16 April 2025 6:22 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Home Loan | एसबीआय बँकेच्या कर्जाचे दर कमी झाले, आता गृहकर्जासाठी किती व्याज द्यावे लागेल पहा Horoscope Today | 16 एप्रिल 2025, तुमच्यासाठी बुधवारचा दिवस कसा असेल? तुमचे बुधवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार बुधवार 16 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Reliance Power Share Price | पॉवर कंपनीचा पेनी स्टॉक पुन्हा तुफान तेजीत, शॉर्ट टर्म टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RPOWER Vodafone Idea Share Price | हा पेनी स्टॉक मालामाल करणार, सध्याच्या लेव्हल पासून 63 टक्के परतावा मिळेल - NSE: IDEA Yes Bank Share Price | येस बँक शेअर्समध्ये तेजी, पेनी स्टॉकची जोरदार खरेदी, तज्ज्ञांनी काय म्हटलं - NSE: YESBANK Rattan Power Share Price | अप्पर सर्किट हिट, पेनी स्टॉकवर गुंतवणूकदार तुटून पडले, संधी सोडू नका - NSE: RTNPOWER
x

अध्ययन सुमनची मुलाखत बनणार आधार | राज्य सरकार कंगनाच्या ड्रग्स कनेक्शकनची चौकशी करणार

Mumbai Police to investigate, Kangana Ranaut, Drugs, Adhyayan Suman old interview, Marathi News ABP Maza

मुंबई, ८ सप्टेंबर : ड्रग्ज प्रकरणी अभिनेत्री कंगनाचीही चौकशी केली जाणार असल्याची माहिती महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज विधानसभेत दिली. मुंबई आणि महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्या कंगनाविरोधात कारवाई केली जावी यासंदर्भात प्रताप सरनाईक यांनी विधानसभा अध्यक्षांकडे तक्रार केली होती.

त्यावर उत्तर देत असताना महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ड्रग्ज प्रकरणात कंगनाचीही चौकशी केली जाणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. कंगना रणौतचे अध्ययन सुमनशी प्रेमसंबंध होते. त्याने एका मुलाखतीत असं सांगितलं होतं की कंगना ड्रग्ज घेते आणि मलाही घेण्यासाठी बळजबरी करते. त्यामुळे या प्रकरणी आता मुंबई पोलीस चौकशी करतील असंही अनिल देशमुख यांनी स्पष्ट केलं आहे.

शिवनेता नेते सुनील प्रभू आणि प्रताप सरनाईक यांनी अध्ययन सुमनच्या एका जुन्या मुलाखतीची कॉपी महाराष्ट्र सरकारला सोपवली आहे. या मुलाखतीत अध्ययन सुमनने आरोप केला होता, की कंगना ड्रग घेते आणि ती त्यालाही बळजबरी करत होती. यानंतर सरकारणे चौकशीचे आदेश दिले आहेत. महाराष्ट्र पोलीस या प्रकरणाची चौकशी करतील.

 

News English Summary: Maharashtra Government has ordered a probe to investigate the allegation on Kangana Ranaut of consuming drugs. The inquiry has been ordered on the basis of Adhyayan Suman’s old interview in which he had claimed Kangana being forcing her to do drugs. Maharashtra’s Home Minister Anil Deshmukh has confirmed the order to Mumbai Police.

News English Title: Mumbai Police to investigate Kangana Ranaut taking drugs after Adhyayan Suman old interview goes viral Marathi News LIVE latest updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Bollywood(88)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या