा वापर तर होत नाही?’, असं अभिनेत्री कुब्रा सैत हिनं ट्विट करत लिहिलं. कुब्रानं वृत्तसंस्थेच्या ट्विटची जोड देत तिचा हा बोचरा प्रश्न विचारला. कंगना आणि कुब्राचं समीकरण फार चांगलं नाही. कारण, कंगनानं तिला ट्विटरवर ब्लॉक केलं आहे.

त्यानंतर एका ट्विटर युजरच्या ट्विटला उत्तर देताना स्वराने कंगनाला टोला लगावला. वाय सुरक्षेची कोणाला खरी गरज असेल तर ती स्वरा भास्करला आहे. तिला सोशल मीडियावर रोज धमक्या मिळतात. भाजपाचे व्हेरिफाईड ट्रोलर्सही तिला ट्रोल करण्यात मागे नाहीत. पण शेवटी तुमची विचारधारा काय? यावरून सगळे काही ठरते, असे ट्विट एका युजरने केले.

यावर उत्तर देताना स्वरा भास्करने लिहिले, ‘थँक्यू नजमा, पण नको. माझ्या सुरक्षेपेक्षा करदात्यांचा पैसा विकास, कुपोषण अशा ख-या कारणांसाठी खर्च व्हावा, असे मला वाटते,’ असे स्वरा भास्करने लिहिले.

 

News English Summary: Despite getting threats on social media almost every day, actress Swara Bhasker told a Twitter user recently that unlike Kangana Ranaut, she doesn’t need police protection. She added that she would rather see the money spent on important things. A twitter user recently suggested Swara take security, considering the vulgar threats she receives on social media.

News English Title: Bollywood actress Swara Bhasker says she does not need police protection like Kangana Ranaut Taxpayers money should be used for real issues Marathi News LIVE latest updates.

हॅशटॅग्स

Bollywood(88)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x