21 April 2025 3:41 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IREDA Share Price | जबरदस्त तेजीचे संकेत, मल्टिबॅगर इरेडा शेअर देईल मजबूत परतावा, ही आहे टार्गेट प्राईस - NSE: IREDA Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार सोमवार 21 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEL Share Price | बापरे, तब्बल 1,33,786% परतावा दिला या शेअरने, पुन्हा तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL Ashok Leyland Share Price | मल्टिबॅगर ऑटो कंपनीचा शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून टार्गेट जाहीर - NSE: ASHOKLEY Vodafone Idea Share Price | चिल्लर प्राईस पेनी स्टॉकबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA Yes Bank Share Price | येस बँकेच्या नफ्यात प्रचंड वाढ, पण तज्ज्ञांनी पेनी स्टॉकबद्दल काय म्हटलं? टार्गेट जाणून घ्या - NSE: YESBANK Vedanta Share Price | या शेअरला मोठा भविष्यकाळ, खरेदी करून ठेवा, अनेक तज्ज्ञांनी दिला सल्ला - NSE: VEDL
x

चौकशीसाठी नोटीस मिळाल्यावर कंगना पुन्हा महाराष्ट्र आणि मुंबई पोलिसांबद्दल बरळली

Bollywood, Kangana Ranaut, Mumbai Police

मुंबई, २२ ऑक्टोबर : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रानौत हिला वांद्रे पोलीस चौकशी बोलावणार आहेत. येत्या सोमवारी तिला चौकशीसाठी बोलावण्यात येणार आहे. कंगनाला मुंबईपोलिसांनी व्हॉट्सअ‍ॅपवर नोटीस पाठवली आहे. कंगनासह तिची बहीण रंगोलीलाही नोटीस पाठवण्यात आली आहे. या दोघींना सोमवारी आणि मंगळवारी अनुक्रमे चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे.

वांद्रे न्यायदंडाधिकारी न्यायालयाच्या आदेशानंतर मुंबई पोलिसांनी कंगना रणौत हिच्यासह तिच्या बहिणीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. कंगना आणि तिची बहीण रंगोली चंडेल हिच्यावर दोन समाजात तेढ निर्माण करणे, धार्मिक द्वेष पसरवल्याचा आरोप करण्यात आला आहे. यासंदर्भात एक याचिकाही दाखल करण्यात आली होती. कंगना विरोधात दाखल केलेल्या एका याचिकेमध्ये याचिकाकर्त्यानं असं म्हटलं होतं की, हिंदू कलाकार आणि मुस्लिम कलाकार यांच्यात मतभेद निर्माण करत कंगनाने तिच्या ट्वीट आणि न्यूज चॅनेल्सवरील तिच्या वक्तव्यामधून द्वेष वाढवला आहे.

कंगनाविरोधात भादवी कलम 153(A), 295(A), 124, 34 IPC अंतर्गत FIR दाखल झाली आहे. अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणानंतर अभिनेत्री कंगना रणौतने नेपोटिझम, फेव्हरेटिझम, बॉलिवूडमधील स्टार किड्स, ड्रग प्रकरण इ. अशा अनेक वक्तव्याबाबत भाष्य केले आहे. बॉलिवूडमधील अनेकांना तिने लक्ष्य केले आहे. याप्रकरणी कंगना रणौतची काय प्रतिक्रिया असेल, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

दरम्यान, अभिनेत्री कंगना तिच्या भावाच्या लग्नात आनंद साजरा करत असतानाच तिला ही नोटीस मिळाली आहे. त्यानंतर तिने पुन्हा नोटीस मिळाल्यावर आगपाखड केली आहे. तिने मुंबई पोलिसांना ‘महाराष्ट्राचे पप्पू’ म्हटले आहे.

कंगनाने ट्विटरच्या माध्यमातून पोलिसांना उत्तर दिले आहे. त्यांनतर तिने ट्वीट करून असे म्हटले आहे की, ‘वेडसर झालेली पेंगविन सेना, महाराष्ट्राच्या पप्पूनो.. खूप आठवण येते आहे क-क-क-क-क कंगनाची, काही हरकत नाही लवकरच परत येईन.’

 

News English Summary: Bollywood actress Kangana Ranaut will be questioned by Bandra police. She will be summoned for questioning next Monday. Mumbai Police has sent a notice to Kangana on WhatsApp. A notice has also been sent to Kangana and her sister Rangoli. The two have been summoned for questioning on Monday and Tuesday, respectively.

News English Title: Bollywood Kangana Ranaut reaction after getting notice of inquiry from Mumbai Police News updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#MumbaiPolice(168)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या