23 February 2025 8:38 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Home Loan EMI | एसबीआय गृहकर्जाचे व्याजदर घटले, EMI मध्ये दरमहा इतकी बचत होऊन लाखोंचा फायदा होणार Gratuity on Salary | प्रायव्हेट नोकरदारांसाठी खुशखबर, ग्रॅच्युइटी एकूण 3,46,154 रुपयांची रक्कम खात्यात जमा होणार EPFO Money Alert | खासगी नोकरी करणाऱ्यांच्या खात्यात EPF चे 1,01,29,237 रुपये जमा होणार, तुमचा महिना पगार किती Personal Loan EMI | 'या' कामांसाठी पर्सनल लोन घेत असाल तर वेळीच थांबा, होतील गंभीर परिणाम, इथे जाणून घ्या माहिती SBI FD Interest Rate | 'या' बँका FD गुंतवणुकीवर उत्तम व्याज देत आहेत, 4 ते 6 लाखांच्या FD वर किती परतावा मिळेल पहा Home Loan Interest Rate | पगारदारांनो, 'या' बँका देत आहेत सर्वाधिक स्वस्त गृहकर्ज, घराची स्वप्नपूर्ती साकार होणार Horoscope Today | रविवार 23 फेब्रुवारी, कसा असेल 12 राशींच्या लोकांचा रविवार, तुमचे राशी भविष्य जाणून घ्या
x

मी सांगते आहे मी मराठा | करा जे काही करायचं आहे - कंगना रानौत

Film Actress Kangana Ranaut, Mumbai PoK, Marathi News ABP Maza

मुंबई, ४ सप्टेंबर : शिवसेना नेते संजय राऊत यांनी मुंबई मराठी माणसाच्या बापाचीच, आहे असे ठणकावून सांगितल्यानंतर अभिनेत्री कंगना राणौत आणखीनच आक्रमक झाली आहे. महाराष्ट्र हा तुमच्या बापाचा नाही. त्यामुळे तुम्हाला माझं काय वाकडं करायचंय ते करा, असे खुले आव्हानच कंगनाने शिवसेनेला दिले आहे. महाराष्ट्र हा कोणाच्याही बापाचा नाही. महाराष्ट्र हा मराठ्यांची मान अभिमानाने उंचावणाऱ्या लोकांचा आहे. मी निक्षून सांगते की, मी मराठा आहे. माझं काय वाकडं करायचंय ते करा, असे कंगनाने म्हटले आहे.

शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांना प्रत्युत्तर देताना बॉलिवूडची अभिनेत्री कंगना रणौत हिनं मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केली. त्यानंतर तिच्या या वक्तव्याचा सर्वच स्तरातून निषेध व्यक्त करण्यात आला. दरम्यान, तिच्या या वक्तव्याच्या विरोधात शिवसेनेच्या महिला आघाडीनं तिच्या फोटोला जोडे मारो आंदोलन केलं. यावरून कंगनानं पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.

”सुशांत आणि साधुंच्या खुनानंतर आता प्रशासनानवरच्या माझ्या मतानंतर माझ्या पोस्टरला चप्पल मारण्यात आल्या. मुंबईला आता रक्ताचं व्यसन लागलं आहे असं वाटतंय,” अशी टीका कंगनानं केली. तिनं शिवसेनेच्या महिला आघाडीच्या आंदोलनाचा व्हिडिओ शेअर करत ट्विटरवरून टीका केली.

१०० वर्षात मराठ्यांचा इतिहास सांगणारा एक चित्रपट केला नाही. मी इस्लाम डॉमिनेटेड इंडस्ट्रीमध्ये आपला जीव आणि करिअर पणाला लावलं. छत्रपती शिवाजी महाराज आणि राणी लक्ष्मीबाई यांच्यावर चित्रपट केलं. आज महाराष्ट्राच्या या ठेकेदारांना विचारा त्यांनी महाराष्ट्रासाठी काय केलं?,” असंही कंगना म्हणाली. तिनं या सोबत आपल्या चित्रपटातील एक फोटोही शेअर केला आहे. “महाराष्ट्र कोणाच्या बापाचा नाही. ज्यानं मराठीचा अभिमान बाळगला आहे त्याचा महाराष्ट्र आहे. मी सांगते आहे मी मराठा, करा जे काही करायचं आहे,” असंही ती म्हणाली.

 

News English Summary: Not a single film has been made in 100 years telling the history of Marathas. I risked my life and career in the Islam dominated industry. Filmed on Chhatrapati Shivaji Maharaj and Rani Lakshmibai. Today, ask these contractors from Maharashtra what they did for Maharashtra ?, ”said Kangana. She also shared a photo from her film.

News English Title: Film Actress Kangana Ranaut Criticize Says Mumbai Is Addicted To Blood PoK Statement Marathi News LIVE Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Bollywood(88)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x