महत्वाच्या बातम्या
-
कोणत्या फेक न्यूज फॉलो करते ही? | म्हणाली, समजलं की ते गंगा नदीतील नाही तर नाजयेरियातील फोटो
देशातील उत्तरेकडील राज्यांमध्ये कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. त्यात बिहार आणि उत्तर प्रदेशात स्मशान भूमीत २-३ दिवसांचा वेटिंग लागत असल्याने कोरोना प्रेतातून दुर्गंधी पसरत असल्याचं देखील समोर आलं आहे. परिणामी बिहार आणि उत्तर प्रदेशातील कोरोना रुग्णांचे नातेवाईक धक्कादायक मार्ग स्वीकारून स्वतःला मोकळे करत असल्याचं पाहायला मिळतंय. बिहार मधील गंगा नदीत जवळपास १०० मृत कोरोना बॉडी फेकल्याचं आढळून आलं आहे आणि अगदी तसाच प्रकार उत्तर प्रदेशातील गंगा नदीत देखील पाहायला मिळाला होता. त्यामुळे स्थानिक प्रशासनाला घाम फुटला आहे.
4 वर्षांपूर्वी -
नको तिथे विवादित वक्तव्य | कंगना स्वतःच ठरतेय स्वतःची ब्रँड व्हॅल्यू कमी होण्यामागील कारण
पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकींच्या निकालानंतर कंगना रानौत ट्विटरवर नको ते बरळली आणि यानंतर ट्विटरने तिचे अकाऊंट सस्पेंड केले. ट्विटरच्या या कारवाईनंतर कंगनाची सटकलीये, पण बॉलिवूडच्या एका गटात मात्र आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले. रिचा चड्ढा, स्वरा भास्कर, गुलशन देवैया आणि हंसल मेहता यांनी कंगनाचे ट्विटर अकाऊंट सस्पेन्ड होताच प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे आनंद साजरा केला आहे.
4 वर्षांपूर्वी -
कंगणाचा कोरोना रिपोर्ट पॅाझिटिव्ह | म्हणाली 'हर हर महादेव', मी त्याचा नाश करणार!
देशामध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असेल्या प्रत्येक विषयावर स्वत:चं मतं मांडण्यात आघाडीवर असणाऱ्या कंगणा राणावतला अखेर कोरोनाची लागण झालेली आहे.कंगणाने गेल्या वर्षभरात अनेक मुद्दयांवक महाराष्ट्र सरकार,उद्धव ठाकरे,संजय राऊत यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत.कंगणा भाजपशी निगडीत असल्याचा आरोप तिच्यावर सातत्याने होत असतो.
4 वर्षांपूर्वी -
हृतिक आणि कंगनाची धमकी ई-मेल प्रकरणाची चौकशी वाझेंचं युनिट करत होतं
मनसुख हिरेन प्रकरणामध्ये सचिन वाझे यांच्यावर कारवाई करण्यात आली. यानंतर राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. हिरेन प्रकरण विरोधी पक्षनेत्यांनी उचलून धरले. यासोबतच मुंबई पोलिसांवर केलेल्या आरोपांबद्दल सत्ताधारी आणि विरोधीपक्ष समोरासमोर आले आहेत.
4 वर्षांपूर्वी -
कोरोना लस घेतल्याने सैफ अली खान ट्रोल | तो वरिष्ठ नागरिक आहे का?
बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानने कोरोना लसीकरणाच्या तीसऱ्या टप्प्यात लस घेतली आहे. मात्र त्याने लस घेतल्यानंतर त्याला समाज माध्यमांवर प्रचंड ट्रोल करण्यात येत आहे.
4 वर्षांपूर्वी -
शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या बॉलीवूड कलाकारांना किंमत चुकवावी लागतेय - शिवसेना
आयकर विभागाने बुधवारी मुंबई आणि पुण्यातील 4 बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घर आणि ऑफिसवर छापे टाकले. अभिनेत्री तापसी पन्नू, निर्माता अनुराग कश्यप, विकास बहल आणि मधु मंटेना हे चार सेलिब्रिटी आयकर विभागाच्या रडारवर आले आहेत. सलग दुस-या दिवशीदेखील ही कारवाई सुरु होती. पुढील दोन ते तीन दिवस ही कारवाई अशीच सुरु राहणार असल्याचे सांगितले जात आहे.
4 वर्षांपूर्वी -
बॉलिवूडकरांवर आयकर विभागाच्या धाडी | अनेक मोदी विरोधक कलाकार रडारवर?
आयकर विभागाने मुंबईत अनेक बॉलिवूडकरांवर धाडी टाकल्या आहेत. यामध्ये अभिनेत्री तापसी पन्नू, दिग्दर्शक- निर्माता अनुराग कश्यप आणि ‘क्वीन’चा निर्माता विकास बहलच्या घरी इनकम टॅक्स विभागाने धाड टाकली आहे. मुंबईत अनेक ठिकाणी हे धाडसत्र सुरु आहे. अचानक पडलेल्या या धाडीने बॉलिवूडमध्ये खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे मोदी आणि मोदी समर्थकांचे विरोधक असणारे कलाकार यामध्ये अधिक असल्याची चर्चा समाज माध्यमांवर सुरु झाली आहे.
4 वर्षांपूर्वी -
स्वयंघोषित फिल्मी झाशीची राणी कंगनाला शिवसैनिकांची भीती वाटतेय | असं पाऊल उचललं....
बॉलिवूडची अभिनेत्री कंगना राणावत आणि तिची बहिण रंगोली चंडेल यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. महाराष्ट्रामध्ये दाखल करण्यात आलेले तिन्ही खटले हिमाचल प्रदेशमधील न्यायालयात हलवण्यात यावे अशी मागणी कंगनाने केली आहे. शिवसेनेच्या नेत्यांकडून आपल्या जीवाला धोका असल्याचा दावा कंगना राणावतने केला आहे. कंगनावर सध्या ३ खटले सुरू आहे. वादग्रस्त ट्वीट केल्या प्रकरणी कंगनावर खटलाही सुरू आहे.
4 वर्षांपूर्वी -
VIDEO | रितेश आणि जेनेलियाचा पैसा पैसा गाण्यावर डान्स | आणि घडलं...
बॉलिवूडच स्वीट कपल अभिनेता रितेश देशमुख आणि पत्नी अभिनेत्री जेनेलिया डिसूजा हे दोघे देखील समाज माध्यमांवर नेहमीच सक्रीय असतात. दोघेही त्यांचे फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांसाठी शेअर करतात. यावेळी दोघांच्या आणखी एका व्हिडीओला चाहत्यांचे विशेष प्रेम मिळते आहे. हा व्हिडीओ पूल पार्टीचा आहे यामध्ये दोघं मस्ती करताना दिसत आहेत.
4 वर्षांपूर्वी -
Bhoot Police Movie | 'भूत पोलिस' चित्रपट 'या' दिवशी होणार प्रदर्शित
मागील कित्येक दिवसांपासून चर्चेत असलेला सैफ अली खान, अर्जुन कपूर स्टारर ‘भूत पोलिस’ चित्रपटाचे पहिले पोस्टर समोर आले आहे. या चित्रपटात सैफ अली खान आणि अर्जूनसह जैकलिन फर्नांडिस, यामी गौतम प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. हा एक हॉरर कॉमेडी चित्रपट असल्याचे सांगितले जात आहे. सप्टेंबर 2020 मध्ये या सिनेमाची घोषणा करण्यात आली होती. लॉकडाऊनमुळे हा चित्रपट रखडल्याने याचे शूटिंग उशिराने सुरु झाले. आज या चित्रपटाचे पहिले पोस्टर समोर आले असून यात चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख देखील समोर आहे.
4 वर्षांपूर्वी -
VIDEO | हेल्मेट व मास्क न घालता बाईक चालवली | विवेक ओबेरॉयवर गुन्हा दाखल
बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉय विरुध्द वाहतूक नियमांनुसार ट्रॅफिक पोलिसांनी कारवाई केली आहे. विनाहेल्मेट आणि विनामास्क बाईक चालवल्याने विवेकला दंड ठोठावण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी विवेक ओबेरॉयने हेल्मेटशिवाय दुचाकी चालवल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते डॉ. बीनु वर्गीस यांनी मुंबई पोलिसांना ट्विटर करून केली होती. त्यानंतर मुंबई पोलिसांनी ही कारवाई केली.
4 वर्षांपूर्वी -
रामचंद्र कह गए सिया से | ऐसा कलयुग आएगा | गाडी खरीदोगे कॅश से | पेट्रोल लोनसे आएगा - अमिताभ
मागील काही दिवसांपासून पेट्रोल डिझेलच्या दरांमध्ये सातत्यानं वाढ होत आहे. यामुळे सर्वसामान्यांचं कंबरडं मोडलं आहे. देशातील काही राज्यांमध्ये पेट्रोलच्या दरांनी शंभरी गाठली आहे. तर काही राज्यांमध्ये पेट्रोल शंभरीच्या उंबरठ्यावर आहे. राज्यातील प्रमुख शहरांमध्ये पेट्रोल लवकरच शंभरी पार करेल. पेट्रोल, डिझेलच्या किमती सातत्यानं वाढत असल्यानं सामान्य नागरिक अक्षरश: मेटाकुटीला आले आहेत.
4 वर्षांपूर्वी -
अमिताभ बच्चन देशाचा आदर्श नाही | कॅनडाच्या अक्षयला भारतावर बोलण्याचा अधिकार काय?
सुप्रसिद्ध अभिनेते अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी फटकारल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसनंही त्यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. देशातील प्रश्नावर बोलण्याचा अक्षय कुमारला बोलण्याचा अधिकार नाही. तो कॅनडाचा नागरिक आहे. तर अमिताभ बच्चन काही देशाचा आदर्श नाहीत, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी या दोन्ही अभिनेत्यावंर टीकास्त्र डागलंय.
4 वर्षांपूर्वी -
आमची सत्ता असताना इंधन दरवाढीवर टीव-टीव करणारे अमिताभ, अक्षय गप्प का? - नाना पटोले
देशात आता पेट्रोलने शंभरी गाठली आहे. पण तरीही इंधन दरवाढीवरून कोणी बोलायला तयार नाहीत. काँग्रेस सरकारच्या काळात इंधन दरवाढीवरून टीव टीव करणारे सुपरस्टार अमिताभ बच्चन आणि अभिनेता अक्षय कुमार आता गप्प का आहेत? आता त्यांना इंधन दरवाढ दिसत नाही का? असा संतप्त सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.
4 वर्षांपूर्वी -
RSS प्रमुख मोहन भागवत आणि मिथुन चक्रवर्ती यांची भेट | प. बंगाल निवडणूक तयारी?
सरसंघचालक मोहन भागवत यांनी प्रख्यात अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांची भेट घेतली. दीड तासापेक्षा जास्त काळ दोघांमध्ये चर्चा रंगली. ही भेट कौटुंबिक स्वरुपाची असल्याची माहिती चक्रवर्तींनी दिली. मात्र आगामी पश्चिम बंगाल निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या भेटीला राजकीय महत्त्व आहे.
4 वर्षांपूर्वी -
Valentine Day Special | वाचा श्रेयस तळपदेची भन्नाट लव्ह स्टोरी
मराठमोळ्या श्रेयसने बॉलीवूडमध्ये देखील वेगळी ओळख निर्माण केली. श्रेयस त्याच्या या यशाचे सगळे श्रेय त्याच्या पत्नीला देतो. त्याची पत्नी नेहमी त्यासोबत खंभीरपणे उभी होती. म्हणून तो करिअरमध्ये एवढा पुढे जाऊ शकला. श्रेयस आणि दिप्तीची लव्ह स्टोरी देखील तेवढीच रंजक आहे. दोघांची भेट एका कार्यक्रमामध्ये झाली होती. दिप्तीला पाहताच क्षणी श्रेयस तिच्या प्रेमात पडला होता. त्याने वेळ न घालवता दिप्तीला लग्नासाठी प्रपोज केले. जाणून घेऊया दिप्ती आणि श्रेयसची लव्ह स्टोरी.
4 वर्षांपूर्वी -
आधी बांधकाम अनधिकृत नसल्याचा कांगावा | आता बेकायदेशीर बदल नियमित करण्यासाठी अर्ज
कंगनाच्या खारमधील राहत्या फ्लॅटवर केलेल्या मुंबई महापालिकेच्या कारवाईविरोधात मुंबई हायकोर्टात दाखल केलेली याचिका अखेर कंगनाकडून मागे घेण्यात आली आहे. बेकायदेशीर बदल नियमित करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेकडे रितसर अर्ज करणारअसून कंगनाच्या अर्जावर चार आठवड्यांत निकाल देणं बीएमसीला बंधनकारक असणार आहे. जर निकाल कंगनाच्या विरोधात गेला तर कारवाईला दोन आठवड्यांची स्थगिती देण्यात देईल असा आदेश हायकोर्टाने दिला आहे.
4 वर्षांपूर्वी -
अभिनेते राजीव कपूर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन
आज ज्येष्ठ अभिनेते राजीव कपूर यांचं वृद्धापकाळाने निधन झालं. ते ५८ वर्षांचे होते. चेंबूर येथील इंलॅक्स इस्पितळात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्याने चित्रपट सृष्टीवर शोककळा पसरली आहे. ते ऋषी कपूर आणि रणधीर कपूर यांचे छोटे भाऊ होते.
4 वर्षांपूर्वी -
भारतात कंगनाची सत्ता असल्याप्रमाणे ट्विटरला धमकी | म्हणाली भारतात तुमचा TikTok करेन
टि्वटरने अभिनेत्री कंगना रणौतचे दोन टि्वटस काढून टाकले आहेत. कंगनाच्या या टि्वटसमुळे टि्वटरच्या नियमांचे उल्लंघन होत असल्यामुळे हे टि्वटस हटवण्यात आले. शेतकरी आंदोलनाचे समर्थन करणाऱ्या प्रत्येक सेलिब्रिटी बरोबर कंगनाचा सध्या वाद सुरु आहे. टि्वटरवरुन कंगना अत्यंत जिव्हारी लागणाऱ्या शब्दांमध्ये टीका करत आहे.
4 वर्षांपूर्वी -
जर देशातील शेतकरी दहशतवादी असतील तर कंगना बुद्धिवान आहे | फराह खान'चा टोला
मागच्या दोन महिन्यांपासून देशाच्या राजधानीत शेतकरी आंदोलन सुरू आहे. दिल्लीमध्ये वेगवेगळ्या बॉर्डर्सवर कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन केलं आहे. या सगळ्यात जगप्रसिद्ध पॉपस्टार रिहानाने शेतकरी आंदोलनावरून एक ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये रिहानाने सीएनएनच्या एका बातमीचं ट्विट करत शेतकरी आंदोलनावरून ‘आपण याविषयी का विचार करत नाही’ असं तिने लिहलं आहे. पण रिहानाच्या या ट्वीटवर बॉलीवूड अभिनेत्री कंगना रानौतने टीका केली आहे.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Samsung Galaxy Smartphone | सॅमसंग गॅलेक्सीच्या 'या' सिरीजवर मिळतेय 12,000 रुपयांची सूट, संपूर्ण डिटेल्स इथे जाणून घ्या
- RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या स्पीडने कमाई होणार, मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट - NSE: RVNL
- BSNL Broadband Offer | BSNL ऑफर; मिळणार 1300GB डेटा सोबत अनलिमिटेड कॉलिंग सुद्धा, डिटेल्स जाणून घ्या
- Property Knowledge | वडिलांच्या संपत्तीवर किती कालावधीत हक्क सांगू शकता; वेळ निघून गेल्यानंतर कोर्टही काही करू शकणार नाही
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- RVNL Share Price | RVNL आणि Just Dial शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, मिळेल 190% परतावा - NSE: RVNL
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- Life Insurance Policy | लाईफ इन्शुरन्सचे एकूण प्रकार किती; तसेच जनरल आणि लाइफ इन्शुरन्समधील नेमका फरक काय लक्षात ठेवा