24 November 2024 5:52 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | बचतीवर 5 कोटी रुपये परतावा हवा असल्यास 40x20x50 फॉर्म्युला शक्य करेल, टिप्स फॉलो करा - Marathi News Property Knowledge | वडिलांच्या मालमत्तेवर मुलींचा किती हक्क, 'या' परिस्थितीत मुली वडिलांकडे मालमत्ता मागू शकत नाहीत SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Multibagger Stocks | पैशाचा पाऊस पाडतोय हा मल्टिबॅगर शेअर, तब्बल 4300% परतावा दिला, फायद्याची अपडेट - BOM: 543620 IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Sarkari Schemes | गुंतवणुकीसाठी 3 फायद्याच्या सरकारी योजना, सरकार देईल 8.2% पर्यंत परतावा, माहिती जाणून घ्या - Marathi News SBI Online | सरकारी SBI बँकेची जबरदस्त योजना, 50,000 रुपयांची गुंतवणूक देईल 13 लाखांपर्यंत परतावा - Marathi News
x

रिया शवगृहात गेलीच कशी | मानवाधिकार आयोगाची रिया, मुंबई पोलीस, कूपर हॉस्पिटलला नोटीस

Maharashtra state human rights commission, Notice to cooper hospital, Mumbai police, Rhea Chakraborty

मुंबई, 26 ऑगस्ट : सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणी सीबीआयचा तपास वेगाने सुरू आहे. दरम्यान याप्रकरणामध्ये अंमली पदार्थांचा अँगल समोर आल्याने मोठी खळबळ उडाली होती. त्यामुळे सुशांत सिंह राजपूत प्रकरणात नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो (NCB) देखील लवकरच तपास सुरू करतआहेत. ते ड्रग अँगलवरुन या प्रकरणाचा तपास केला जाणार आहे. नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोचे संचालक राकेश अस्थाना यांनी एका वृत्त वाहिनीशी फोनवर बातचीत करताना सांगितले की, आम्ही सुशांतच्या प्रकरणात तपास सुरू करीत आहोत.

काही मीडिया अहवालानुसार रियाचे WhatsApp चॅट समोर आल्याने अंमली पदार्थ तस्करीचे प्रकरण देखील समोर येत आहे. तिने काही लोकांशी बातचीत केल्याचे या अहवालात म्हटले आहे. दरम्यान रियाच्या वकिलाने या सर्व आरोपांते खंडन केले आहे. दिल्ली एनसीबीचे मुख्यालय आर के पुरम येथे काल संध्याकाळी एक महत्त्वपूर्ण बैठक झाली. आजसुद्धा रात्री 11 वाजता दिल्ली मुख्यालयात एक महत्त्वाची बैठक होणार आहे.

दरम्यान, रिया चक्रवर्तीच्या गळ्याभोवतीचा फास आणखीनच घट्ट होत चालला आहे. दरम्यान, सुशांतच्या मृत्यूनंतर त्याचा मृतदेह कूपर हॉस्पिटलमध्ये शवविच्छेदनासाठी नेण्यात आला होता. तेथील शवगृहात त्याला ठेवण्यात आले आहे. तेव्हा रिया चक्रवर्तीदेखील शवगृहात केली होती. मात्र रियाला शवगृहात जाण्याची परवानगी दिलीच कशी, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. याकरता महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोगाने रियाला कूपर रुग्णालयाच्या शवगृहात प्रवेश करण्यास परवानगी मिळाल्याबद्दल कूपर हॉस्पिटल तसेच मुंबई पोलिसांना नोटीस पाठविली आहे. तसेच रियाला परवानगी मिळालेल्या नियमांचे तपशील ते शोधत आहेत, अशी माहिती मानवाधिकार आयोगाचे अधिकारी एम. ए. सईद यांनी दिली.

 

News English Summary: Maharashtra State Human Rights Commission sends notice to Cooper Hospital & Mumbai Police for allowing Rhea Chakraborty to enter the mortuary of Cooper Hospital & seeks details of the regulation following which she was allowed says MA Sayeed MSHRC.

News English Title: Maharashtra state human rights commission sends notice to cooper hospital Mumbai police for allowing Rhea Chakraborty to enter the mortuary News Latest Updates.

हॅशटॅग्स

#SushantSinghRajput(113)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x