15 January 2025 6:15 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 1 रुपयाचा पेनी स्टॉक तेजीत, गुंतवणूकदारांची मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2025 Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर मालामाल करणार, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN Penny Stocks | 1 रुपया 31 पैशाचा शेअर मालामाल करतोय, अप्पर सर्किट हिट, यापूर्वी 589% परतावा दिला - Penny Stocks 2025 Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांना दर महिन्याला 20,000 रुपये मिळतील, ही सरकारी योजना ठरेल खूप फायद्याची NBCC Share Price | पीएसयू NBCC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मिळेल मजबूत परतावा - NSE: NBCC IREDA Share Price | मल्टिबॅगर इरेडा शेअर मालामाल करणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली - NSE: IREDA Apollo Micro Systems Share Price | अपोलो मायक्रो सिस्टीम शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: APOLLO
x

Kangana Vs Hrithik Roshan| आर्यनवरून आता कंगना मैदानात | म्हणाली माफिया त्याला पाठिंबा देत आहेत

Kangana Vs Hrithik Roshan

मुंबई, ०७ ऑक्टोबर | बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशनने अलीकडेच सोशल मीडियावर एक पोस्ट लिहित शाहरुख खानचा मुलगा आर्यनला पाठिंबा दिला (Kangana Vs Hrithik Roshan) आहे. हृतिकने आर्यनला या कठीण काळातून बाहेर पडण्याची प्रेरणा दिली आहे. हृतिकची पोस्ट समोर आल्यानंतर आता कंगना रनोटने आर्यन खानला पाठिंबा देणा-यांचा समाचार घेतला आहे.

Kangana Vs Hrithik Roshan. Bollywood actor Hrithik Roshan has recently written a post on social media in support of Shah Rukh Khan’s son Aryan. Hrithik has inspired Aryan to come out of this difficult time. After Hrithik’s post came to light, now Kangana Ranaut has taken the news of Aryan Khan’s supporters :

कंगनाने आपल्या सोशल मीडियावर एक स्टोरी शेअर करताना लिहिले, ‘आता सर्व माफिया पप्पू आर्यन खानच्या बचावासाठी पुढे येत आहेत. आपण चुका करतो पण आपण त्याचा अभिमान बाळगू नये. मला खात्री आहे की त्याला एक दृष्टीकोन मिळेल आणि त्याच्या कृत्याच्या परिणामांची जाणीव होईल. हे खरे आहे की जेव्हा कोणी संकटात असेल तेव्हा आपण त्याच्याबद्दल गॉसिप करू नये. त्याने जे केले ते चुकीचे नव्हते, याची त्याला जाणीव करुन देणे हा गुन्हा आहे.’

कंगनाची ही पोस्ट समोर येण्यापूर्वी तिचा पुर्वाश्रमीचा प्रियकर आणि अभिनेता हृतिक रोशनने आर्यनला पाठिंबा देणारी पोस्ट शेअर केली होती. त्यात त्याने आर्यनला या परिस्थितीतून बाहेर पडण्याची शिकवण दिली होती. हृतिकने लिहिले होते, ‘माझा प्रिय आर्यन, जीवन हा एक विचित्र प्रवास आहे. कारण अनेक गोष्टी या अनिश्चित असतात. ईश्वर फार दयाळू आहे. तो कणखर व्यक्तींनाच कठीण चेंडू खेळण्याची संधी देतो.’ असे म्हणत हृतिकने संयमी आणि एखाद्या कठीण परिस्थितीचा सामना करण्याची हिंमत दाखवणाऱ्यांवरच असा प्रसंग येतो असे सांगण्याचा प्रयत्न केला आहे.

पुढे हृतिक म्हणाला, ‘तू आता या परिस्थितीचा सामना करत आहे. तुमच्यामधील एका हिरोला बाहेर आणण्यासाठी या गोष्टी आयुष्यात होणे गरजेचे आहे. पण सावध रहा. कारण या गोष्टी तुझ्यामधील दयाळूपणा, प्रेम अशा अनेक गोष्टींवर परिणाम करतात.’

हृतिक रोनच्या या पोस्टवर त्याची पुर्वाश्रमीची पत्नी सुझान खान हिने प्रतिक्रिया देताना हेच सत्य आहे, असे लिहिले. हृतिकच्या या पोस्टवर काही नेटक-यांनी मात्र ड्रग्ज प्रकरणात अडकलेल्या आर्यनला पाठिंबा दिल्याबद्दल त्याला ट्रोलदेखील केले आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.

News Title: Kangana Vs Hrithik Roshan after Hrithik Roshan supported Aryan Khan.

हॅशटॅग्स

#KanganaRanaut(8)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x