29 April 2025 2:14 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IREDA Share Price | सरकारी कंपनीच्या स्टॉकबाबत महत्वाचा सल्ला, गुंतवणूकदारांना एक्झिटचा सल्ला - NSE: IREDA NTPC Green Energy Share Price | पीएसयू शेअर अत्यंत स्वस्त, खरेदी करून ठेवा, टार्गेट जाणून घ्या - NSE: NTPCGREEN Jio Finance Share Price | शेअर प्राईस ऑल टाइम लो पासून 31 टक्क्यांनी वाढली, शॉर्ट टर्म टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN Reliance Power Share Price | 41 रुपयांचा शेअर फोकसमध्ये, स्टॉक मार्केट तज्ज्ञांनी दिले महत्वाचे संकेत - NSE: RPOWER Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्स मालामाल करणार, नोमुरा ब्रोकिंग फर्म बुलिश - NSE: RELIANCE Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन स्टॉक मालामाल करणार; टॉप ब्रोकिंग फर्म बुलिश - NSE: SUZLON Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप स्टॉक 5.23 टक्क्यांनी घसरला; शेअर्सबाबत महत्वाची अपडेट - NSE: TATATECH
x

रिया ड्रग्स प्रकरण | सारा अली खान आणि रकुल प्रित सिंग सहित मोठी नावं

Rhea Chakraborty, drugs case, Sara Ali Khan, Marathi News ABP Maza

मुंबई, १२ सप्टेंबर : अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या अभिनेत्री रिया चक्रवर्तीसमोरील अडचणींमध्ये वाढ होताना दिसत आहे. रियाला ड्रग्स सेवन आणि अन्य आरोपांमुळे मंगळवारी अटक करण्यात आली. त्यानंतर तिने जामिनासाठी विशेष न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र न्यायालयाने तिचा जामीन अर्ज फेटाळला. एनसीबीने मला ड्रग्सचे सेवन करत असल्याची कबुली देण्यास दबाव टाकल्याचं वक्तव्य तिने न्यायालयासमोर केलं होतं.

त्यानंतर प्रसार माध्यमांनी रियाचा ड्रग्स सेवन करताना एक व्हिडिओ प्रसिद्ध केला. ज्यामध्ये ती ड्रग्सचं सेवेन करताना दिसून आली. शुक्रवारी एनसीबीने ड्रग्ससंदर्भात मोठा खुलासा केला. २५ बॉलिवूड सेलिब्रिटी ड्रग्स प्रकरणी एनसीबीच्या रडारवर असल्याचं सांगण्यात येत आहे. या सर्वांची नावं अभिनेत्री रिया चक्रवर्तीच्या चौकशीनंतर समोर आली आहेत.

ड्रग्स सेवन प्रकरणातील ५ सेलिब्रिटींची नावं ‘झी न्यूज’च्या हाती लागली आहेत. आता या सर्वांची चौकशी होण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या म्हणण्यानुसार रियाने चौकशी दरम्यान ज्या सेलिब्रिटींची नावं घेतली आहेत, त्यामध्ये अभिनेत्री सारा अली खानचं देखील नाव आहे.

रियाने एनसीबीला दिलेल्या 19 पानी निवेदनात विशेषत: सारा, रकुल आणि सिमॉन या तिघींची नावे दिली. एनसीबी आता फिल्म इंडस्ट्रीच्या ए, बी आणि सी ग्रेड कलाकारांवर लक्ष केंद्रित करत आहे, जे अमली पदार्थांचे सेवन करतात. या प्रकरणात 25 ए ग्रेड बॉलिवूड सेलिब्रिटींची नावे घेण्यात आली आहेत, ज्यात अभिनेते, दिग्दर्शक, कास्टिंग डायरेक्टर, प्रॉडक्शन हाऊस आणि इतरांचा समावेश आहे.

सारा अली खानने सुशांतसिंह राजपूत याच्यासोबत ‘केदारनाथ’ चित्रपटात काम केलं होतं. सारा ही सुशांतला आपला मार्गदर्शक मानत असल्याचंही म्हटलं जात होतं. सुशांतच्या मृत्यूनंतर तिने सोशल मीडियावर भावूक पोस्टही शेअर केली होती. ‘सिम्बा’ सिनेमातून सिनेसृष्टीत पदार्पण केलेल्या साराने मोजक्याच चित्रपटात भूमिका केल्या आहेत.

अभिनेत्री रकुल प्रीत सिंग हिने अनेक दाक्षिणात्य सिनेमात भूमिका केल्या आहेत. ‘अय्यारी’ सिनेमातून तिने बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले. तर अजय देवगनसोबत दे दे प्यार दे, मरजांवा असे काही चित्रपट केले आहेत.

 

News English Summary: In the latest development in the drugs-related case pertaining to the death of Bollywood actor Sushant Singh Rajput, Media has learnt that actresses Sara Ali Khan, Rakulpreet Singh and designer Simone Khambatta are under the scanner of Narcotics Control Bureau (NCB). Sources have told that there are many more people associated with the Bollywood who are under the scanner of the apex drug law enforcement agency.

News English Title: Five more faces in Rhea Chakraborty drugs case including Sara Ali Khan Marathi News LIVE latest updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Bollywood(88)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या