22 April 2025 4:54 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
8th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांच्या HRA मध्ये बदल होणार, हिशेबही नवीन बेसिक प्रमाणे, अपडेट जाणून घ्या EPFO Pension News | खाजगी कंपनी पगारदारांसाठी मोठी बातमी, EPFO ची महिना 7500 रुपये मिनिमम पेन्शन मिळणार SBI Mutual Fund | पगारदारांनो, बिनधास्त गुंतवणूक करा या फंडात, 1 लाखांच्या गुंतवणुकीवर 1.27 कोटी परतावा मिळेल Horoscope Today | 22 एप्रिल 2025, तुमच्यासाठी मंगळवारचा दिवस कसा असेल? तुमचे मंगळवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या HFCL Share Price | रिलायन्स ग्रुपची हिस्सेदारी असलेल्या स्वस्त शेअर्सची जोरदार खरेदी, 5 दिवसात 12.59% तेजी - NSE: HFCL Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्स खरेदीला गर्दी, यापूर्वी दिला 9,709% परतावा, टार्गेट अपडेट - NSE: ASHOKLEY Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार मंगळवार 22 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या
x

इतर प्रांतातून येऊन अनेकजण नाव कमवतात | काही जण ऋण मानतात काहीजण मानत नाहीत

CM Uddhav Thackeray, Kangana Ranaut. Shivsena

मुंबई , ७ सप्टेंबर : अनेकजण इतर प्रांतातून महाराष्ट्रात येतात रोजी रोटी कमावतात, नाव कमवतात काही जण महाराष्ट्राचं ऋण मानतात काहीजण मानत नाहीत” असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कंगना रणौतला अप्रत्यक्ष टोला लगावला आहे. संजय राऊत आणि कंगना यांच्यात ट्विटर वॉरही रंगलं. मात्र या सगळ्या प्रकरणावर मुख्यमंत्र्यांनी काहीही भाष्य केलं नव्हतं. आज मात्र त्यांनी अप्रत्यक्षरित्या कंगनाला टोला लगावला आहे.

दरम्यान, प्रसिद्ध राजकीय नेते, कलाकार, उद्योजक आणि क्रीडापटू यांना सरकारकडून सुरक्षा दिली जाते. त्यांच्या जीवाला असणारा धोका लक्षात घेऊन त्यांना कुठल्या दर्जाची सुरक्षा द्यायची, याचा निर्णय सरकारकडून घेतला जातो. दरम्यान आता शिवसेनेबरोबर सुरु असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर अभिनेत्री कंगना रणौतला Y+ दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. या कॅटेगरीमध्ये कंगनाच्या सुरक्षेसाठी १० सशस्त्र कमांडो तैनात असतील.

९ सप्टेंबरला कंगना मुंबईत येणार आहे. मुंबईतील खारमध्ये कंगनाचं घर आहे. पाली हिल परिसरात तिचं कार्यालय आहे. या कार्यालयाची आज मुंबई महापालिकेच्या काही अधिकाऱ्यांनी पाहणी केली. कार्यालय अनधिकृत नाही ना, रस्त्यावर अतिक्रमण तर झालेलं नाही ना, याची तपासणी करण्यासाठी अधिकारी आले होते.

कंगनाच्या कार्यालयात सध्या रंगरंगोटीचं काम सुरू आहे. त्यांचीही पालिकेच्या अधिकाऱ्यांनी जुजबी चौकशी केली. कार्यालयाशेजारी असणाऱ्या बंगल्यांचीदेखील पाहणी करण्यात आली. यावेळी अधिकाऱ्यांनी शेजारीच असलेल्या रस्त्यांचीही मापं घेतली. त्यामुळे आता पालिका काय कारवाई करणार, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

 

News English Summary: Many come to Maharashtra from other states to earn a living, earn a name, some are indebted to Maharashtra, some are not, ”said Chief Minister Uddhav Thackeray. There was also a Twitter war between Sanjay Raut and Kangana.

News English Title: Chief Minister Chief Minister Uddhav Thackeray Indirectly Slams Kangana On Her Mumbai Statement Marathi News LIVE latest updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#UddhavThackeray(413)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या