20 April 2025 6:57 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HDFC Mutual Fund | पगारदारांनो, ही फंडाची योजना गुंतवणूकदारांचे पैसे 4 ते 5 पटीने वाढवत आहे, इथे पैसा वाढवा Horoscope Today | 20 एप्रिल 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Kalyan Jewellers Share Price | सोनं नव्हे, सोनं बनवणाऱ्या कंपनीचे शेअर्स खरेदी करा, झपाट्याने पैसा वाढेल - NSE: KALYANKJIL Mishtann Foods Share Price | 5 रुपयांचा पेनी स्टॉक फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिले संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - BOM: 539594 Motherson Sumi Wiring Price | शेअर प्राईस 52 रुपये, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, किती परतावा मिळेल पहा - NSE: MSUMI Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार रविवार 20 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Bajaj Finance Share Price | लाखो टक्क्यांमध्ये परतावा देणारा शेअर, आता पुढची टार्गेट प्राईस ही आहे - NSE: BAJFINANCE
x

घाणेरडं राजकारण करून मिळवलेल्या खुर्चीसाठी तुम्ही पात्र नाही | पुन्हा मुख्यमंत्री लक्ष

Kangana Ranaut, CM Uddhav Thackeray, Dasara Melava

मुंबई, २६ ऑक्टोबर : मुख्यमंत्रिपदाचा मास्क बाजूला ठेवून भाषण करतोय, असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दसरा मेळाव्यात भाजप, मोदी सरकार, कंगना राणौत, राज्यपाल भगतसिंह कोश्यारींचा समाचार घेतला. घरी खायला मिळत नाही, मुंबईत यायचं आणि मुंबईशी नमकहरामी करायची, अशी घणाघाती टीका मुख्यमंत्र्यांनी कंगनावर केली. मुख्यमंत्र्यांच्या टीकेला आता कंगनानं प्रत्युत्तर दिलं आहे.

‘मुख्यमंत्री, तुम्हाला तुमची लाज वाटायला हवी. लोकसेवक असताना तुम्ही क्षुल्लक गोष्टींवरून संघर्ष करत आहात. तुमच्याकडे असणारी सत्ता तुमच्याशी सहमत नसलेल्या इतरांचा अपमान करण्यासाठी, त्यांना हानी पोहोचवण्यासाठी वापरत आहात. घाणेरडं राजकारण करून मिळवलेल्या खुर्चीसाठी तुम्ही पात्र नाही. तुम्हाला लाज वाटायला हवी,’ अशा तिखट शब्दांत कंगनानं मुख्यमंत्री ठाकरेंवर पलटवार केला आहे.

शिवसेनेचा दसरा मेळावा (Shiv Sena Dussehra Rally) यंदा प्रथमच शिवतीर्थावर नाही तर सभागृहात पार पडला. उद्धव ठाकरेंचे भाषण शिवसैनिकांनी ऑनलाईन स्वरुपात पाहिले. या दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीर (PoK)सोबत करणाऱ्या कंगना रानौतवर उद्धव ठाकरेंनी निशाणा साधत टीका केली होती. यासोबतच भाजपवर सुद्धा उद्धव ठाकरेंनी टीकेचे बाण सोडले होते.

नेमकं काय म्हणाले होते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे:
मुंबई पाकव्याप्त काश्मीर झालेला आहे असं म्हणत आहेत. मोदींनी २०१४ साली सांगितलं होतं की पाकव्याप्त काश्मीर भारतात आणल्याशिवाय राहणार नाही. पाकव्याप्त काश्मीर लांब राहिलं. पण भारतातील जो काश्मीर आहे तिकडे ज्यांना मुंबई पाकव्याप्त वाटते त्यांना म्हणावं अनधिकृत सोडून द्या, ३७० कलम काढलेलं आहे. अधिकृत एक इंच जमीन तरी काश्मीरमध्ये घेऊन दाखवा आणि मग आणच्या अंगावर या.

घरी खायला मिळत नाही आणि मुंबईत यायचं. वर दाखवायचं आम्ही कष्ट केले आहेत. मुंबई आणि महाराष्ट्रचं मीठ खायचं आणि मनक हरामी करायची, महाराष्ट्राची बदनामी कशाला करायची? असा सवालही उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला.

 

News English Summary: Saying that he is putting aside his mask of Chief Minister’s post, Chief Minister Uddhav Thackeray took the news of BJP, Modi government, Kangana Ranaut, Governor Bhagat Singh Koshyari at the Dussehra meet. The Chief Minister slammed Kangana for not getting food at home, coming to Mumbai and committing adultery with Mumbai. Kangana has now responded to the Chief Minister’s criticism.

News English Title: Kangana Ranaut criticized CM Uddhav Thackeray after his Dasara Melava speech News Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#UddhavThackeray(413)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या