23 December 2024 3:03 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन सहित हे 4 शेअर्स मालामाल करणार, 55 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल, टार्गेट नोट करा - NSE: SUZLON SBI Mutual Fund | डोळे झाकून SIP करा या SBI फंडाच्या योजनेत, 1 लाख रुपयांचे होतील 5 लाख रुपये, मार्ग श्रीमंतीचा Penny Stocks | 3 रुपयाचा पेनी शेअर श्रीमंत करतोय, स्टॉक खरेदीला गर्दी, यापूर्वी 1282 टक्के परतावा दिला - Penny Stocks 2024 HAL Share Price | मल्टिबॅगर HAL सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 57 टक्केपर्यंत परतावा - NSE: HAL Mazagon Dock Share Price | डिफेन्स कंपनी शेअर मालामाल करणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली - NSE: MAZDOCK IPO GMP | आला रे आला IPO आला, पहिल्याच दिवशी मल्टिबॅगर परतावा, मजबूत कमाईची संधी - IPO Watch Hakka Sod Pramanpatra | हक्क सोड पत्र कसे करावे, त्यासाठी रजिस्टर कार्यालयात हजर राहावे लागते का, वाचा सविस्तर
x

भाईजान'ला अडवणाऱ्या ASI वर CISF'कडून प्रोटोकॉल उल्लंघनाचा आरोप | मोबाईलही जप्त

Salman Khan

मुंबई, २४ ऑगस्ट | अभिनेता सलमान खान नुकताच त्याच्या आगामी ‘टायगर 3’ या चित्रपटाच्या शूटिंगसाठी मुंबईहून रशियाला रवाना झाला. या दरम्यान मुंबई विमानतळावरून सलमानची काही छायाचित्रे आणि व्हिडिओ समोर आले होते, ज्यात सलमान खानला विमानतळावर सीआयएसएफच्या एका जवानाने चौकशीशिवाय आत जाण्यापासून रोखलेले दिसले. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर सोशल मीडियावर प्रत्येकाने या सीआयएसएफच्या जवानाचे कौतुक केले. या CISF जवानाचे नाव सोमनाथ मोहंती आहे. या घटनेनंतर सोमनाथ सोशल मीडियावर हीरो झाले होते. पण आता ताज्या वृत्तानुसार, सलमानला विमानतळावर रोखल्यानंतर सोमनाथ मात्र अडचणीत सापडले आहेत.

भाईजान’ला अडवणाऱ्या ASI वर CISF’ची प्रोटोकॉल उल्लंघनाचा आरोप, मोबाईलही जप्त – CISF officer in trouble over stopping Bollywood superstar Salman Khan at airport :

CISF ने ASI वर प्रोटोकॉलचे उल्लंघन केल्याचा आरोप केला:
CISF अधिकारी सोमनाथ मोहंती यांनी सलमानला विमानतळावर थांबवून आपले कर्तव्य बजावले होते. पण आता सोमनाथ मोहंती यांच्यावर प्रोटोकॉलचे उल्लंघन केल्याचा आरोप झाला आहे. रिपोर्टनुसार, सोमनाथ मोहंती यांनी ओडिशा येथील एका मीडिया हाऊससोबत बातचीत केल्याने CISF ने त्यांचा मोबाइल जप्त केला आहे. मीडियाशी संवाद साधल्यामुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे, कारण हे सीआयएसएफ प्रोटोकॉलचे उल्लंघन आहे. सोमनाथ भविष्यात या घटनेबद्दल मीडियाशी बोलू नये म्हणून, CISF ने त्यांचा मोबाइल ताब्यात घेतला आहे. सोमनाथ मोहंती हे मूळचे ओडिशाच्या नयागढ जिल्ह्यातील रहिवाशी आहेत.

यूजर्सनी CISF अधिकाऱ्याचे केले होते कौतुक: CISF officer stopped Bollywood superstar Salman Khan at airport

सीआयएसएफ अधिकारी सोमनाथ मोहंती यांनी विमानतळावर सुरक्षा चौकशीसाठी सलमान खानला रोखल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. यानंतर, नेटक-यांनी CISF चे ASI सोमनाथ यांनी त्यांचे कर्तव्य प्रामाणिकपणे बजावल्याबद्दल त्यांचे कौतुक केले होते. अनेकांनी सोमनाथ यांना रिअल सुपरहिरो देखील म्हटले होते. त्यांचा हा व्हिडिओ समोर आल्यानंतर, एका एका यूजरने कमेंट करताना लिहिले होते, ‘सीआयएसएफच्या जवानाने ज्या प्रकारे रोखले ते पाहून छान वाटले.’

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: CISF officer in trouble over stopping Bollywood superstar Salman Khan at airport news updates.

हॅशटॅग्स

#Salman Khan(14)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x