22 December 2024 5:48 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Nippon Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, टॉप 5 म्युच्युअल फंड योजना मालामाल करत आहेत, अनेक पटीत पैसा वाढवा Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, शेअर मालामाल करणार - NSE: RELIANCE Ashok Leyland Share Price | बंपर कमाई होणार, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज सहित या 7 शेअर्सवर ब्रोकरेज बुलिश, मिळेल मजबूत परतावा - NSE: TATATECH Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन सहित हे 5 शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत - NSE: SUZLON NHPC Share Price | NHPC सहित या 4 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC SIP Calculator | 12 बाय 12 चा फॉर्म्युला! 1000 रुपयांच्या बचतीतून मिळेल 1 कोटी रुपयांचा परतावा, लक्षात ठेवा
x

बॉलिवूडचे प्रसिद्ध संगीतकार वाजिद खान यांचे निधन

Bollywood, music director Wajid Khan passes away

मुंबई, १ जून: अभिनेता इरफान खान आणि ऋषी कपूर यांच्या मृत्यूच्या धक्क्यातून सावरत असतानाच बॉलिवूडला आणखी एक धक्का बसला आहे. वॉन्टेड, दबंग, एक था टायगर यांसारख्या सुपरहिट चित्रपटांना संगीत देणारे प्रसिद्ध संगीतकार वाजिद खान यांचे निधन झाले आहे. ते अवघ्या ४२ वर्षांचे होते.

वाजिद यांना आरोग्याच्या खूप समस्या होत्या. काही वर्षांपूर्वी त्यांच्यावर किडनी प्रत्यारोपन शस्त्रक्रियाही करण्यात आली होती. किडनीमध्ये इन्फेक्शन झाल्याने गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर चेंबूर येथील सुराना रुग्णालयात उपचार सुरु होते. तर मागील ४ दिवसांपासून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. त्यांची कोविड चाचणीही पॉझिटिव्ह आली होती. अखेर उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

सांगायचं झालं तर गेल्या दोन महिन्यांमध्ये बॉलिवूडला बसलेला हा तिसरा मोठा धक्का आहे. सर्व प्रथम २९ एप्रिल रोजी अभिनेते इरफान खान यांनी या जगाचा निरोप घेतला. या घटनेला २४ तास उलटत नाही तर दिग्गज अभिनेते ऋषी कपूर यांच्या निधनाची धक्कादायक बातमी समोर आली. तर आज महिन्याच्या पहिल्याच दिवशी दिग्गज संगीतकार वाजिद खान यांनी अखेरचा श्वास घेतला.

 

News English Summary: Bollywood has suffered another setback as it is recovering from the deaths of actors Irrfan Khan and Rishi Kapoor. Famous musician Wajid Khan, who composed music for superhit films like Wanted, Dabangg, Ek Tha Tiger, has passed away. He was just 42 years old.

News English Title: Bollywood music director Wajid Khan passes away at 42 News Latest Updates.

हॅशटॅग्स

#BollywoodMovie(21)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x