22 January 2025 10:43 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bank Account Alert | तुमच्या बँक अकाउंटमध्ये किती रोख रक्कम ठेवावी लक्षात ठेवा, अन्यथा इन्कम टॅक्स नोटीस आलीच समजा EPFO Passbook | तुमच्या पगारातून EPF कापला जातोय, खात्यात जमा होणार 1,56,81,573 रुपये, पगाराप्रमाणे रक्कम जाणून घ्या HDFC Mutual Fund | श्रीमंत करणारी HDFC म्युच्युअल फंडाची योजना, मिळेल तगडा परतावा, इथे पैसा वेगाने वाढतो SBI Mutual Fund | नोकरदारांनो बँक FD विसरा, 'या' म्युच्युअल फंड योजना 31 टक्केपर्यंत परतावा देत पैशाने पैसा वाढवतील Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, स्टॉक BUY करावा का - NSE: TATASTEEL Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप कंपनीच्या नफ्यात घट, तरीही ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: TATATECH Penny Stocks | प्राईस 88 पैसे, एका वडापावच्या किंमतीत 20 शेअर्स खरेदी करा, यापूर्वी 633% परतावा दिला - Penny Stocks 2025
x

कंगनाला महापालिकेकडून दुसरा झटका मिळणार | खारमधील फ्लॅटप्रकरणी पाठवली नोटीस

Kangana Ranaut, BMC notice, illegal construction, Khar west house, Marathi News ABP Maza

मुंबई, १३ सप्टेंबर : मुंबईला पाकिस्तान म्हणणाऱ्या, मुंबईचा अपमान करणाऱ्या नटीच्या मागे भाजपा उभा राहतो हे दुर्दैवी आहे असं रोखठोक मत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मांडलं आहे. रविवारच्या रोखठोक या सदरात एक खास लेख लिहून त्यांनी कंगना रणौत, भाजपा आणि मागच्या काही दिवसांमध्ये करण्यात आलेल्या वक्तव्यांवर आपल्या खास शैलीत टीका केली आहे. दुसरीकडे कंगनाची कार्यलयानंतर मुंबई महानगरपालिकेने कंगनाची खार वेस्ट स्थित फ्लॅटवरून तिला नोटीस बजावल्याचे वृत्त आहे.

मुंबईताल खार वेस्टमध्ये एका बिल्डिंगमध्ये कंगनाचा एक फ्लॅट आहे. या बिल्डिंगच्या पाचव्या मजल्यावर कंगना राहाते. पाचव्या मजल्यावर कंगनाचे एक नाही तर तीन फ्लॅट आहेत. हे तिन्ही फ्लॅट्स कंगनाच्या नावावर आहेत. 8 मार्च 2013 रोजी तिन्ही फ्लॅटची रजिस्ट्री झाली होती. कंगनाने फ्लॅट घेतल्यानंतर पाच वर्षांनी म्हणजेच 13 मार्च 2018 रोजी बीएमसीकडे एक तक्रार आली होती. तिने फ्लॅट्समध्ये बेकायदा बांधकाम केल्याचं तक्रारीत म्हटले होते.

या तक्रारीनंतर 26 मार्च 2018 रोजी बीएमसीच्या अधिका-यांनी कंगनाच्या या फ्लॅट्सची पाहाणी केली होती. त्याच दिवशी कंगनाला नुसार नोटिस बजावण्यात आली होती. आता कंगनाला याप्रकरणी नव्याने नोटीस बजावली आहे.

असे आहे अवैध बांधकाम:

  • इलेक्ट्रिक फिटिंगचे संक सिमेंटने भरून त्याचा कार्पेट एरियासाठी वापर केला गेला आहे.
  • झाडे लावण्यासाठीच्या जागेवर जीना बांधला आहे.
  • खिडकीवरचे लोखंडाचे ग्रील काढून बाल्कनी म्हणून वापर केला गेला आहे.
  • काही भींती तोडून बाल्कनीत रूपांतर करून एक खोली बनवण्यात आली आहे.
  • तिन्ही फ्लॅटसाठी दिलेल्या कॉमन जागेवर अवैध दरवाजा बनवण्यात आला आहे.
  • तिन्ही फ्लॅट जोडण्यासाठी कॉमन भींतीचीही तोडफोड करण्यात आली.

बीएमसीच्या दाव्यानुसार, हे सगळे बांधकाम कंगनाच्या कार्यालयाच्या तुलनेत अधिक गंभीर उल्लंघन आहे़ तिने अक्षरश: नियमांची पायमल्ली केली आहे.

 

News English Summary: It is learned that after Kangana’s office, the Mumbai Municipal Corporation issued a notice to her from her flat at Khar West, Kangana. Kangana has a flat in a building in Khar West, Mumbai. Kangana lives on the fifth floor of this building. On the fifth floor, Kangana has not one but three flats. These three flats are named after Kangana. The three flats were registered on March 8, 2013.

News English Title: Kangana Ranaut gets another blow from BMC notice regarding illegal construction at Khar west house Marathi News LIVE latest updates.

हॅशटॅग्स

Bollywood(88)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x