15 January 2025 2:24 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Apollo Micro Systems Share Price | अपोलो मायक्रो सिस्टीम शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: APOLLO Quant Mutual Fund | पगारदारांनो, टॅक्स वाचेल आणि पैसा 3 ते 4 पटीने वाढेल, ही म्युच्युअल फंड योजना मालामाल करेल IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, प्राईस बँड सह डिटेल्स नोट करा, कमाईची संधी सोडू नका 8th Pay Commission | 8'व्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी IRFC Share Price | IRFC शेअर विक्रमी उच्चांकावरून 69 टक्क्यांनी घसरला, आता फायद्याची अपडेट आली - NSE: IRFC Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन शेअरबाबत मोठे संकेत, तज्ज्ञांकडून SELL रेटिंग, नेमकं कारण काय - NSE: NTPCGREEN
x

NCB Arrested Aryan Khan | आर्यन ड्रग्ज घेऊ शकतो, सेक्स करु शकतो | शाहरुखचा जुना व्हिडीओ व्हायरल

NCB Arrested Aryan Khan

मुंबई, ०३ ऑक्टोबर | क्रूजवर सुरु असलेल्या ड्रग्ज पार्टी प्रकरणी शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला NCB ने अटक केली आहे. शाहरुखसह आणखी ७-८ जणांवर ही कारवाई करण्यात आली आहे. शनिवारी रात्री NCB ने छापेमारी केल्यानंतर ताब्यात घेण्यात आलेल्यांपैकी एक शाहरुखचा मुलगा आर्यन (NCB Arrested Aryan Khan) असल्याची माहिती समोर आली होती.

NCB Arrested Aryan Khan in connection with a drug party on a cruise. After that, an old video of Shah Rukh Khan is going viral on social media. In reply, Shah Rukh said, ‘I told him that when you grow up, you can go after girls. You can take drugs, you can have sex. It would be better if he started this as soon as possible, he said :

NCB च्या या कारवाईनंतर शाहरुखच्या मन्नत या बंगल्याबाहेर मीडियाने गर्दी केली आहे. या धामधुमीत शाहरुखचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ सिमी ग्रेवाल यांच्या Rendezvous with Simi Grewal या कार्यक्रमाचा असून शाहरुख आणि गौरी आई-बाबा झाल्यानंतर त्यांनी ही मुलाखत दिली होती.

या मुलाखतीत सिमी ग्रेवाल यांनी शाहरुखला, मला खात्री आहे की तू तुझ्या मुलाला बिघडवशील असं म्हटलं. ज्यावर उत्तर देताना शाहरुखने, “नाही असं काही नाहीये. मी त्याला सांगितलं की तू जेव्हा ३-४ वर्षांचा होशील त्यावेळी तू मुलींच्या मागे जाऊ शकतोस. ड्रग्ज घेऊ शकतोस, सेक्स करु शकतोस. त्याने हे लवकरात लवकर सुरु केलं तर बरं होईल”, असं उत्तर दिलं.

आर्यन बिघडलेला मुलगा व्हायला हवा जर तो अगदी शहाण्या मुलासाराखा वागायला लागला तर मी त्याला घराबाहेर काढेन. माझे जे सह कलाकार आहेत ज्यांना मुली आहेत त्यांच्याकडून मला आर्यनविषयी तक्रारी ऐकायच्या आहेत असंही शाहरुख म्हणाला. त्यावेळी गमतीमध्ये बोलून गेलेल्या या वक्तव्याचा धागा पकडून आता सोशल मीडियावर शाहरुखला आणखीनच ट्रोल केलं जातंय.

ड्रग्ज केस प्रकरणात आर्यन खानचं नाव समोर आल्यामुळे अनेकांना धक्का बसला आहे. आर्यन हा शाहरुखचा मुलगा असला तरीही त्याने आतापर्यंत स्वतःला झगमगाटापासून दूर ठेवलं होतं. कोणत्याही बॉलिवूड पार्टी किंवा अन्य समारंभांमध्ये तो दिसायचा नाही. शाहरुख सध्या NCB अधिकाऱ्यांशी संपर्कात असून सध्या काय घडामोडी घडत आहेत याबद्दल तो माहिती घेतो आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.

News Title: NCB Arrested Aryan Khan old video of Shahrukh Khan gone viral.

हॅशटॅग्स

Bollywood(88)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x