23 February 2025 3:00 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Gratuity Money Alert | प्रायव्हेट नोकरी करणाऱ्यांच्या खात्यात ग्रॅच्युइटीचे 2,01,923 रुपये जमा होणार, बेसिक सॅलरी प्रमाणे रक्कम मिळेल GTL Infra Share Price | जीटीएल इन्फ्रा कंपनी शेअर तेजीत, यापूर्वी 315% परतावा दिला - NSE: GTLINFRA Vodafone Idea Share Price | पेनी शेअर मालामाल करणार, मिळेल 100% परतावा, तज्ज्ञांनी दिले संकेत - NSE: IDEA HAL Share Price | डिफेन्स कंपनी शेअरबाबत सकारात्मक संकेत, तज्ज्ञांकडून अपसाईड तेजीचे संकेत - NSE: HAL Tata Motors Share Price | टाटा मोटर्स स्टॉक मालामाल करणार, तज्ज्ञांनी दिले संकेत - NSE: TATAMOTORS SBI Home Loan EMI | एसबीआय गृहकर्जाचे व्याजदर घटले, EMI मध्ये दरमहा इतकी बचत होऊन लाखोंचा फायदा होणार Gratuity on Salary | प्रायव्हेट नोकरदारांसाठी खुशखबर, ग्रॅच्युइटी एकूण 3,46,154 रुपयांची रक्कम खात्यात जमा होणार
x

लोकशाहीत व्यक्त होण्याचा अधिकार सर्वांना | पोस्टरला चपलांनी मारण हे काही योग्य नाही

Amrita Fadnavis, Kangana Ranaut, Marathi News ABP Maza

मुंबई, ५ सप्टेंबर :  सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणानंतर चांगल्याच आक्रमक झालेल्या कंगना रानौत आणि शिवसेनेमध्ये सध्या तुंबळ शाब्दिक लढाई जुंपली आहे. त्यात कंगनाने संजय राऊत यांना प्रत्युत्तर देताना मुंबईची तुलना पीओकेशी केल्याने मराठी अस्मितेचा मुद्दा समोर आला आहे. दरम्यान आज दोन्ही बाजूंनी आरोप प्रत्यारोप सुरू होते. तर कलाकारांसह अनेक राजकीय नेत्यांनीही या वादावर आपल्या प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनीही या वादावर आपली प्रतिक्रिया दिली असून, मत मांडण्याचा प्रत्येकाला अधिकार असल्याचे सांगत त्यांनी कंगना रानौत हिची अप्रत्यक्षपणे पाठराखण केली आहे.

शिवसेना आणि कंगना रानौत मध्ये सुरु असलेल्या शाब्दिक युद्धावर भाष्य करताना अमृता फडणवीस यांनी म्हटलं आहे की, “आपल्याला एखाद्याचं म्हणणं पटू शकत नाही, पण लोकशाहीत व्यक्त होण्याचा आणि आपलं मत मांडण्याचा अधिकार सर्वांना आहे. वाद-प्रतिवाद होत रहावेत, पण पोस्टरला चपलांनी मारण हे पातळी घसरल्याचं लक्षण असल्याचं अमृता फडणवीसांनी म्हटलं आहे.”

 

News English Summary: Amruta Fadnavis, the wife of former Maharashtra Chief Minister and BJP leader Devendra Fadnavis, took to Twitter to indirectly support actor Kangana Ranaut who is in the centre of a political controversy over her tweet where she said Mumbai “felt like Pakistan-occupied Kashmir”.

News English Title: Everyone has the right to express Amrita Fadnavis backs Kangana Ranaut Marathi LIVE Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Amruta Fadnavis(82)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x