22 January 2025 12:19 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Technologies Share Price | टाटा टेक सहित या 6 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATATECH IPO GMP | आला रे आला IPO आला, संधी सोडू नका, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, फक्त 14,700 गुंतवून एंट्री घ्या Nippon India Small Cap Fund | पगारदारांनो गुंतवणूक 4-5 पटीने वाढवायची आहे, या फंडात डोळेझाकुन पैसे गुंतवा, करोडोत कमाई Bank Account Alert | तुमच्या बँक अकाउंटमध्ये किती रोख रक्कम ठेवावी लक्षात ठेवा, अन्यथा इन्कम टॅक्स नोटीस आलीच समजा EPFO Passbook | तुमच्या पगारातून EPF कापला जातोय, खात्यात जमा होणार 1,56,81,573 रुपये, पगाराप्रमाणे रक्कम जाणून घ्या HDFC Mutual Fund | श्रीमंत करणारी HDFC म्युच्युअल फंडाची योजना, मिळेल तगडा परतावा, इथे पैसा वेगाने वाढतो SBI Mutual Fund | नोकरदारांनो बँक FD विसरा, 'या' म्युच्युअल फंड योजना 31 टक्केपर्यंत परतावा देत पैशाने पैसा वाढवतील
x

Nitesh Rane Vs Khan Surname | कारण ते 'खान' आहेत? | त्या प्रकरणात नितेश राणेंनी सलमानला दाखवलेली सहानुभूती

Nitesh Rane Vs Khan Surname

मुंबई, 0९ ऑक्टोबर | राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी एनसीबीच्या कारवाईवर आक्षेप घेत अनेक दावे केले आहेत. यावेळी भाजपवरही निशाणा साधला. यातच आता भाजप आमदार नितेश राणे यांनी नवाब मलिक यांना प्रत्युत्तर देत ‘खान’ असल्यामुळे नवाब मलिकांची आदळआपट सुरू आहे का, असा थेट सवाल (Nitesh Rane Vs Khan Surname) विचारला आहे.

Nitesh Rane Vs Khan Surname. NCP leader Nawab Malik has made several claims objecting to the NCB’s action. This time BJP was also targeted. Now, BJP MLA Nitesh Rane, while replying to Nawab Malik, has directly asked whether Nawab Malik’s clash is going on as he is ‘Khan’ :

क्रूझ ड्रग्स प्रकरणात आणखी एक मोठी माहिती समोर आली असून, आता एनसीबीने या प्रकरणात सुपरस्टार शाहरुख खानच्या वाहन चालकाला चौकशीसाठी बोलावले आहे. आतापर्यंत खान कुटुंब किंवा त्याच्याशी संबंधित कोणत्याही व्यक्तीची चौकशी झालेली नाही. दरम्यान, क्रुझवरील ड्रग्स पार्टी प्रकरणात NCBने एकूण ११ जणांना ताब्यात घेतले होते. मग यातील तिघांना कुणाच्या निर्देशावरून सोडण्यात आले, असा प्रश्न मलिकांनी उपस्थित केला आहे. अवघ्या तीन तासांतच भारतीय जनता युवा मोर्चाचे माजी अध्यक्ष मोहित भारती यांचा मेहुणा वृषभ सचदेवा, प्रतिक गाभा आणि आमिर फर्निचरवाला यांना सोडण्यात आले, असा दावा करत भाजपवर टीका केली. यानंतर भाजप आमदार नितेश राणे यांनी नवाब मलिक यांना प्रत्युत्तर दिले आहे.

नवाब मलिक यांची आदळआपट का सुरू आहे, कारण तो खान आहे, सुशांत सिंह राजपूत नाही. तसेच खान नाव असल्यामुळे तो पीडित आहे का आणि सुशांत हिंदू होता, त्यामुळे तो ड्रग्ज अॅडिक्ट झाला का, अशी विचारणा नितेश राणे यांनी ट्विटरवरून केली आहे.

हिट अँड रन प्रकरणी कोर्टाकडून सलमान खानला शिक्षा आणि नितेश राणेंची सहानुभूती:
बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानला मे २०१५ मध्ये हिट अँड रन प्रकरणी शिक्षा सुनावण्यात आली होती. त्यावेळी अभिनेता सलमान खानबद्दल सहानुभूती दाखवीत नारायण राणे यांचे पुत्र आमदार नीतेश राणे यांनी अभिनेता सलमान खानची त्याच्या घरी जाऊन भेट घेत त्याच्याबद्दल सहानुभूती दाखवली होती.

त्यावेळी भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी म्हणाले होते, ‘कायद्याचा मान राखण्यासाठी ज्याने प्रामाणिकपणे कर्तव्यपुर्ती केली, त्या पोलिस कर्मचाऱ्याच्या कुटुंबीयांना भेटायला हे गेली नाहीत. त्यांना सामान्य जनतेशी काही घेणे-देणे नाही.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.

News Title: Nitesh Rane Vs Khan Surname politics over NCP allegation on NCB.

हॅशटॅग्स

#Nitesh Rane(100)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x