22 January 2025 3:18 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NTPC Share Price | एनटीपीसी शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, मजबूत परतावा मिळेल - NSE: NTPC Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE Top Up SIP | पगारदारांनो SIP गुंतवणूक नाही तर Top Up SIP करून बंपर परतावा मिळवा, पैशांचा पाऊस पडेल Jio Finance Share Price | नव्या व्यवसायात जिओ फायनान्शियल कंपनीचा प्रवेश, तज्ज्ञांचा शेअर्सबाबत महत्वाचा सल्ला - NSE: JIOFIN Tata Technologies Share Price | टाटा टेक सहित या 6 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATATECH IPO GMP | आला रे आला IPO आला, संधी सोडू नका, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, फक्त 14,700 गुंतवून एंट्री घ्या Nippon India Small Cap Fund | पगारदारांनो गुंतवणूक 4-5 पटीने वाढवायची आहे, या फंडात डोळेझाकुन पैसे गुंतवा, करोडोत कमाई
x

सॅम्युअल मिरांडा आणि रियाकडून सुशांतच्या डेबिट कार्डचा गैरवापर | ईडी'कडून सखोल चौकशी

Sushant Singh Rajput, Debit Card, Samuel Miranda, Rhea Chakraborty

मुंबई, २९ ऑगस्ट: सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचा तपास 19 ऑगस्ट रोजी सीबीआयकडे सोपवण्यात आला. त्यानंतर सीबीआयची टीम मुंबई दाखल झाली आणि सध्या सांताक्रुझ मधील DRDO गेस्ट हाऊसवर सुरु आहे. सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती हिची चौकशी सुरु असून तिला पोलिस सुरक्षा देण्याची विनंती सीबीआयने केली आहे. या विनंतीवरुन चौकशीसाठी बाहेर पडणाऱ्या रिया चक्रवर्ती हिला तिच्या घरापासून DRDO गेस्ट हाऊसपर्यंत पोलिस सुरक्षा देण्यात येणार आहे. अशी माहिती मुंबई पोलिसांकडून देण्यात आली आहे.

दरम्यान, अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणात ईडीच्या चौकशीतून धक्कादायक माहिती समोर आली आहे. ईडीने रिया चक्रवर्ती आणि मॅनेजर सॅम्युअल मिरांडाचे (Samuel Miranda) मोबाईल क्लोन केले. यातून मिळालेल्या माहितीनुसार रियाने सुशांतचे डेबिटकार्ड चोरले होते. शिवाय सॅम्युअल मिरांडाकडून त्याचा एटीएम पिनही घेतला होता. सॅम्युअल आणि रियाचे संगनमत असून त्यांनी सुशांतच्या पैशाचा वापर केल्याचीही माहिती आहे. २०१७पासून रिया चक्रवर्ती ड्रग्जचे सेवन करत होती. व्हॉट्सऍप चॅटवरुन तिने अनेकवेळा गांजा, सीबीडीसारखे अंमली पदार्थ सेवन केल्याचे समोर आले आहे.

सुशांत आत्महत्या प्रकरणात सीबीआयकडून आजही रिया चक्रवर्तीची चौकशी करण्यात येत आहे. तर सिद्धार्थ पिठानी, सॅम्युअल मिरांडा आणि कूक नीरज सिंग, रजत मेवाणी यांची डीआरडीओ गेस्ट हाऊसवर पुन्हा एकदा सीबीआय चौकशी सुरू झाली आहे. आत्तापर्यंत सीबीआयने रिया, शौविक, इंद्रजित चक्रवर्ती यांच्यासह सिद्धार्थ पिठाणी, नीरज, रजत मेवाती, महेश आणि सॅम्युअल मिरांडा यांची चौकशी केली.

 

News English Summary: ED’s probe into actor Sushant Singh Rajput’s death has revealed shocking information. The ED cloned the mobile of Riya Chakraborty and manager Samuel Miranda. According to the information obtained from this, Riya had stolen Sushant’s debit card. He also took his ATM PIN from Samuel Miranda.

News English Title: Misuse of Sushant debit card by Samuel Miranda and Rhea Chakraborty News Latest Updates.

हॅशटॅग्स

#SushantSinghRajput(113)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x