22 January 2025 6:01 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | नोकरदारांनो बँक FD विसरा, 'या' म्युच्युअल फंड योजना 31 टक्केपर्यंत परतावा देत पैशाने पैसा वाढवतील Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, स्टॉक BUY करावा का - NSE: TATASTEEL Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप कंपनीच्या नफ्यात घट, तरीही ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: TATATECH Penny Stocks | प्राईस 88 पैसे, एका वडापावच्या किंमतीत 20 शेअर्स खरेदी करा, यापूर्वी 633% परतावा दिला - Penny Stocks 2025 Apollo Micro Systems Share Price | डिफेन्स कंपनी शेअरने 1 महिन्यात 53% परतावा दिला, खरेदीची संधी सोडू नका - NSE: APOLLO Infosys Share Price | आयटी स्टॉक इन्फोसिसवर टॉप ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस मोठा परतावा देणार - NSE: INFY Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल कंपनीबाबत मोठी अपडेट, शेअर मालामाल करणार - NSE: JIOFIN
x

बाबर आणि त्याचं सैन्य | लोकशाहीची हत्या | कंगनाचा ट्विटरवरून संताप

Mumbai BMC, Kangana Ranaut

मुंबई, ९ सप्टेंबर : आज ९ सप्टेंबरला कंगना मुंबईत येणार आहे. मुंबईतील खारमध्ये कंगनाचं घर आहे. पाली हिल परिसरात तिचं कार्यालय आहे. या कार्यालयाची काल मुंबई महापालिकेच्या काही अधिकाऱ्यांनी पाहणी केली होती. कार्यालय अनधिकृत नाही ना, रस्त्यावर अतिक्रमण तर झालेलं नाही ना, याची तपासणी करण्यासाठी अधिकारी आले होते.

कंगनाच्या कार्यालयात सध्या रंगरंगोटीचं काम सुरू आहे. त्यांचीही पालिकेच्या अधिकाऱ्यांनी जुजबी चौकशी केली. कार्यालयाशेजारी असणाऱ्या बंगल्यांचीदेखील पाहणी करण्यात आली. त्यावेळी अधिकाऱ्यांनी शेजारीच असलेल्या रस्त्यांचीही मोजणी केली होती. त्यामुळे आता पालिका काय कारवाई करणार, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं.

दरम्यान, कंगना रानौत आणि शिवसेना यांच्यात वाकयुद्ध सुरू असताना आता कंगनाचं मुंबईतील कार्यालय महापालिकेच्या रडारवर आहे. काल पालिका अधिकाऱ्यांनी कंगनाच्या पाली हिलमधील कार्यालयाची पाहणी केल्यानंतर आता अनधिकृत बांधकाम तोडण्याच्या कामाला लागली आहे. त्यासाठी बुलडोझर आणि हातोडे घेऊन कर्मचारी कंगनाच्या कार्यालयाकडे पोहोचले आहे.

मात्र त्यानंतर कंगना संतापल्याचं पाहायला मिळत आहे. याबाबत तिने ट्विट करताना म्हटलं आहे की, “बाबर आणि त्याचं सैन्य….लोकशाहीची हत्या” असं म्हटलं आहे. त्यामुळे आता राज्य सरकार आणि कंगनाची वाद विकोपाला जाण्याची शक्यता आहे.

 

News English Summary: Actor Kangana Ranaut has accused the Brihanmumbai Municipal Corporation of vandalising her office space. Kangana took to Twitter to share a video of what she claimed to be BMC officials in her private property. This comes days ahead of her return to Mumbai, which has been a matter of controversy because of her recent comments against the city.

News English Title: Mumbai BMC staff reached to demolish Kangana Ranaut office at Palihill Marathi News LIVE latest updates.

हॅशटॅग्स

Bollywood(88)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x