23 February 2025 10:20 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Home Loan EMI | एसबीआय गृहकर्जाचे व्याजदर घटले, EMI मध्ये दरमहा इतकी बचत होऊन लाखोंचा फायदा होणार Gratuity on Salary | प्रायव्हेट नोकरदारांसाठी खुशखबर, ग्रॅच्युइटी एकूण 3,46,154 रुपयांची रक्कम खात्यात जमा होणार EPFO Money Alert | खासगी नोकरी करणाऱ्यांच्या खात्यात EPF चे 1,01,29,237 रुपये जमा होणार, तुमचा महिना पगार किती Personal Loan EMI | 'या' कामांसाठी पर्सनल लोन घेत असाल तर वेळीच थांबा, होतील गंभीर परिणाम, इथे जाणून घ्या माहिती SBI FD Interest Rate | 'या' बँका FD गुंतवणुकीवर उत्तम व्याज देत आहेत, 4 ते 6 लाखांच्या FD वर किती परतावा मिळेल पहा Home Loan Interest Rate | पगारदारांनो, 'या' बँका देत आहेत सर्वाधिक स्वस्त गृहकर्ज, घराची स्वप्नपूर्ती साकार होणार Horoscope Today | रविवार 23 फेब्रुवारी, कसा असेल 12 राशींच्या लोकांचा रविवार, तुमचे राशी भविष्य जाणून घ्या
x

कंगणाला जास्त महत्व देण्याच्या गरज नाही | ती पोलिसांसमोर येण्यास घाबरतेय

MP Sanjay Raut, Kangana Ranaut

पुणे, ३१ ऑक्टोबर: शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज (३१ ऑक्टोबर) पुण्यात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केले. ते असे म्हणाले की, बाळासाहेबांच्या काळात राजकारणाचा केंद्रबिंदू मुंबईत होता, आता पुण्यात असल्याचं शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत म्हणाले आहेत. ठाकरे सरकार कोसळेल, अशा पैजा लागल्या होत्या; पण सरकार पूर्ण ताकतीने चालतंय आणि चालेल, असं संजय राऊतांनी सांगितलं आहे.

“महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिदू पुणे राहिलं आहे. बाळासाहेब ठाकरे होते तोपर्यंत तो मुंबईत होता. अनेक काळ देशाचं आणि राज्याचं राजकारण बाळासाहेबांमुळे मुंबईतून घडत होतं, बदलत होतं. आता सगळे प्रमुख लोक पुण्यात आहेत,” असं संजय राऊत यांनी म्हटलं. पुढे बोलताना संजय राऊत यांनी महाविकास आघाडी सरकारला होणाऱ्या वर्षपूर्तीनिमित्त भाष्य केलं.

पुढे ते म्हणाले की, “मधला काही काळ संकटाचा होता. उद्धव ठाकरेंच्या जागी दुसरी कोणती व्यवस्था असती तर वेगळं काही घडलं नसतं. किंबहुना उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वात संपूर्ण लढाई चांगल्या प्रकारे मॅनेज केली. इतर राज्यांमध्ये जाऊन पाहिलं तर त्याचं महत्त्व पटेल. इतर राज्यांमध्ये आपण करत आहोत त्यातील कोणत्याही सुविधा नाहीत. उद्धव ठाकरेंनी आरोग्यविषयक संकटाशी लढताना नेतृत्व केलं, म्हणून कमी हानी झाली अन्यथा अराजक झालं असतं”.

तर, अभिनेत्री कंगना रानौत हिच्यावरुन प्रशअन विचारला असता त्यावर ते असे म्हणाले की, कंगणाच्या विषयांबाबत जास्त महत्व देण्याच्या गरज नाही. आणि कंगना पोलिसांसमोर येण्यास घाबरत असल्याचे वक्तव्य देखील संजय राऊत यांनी दिले आहे. कंगना आणि संजय राऊत यांच्यात वाद अगदी शिगेला पोहोचला होता.

 

News English Summary: When asked about actress Kangana Ranaut, Prashant said that there is no need to give much importance to Kangana’s issues. Sanjay Raut has also stated that Kangana is afraid to appear before the police. The dispute between Kangana and Sanjay Raut had reached a climax.

News English Title: MP Sanjay Raut said no need to give more importance to Kangana Ranaut News latest updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Sanjay Raut(262)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x