17 April 2025 12:07 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर्सबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, BUY, SELL की Hold करावा? - NSE: SUZLON Tata Power Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा पॉवर शेअर मालामाल करणार, कमाईची संधी सोडू नका - NSE: TATAPOWER NTPC Green Energy Share Price | खरेदीनंतर संयम ठेवा, श्रीमंत करू शकतो हा शेअर, टार्गेट जाणून घ्या - NSE: NTPCGREEN Vodafone Idea Share Price | तब्बल 66 टक्के परतावा मिळेल, पेनी स्टॉक फोकसमध्ये, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA SBI Mutual Fund | नोकरदारांनो, डोळे झाकुन पैसे गुंतवा या SBI फंडात, एसआयपी वर दिला 1,04,23,471 रुपये परतावा EPFO Pension Amount | तुमचा बेसिक पगार किती आहे? खाजगी कंपनी पगारदारांना महिना 6,429 रुपये पेन्शन मिळणार, अपडेट आली Gratuity on Salary | खाजगी कंपनी पगारदारांच्या खात्यात ग्रेच्युटीचे 4,03,846 रुपये जमा होणार, फायद्याची अपडेट जाणून घ्या
x

देश शेतकऱ्यांच्या शेतमालावर निर्भर असतो | अनुपम खेर यांचे बळीराजालाच आत्मनिर्भरतेचे धडे

Farmers, Aatmnirbhar, Agriculture Bill, Bollywood actor Anupam Kher, Marathi News ABP Maza

नवी दिल्ली, २२ सप्टेंबर : केंद्र सरकारने अत्यावश्यक वस्तू सेवा सुधारणा कायदा, बाजार समिती नियमनमुक्ती विधेयक आणि करार शेती विधेयक अशी ही तीन नवीन विधेयकं मांडली आहे. या कायद्यांमुळे शेतकऱ्यांचा फायदा होईल, असं ही विधेयकं सोमवारी लोकसभेत मांडताना कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी म्हटलं आहे. मात्र या कृषी विषयक विधेयकांवरून केंद्र सरकारविरुद्ध शेतकरी रस्त्यावर उतरू लागला आहे. या विधेयकांवर विरोधी पक्षांनी ती ‘शेतकरीविरुद्ध’ असल्याची जोरदार टीका कायम ठेवली व पंजाब व हरयाणात त्याविरोधात आंदोलनही सुरू आहे. मात्र बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी मोदी सरकारने लागू केलेल्या विधेयकांचं कौतुक केलं आहे.

अनुपम खेर म्हणाले की, शेतकऱ्यांची अवस्था याआधीही वाईट होती आणि आजही वाईटच आहे. पण आता जी कृषी विधेयकं पास झाली आहेत त्यामुळे शेतकऱ्यांची अवस्था सुधारेल असा विश्वास मला वाटतो आहे. तसेच आता शेतकऱ्यांची दलालांच्या दुष्ट चक्रातून सुटका झाल्याचे अनुपम खेर यांनी सांगितले. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांनी आता आत्मनिर्भर झालं पाहिजे असं मत देखील अनुपम खेर यांनी व्यक्त केलं आहे. मात्र शेतकरी मेहनतीने पिकवत असलेल्या शेतमालावर देश निर्भर असतो याचा अनुपम खेर यांना विसर पडल्याचं दिसतं.

दुसऱ्या बाजूला अनेक राज्य आणि केंद्रसाशित प्रदेशांकडून त्यांच्या प्रदेशात झालेल्या शेतकरी आत्महत्यांसंदर्भातील माहिती केंद्र सरकारला पुरवण्यात आलेली नाही असं सरकराने म्हटलं आहे. त्यामुळेच कृषी क्षेत्राशी संबंधित आत्महत्येमागील कारणांची माहिती देण्यास आम्ही असमर्थ आहोत आणि ती माहिती सरकार जाहीर करु शकत नाही असंही गृहमंत्रालयाने सोमवारी राज्यसभेमध्ये स्पष्ट केलं.

राष्ट्रीय गुन्हे नोंदणीकरण विभागाने दिलेल्या माहितीनुसार अनेक राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांनी शेतकरी आत्महत्येसंदर्भात कोणतीच आकडेवारी दिलेली नाही. अनेकदा विचारपूस केल्यानंतरही शेतीशी संबंधित शेतकरी, शेतमजूर यांच्या आत्महत्यांची माहिती विभागाला देण्यात आलेली नाही, असं गृहमंत्रालयाचे राज्य मंत्री जी कृष्णा रेड्डी यांनी स्पष्ट केलं आहे. “यामुळेच कृषी क्षेत्राशी संबंधित व्यक्तींनी केलेल्या आत्महत्येंमागील कारणे सांगण्यास तसेच त्याबद्दलची माहिती प्रकाशित करण्यास आम्ही असमर्थ आहोत,” असं रेड्डी यांनी लेखी उत्तरामध्ये म्हटलं आहे. यासंदर्भातील वृत्त पीटीआय या वृत्तसंस्थेनं दिलं आहे.

 

News English Summary: Film Actor Anupam Kher on Monday extended his support to the passing of the agriculture Bills in the Parliament. In a video message to ANI, Kher without mentioning the name of the Bills, narrated a scene of his film to show the farmers’ plight in the country in the past.

News English Title: Farmers should become Aatmnirbhar Appreciation of Agriculture Bill from actor Anupam Kher Marathi News LIVE latest updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या