महत्वाच्या बातम्या
-
रिया चक्रवर्ती सुशांतला विष देत होती | तिच मारेकरी | सुशांतच्या वडिलांचा आरोप
अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या मृत्यूनंतर रोज नवनवे खुलासे होत असल्याने दिवसागणिक या प्रकरणाला नवं वळण मिळत आहे. आता सुशांत सिंग राजपूत याचे वडील के. के सिंह यांनी ANI वृत्त संस्थेला दिलेल्या माहितीमध्ये रिया चक्रवर्तीवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्यामते, ‘रिया सुशांत सिंह राजपूतला अनेक वर्षांपासून विष देत होती. रिया सुशांतच्या मृत्यूला जबाबदार आहे. तपास यंत्रणांनी रियासोबत तिच्या सहकार्यांना अटक करावी’. मुंबईमध्ये सध्या सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूचा तपास करण्यासाठी सीबीआयची टीम दाखल आहे.
4 वर्षांपूर्वी -
नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो'कडून रिया चक्रवर्ती विरुद्ध FIR दाखल | अटकेची शक्यता
अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणाला वेगळं वळण मिळालं आहे. या प्रकरणी ड्रग्जचा पुरवढा होत असल्याची माहिती मिळाल्याने Narcotics Control Bureau म्हणजे NCBने रिया विरुद्ध FIR दाखल केला असून त्यामुळे रिया चक्रवर्ती आणखी अडचणीत आली आहे. अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे होत आहेत. सीबीआय, ईडी आणि Narcotics Control Bureau, NCB या तपास संस्था या प्रकरणात चौकशी करत आहेत.
4 वर्षांपूर्वी -
तो भारताविरोधात असणाऱ्या चीन, तुर्कीचा लाडका | संघाचं आमिर खानवर टीकास्त्र
नुकताच तुर्कीचे राष्ट्रपती रजब तैयब एर्दोगन यांची पत्नी एमी एर्दोगान यांनी अभिनेता आमिर खानची (Aamir Khan) भेट घेतल्याचे फोटो व्हायरल झाल्यानंतर आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (RSS) आमिरवर निशाणा साधला आहे. आमिर हा चीनमधील (China) सत्ताधारी पक्षाचा लाडका असल्याचा टोला संघाने आपल्या ‘पांचजन्य’ मुखपत्रामधून लगावला आहे. तसेच भारताविरोधात असणाऱ्या देशांबद्दल आमिरच्या भूमिकेसंदर्भात प्रश्न या लेखामध्ये उपस्थित करण्यात आले आहे.
4 वर्षांपूर्वी -
रिया शवगृहात गेलीच कशी | मानवाधिकार आयोगाची रिया, मुंबई पोलीस, कूपर हॉस्पिटलला नोटीस
सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणी सीबीआयचा तपास वेगाने सुरू आहे. दरम्यान याप्रकरणामध्ये अंमली पदार्थांचा अँगल समोर आल्याने मोठी खळबळ उडाली होती. त्यामुळे सुशांत सिंह राजपूत प्रकरणात नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो (NCB) देखील लवकरच तपास सुरू करतआहेत. ते ड्रग अँगलवरुन या प्रकरणाचा तपास केला जाणार आहे. नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोचे संचालक राकेश अस्थाना यांनी एका वृत्त वाहिनीशी फोनवर बातचीत करताना सांगितले की, आम्ही सुशांतच्या प्रकरणात तपास सुरू करीत आहोत.
4 वर्षांपूर्वी -
शांत स्वभावाच्या सुशांतचा...गांजा नंतर ड्रग्स सेवनाशी जोडला जातोय संबंध?
सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणी सीबीआयचा तपास वेगाने सुरू आहे. दरम्यान याप्रकरणामध्ये अंमली पदार्थांचा अँगल समोर आल्याने मोठी खळबळ उडाली होती. त्यामुळे सुशांत सिंह राजपूत प्रकरणात नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो (NCB) देखील लवकरच तपास सुरू करतआहेत. ते ड्रग अँगलवरुन या प्रकरणाचा तपास केला जाणार आहे. नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोचे संचालक राकेश अस्थाना यांनी एका वृत्त वाहिनीशी फोनवर बातचीत करताना सांगितले की, आम्ही सुशांतच्या प्रकरणात तपास सुरू करीत आहोत.
4 वर्षांपूर्वी -
सीबीआय'कडून मुंबई पोलिसांच्या तपास अधिकाऱ्यांना चौकशीसाठी समन्स
अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्येप्रकरणी सीबीआयच्या विशेष पथकाने आता यापूर्वी तपास करणाऱ्या मुंबई पोलिसांच्या कार्यपद्धतीकडे नजर वळविली आहे. वांद्रे पोलीस ठाण्यातील या प्रकरणाचे तपास अधिकारी निरीक्षक भूषण बेळणेकर व उपनिरीक्षक वैभव जगताप यांना चौकशीला हजर मंगळवारी समन्स बजाविण्यात आले आहे. त्यांनी केलेला तपास, त्यातील संथगती आणि त्रुटी आदीबाबत त्यांच्याकडे बुधवारी सखोल विचारणा केली जाईल,अशी माहिती प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना मिळाली आहे.
4 वर्षांपूर्वी -
आत्महत्येच्या दिवशी सुशांत दुबईच्या ड्रग डीलरला भेटला होता
अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात अनेक नवनवे खुलासे समोर येत असताना आता भाजपचे राज्यसभेतील खासदार सुब्रह्मण्यम स्वामी यांनी एक मोठा दावा केला आहे. ‘आत्महत्या झाली त्या दिवशी सुशांत सिंह राजपूत दुबईच्या एका ड्रग डिलरला भेटला होता. त्यामुळे त्याच्या मृत्यूमध्ये दुबईच्या ड्रग डिलरचं कनेक्शन आहे’, असं सुब्रह्मण्यम स्वामी यांचं म्हणणं आहे.
4 वर्षांपूर्वी -
VIDEO | अनन्या पांडे, ईशान खट्टरच्या 'खाली पिली' सिनेमाचा टीझर प्रदर्शित
बॉलिवूडमध्ये नव्या दमाचे कलाकार ईशान खट्टर आणि अनन्या पांडे ही जोडी रुपेरी पडद्यावर झळकण्यास आता सज्ज झाली आहे. ‘खाली पिली’ या त्यांच्या सिनेमामधील लूक्सची चर्चा मागील काही दिवस सुरू होती. अशामध्ये आता खाली पिलीचा पहिला टीझर रसिकांच्या भेटीला आला आहे. धडाकेबाज अंदाजामधील त्यांचा पहिला टीझर सिनेमात मुंबईचं दर्शन घडवणार आहे. तर ईशान आणि अनन्या नॉन ग्लॅमरस आणि हटके अंदाजात रसिकांसमोर येणार आहेत.
4 वर्षांपूर्वी -
सुशांतच्या मृतदेहाचे घाईत शवविच्छेदन का | डॉक्टरांनी थेट मुंबई पोलिसांकडे बोट दाखवलं?
सीबीआयच्या १५ सदस्यांची टीम या प्रकरणावर काम करत असून या टीमचे पाच छोट्या तुकड्या करण्यात आले आहेत. सुशांतसिंह मृत्यूप्रकरणी कूपर हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी सीबीआयकडे काही धक्कादायक खुलासे केल्याची माहिती समोर येत आहे. सुशांतचं पोस्टमॉर्टम करणाऱ्या ५ डॉक्टरांची सीबीआयने चौकशी केली. या डॉक्टरांच्या चौकशीसाठी सीबीआयने काही महत्त्वाचे प्रश्न तयार केले आहे.
4 वर्षांपूर्वी -
सुशांत आत्महत्या प्रकरण | सीबीआयकडून शवविच्छेदन करणाऱ्या डॉक्टरांची चौकशी
सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येप्रकरणी सीबीआय चौकशी करत आहे. कूपर रुग्णालयात शवविच्छेदन करणाऱ्या डॉक्टरांची सीबीआयकडून चौकशी पूर्ण झाली आहे. त्यानंतर आता सीबीआय ची टीम करिनाच्या डीआरडीओ येथे दाखल झाली आहे. सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणात सिद्धार्थ पिठाणी याची चौकशी डीआरडीओ कलिना येथे सुरु आहे.
4 वर्षांपूर्वी -
BREAKING: सुशांतचे गोड कौटूंबिक नातेसंबंध दाखवण्यासाठी माध्यमांकडून खोटे व्हिडिओ प्रसारित
सुशांतच्या मृत्यूची चौकशी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सीबीआयकडे दिली जाणार आहे. मात्र तत्पूर्वी रिया चक्रवर्तीने एप्रिलमध्ये सुशांतची बहिण प्रियंकाने तिला विचित्रप्रकारे स्पर्श करून तिचा विनयभंग केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर सुशांतच्या कुटूंबीयांशी त्याचे संबंध चांगले राहिले नव्हते असा दावा रिया चक्रवर्ती यांनी केला होता.
4 वर्षांपूर्वी -
सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर सुशांतच्या एक्स गर्लफ्रेंडची प्रतिक्रिया
अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात सुप्रीम कोर्टाने आज महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. या मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआय करणार असल्याचा निकाल सुप्रीम कोर्टाने दिला आहे. सुप्रीम कोर्टाने सर्व पुरावे सीबीआयकडे सोपवण्याचा आदेश मुंबई पोलिसांना दिला आहे. पाटणामध्ये दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याचा तपास मुंबई पोलिसांकडे वर्ग करा, अशी मागणी एका याचिकेच्या माध्यमातून अभिनेत्री रिया चक्रवर्तीने केली होती. त्यावर आज सुप्रीम कोर्टाने निकाल दिला.
4 वर्षांपूर्वी -
सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास CBI'कडे | ठाकरे सरकारला धक्का
अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात सुप्रीम कोर्टाने आज महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. या मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआय करणार असल्याचा निकाल सुप्रीम कोर्टाने दिला आहे. सुप्रीम कोर्टाने सर्व पुरावे सीबीआयकडे सोपवण्याचा आदेश मुंबई पोलिसांना दिला आहे. पाटणामध्ये दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याचा तपास मुंबई पोलिसांकडे वर्ग करा, अशी मागणी एका याचिकेच्या माध्यमातून अभिनेत्री रिया चक्रवर्तीने केली होती. त्यावर आज सुप्रीम कोर्टाने निकाल दिला.
4 वर्षांपूर्वी -
सलमान खानच्या हत्येचा कट | शार्प शूटरला अटक
अभिनेता सलमान खान चाहते जगभरात आहे, मात्र त्याच्यासोबत शत्रुत्व असणारेही कमी नाही आहेत. यातूनच एक धक्कादायक प्रकार घडणार आहे. हरियाणा, पंजाब आणि राजस्थानचा कुख्यात गँगस्टर लॉरेंस बिश्नोईच्या गँगने सलमान खानच्या हत्येचा कट रचला होता. दरम्यान, पोलिसांनी या शार्प शुटरला अटक केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
सुशांत प्रकरणी केंद्राला वाटत असेल तर त्यांनी CBI चौकशी करावी | काँग्रेसकडून धक्का?
सुशांतसिंग राजपूत या अभिनेत्याच्या आत्महत्येबाबत सुरू असलेल्या पोलीस तपासाबद्दल राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार व या सरकारचे गृहमंत्री अनिल देशमुख हे समाधान व्यक्त करीत असताना अचानक पार्थ यांनी विरोधी भाजपच्या मागणीत सूर मिसळत सीबीआय चौकशीची मागणी केली होती. त्यानंतर शरद पवार यांनी तिखट प्रतिक्रिया दिल्यानंतर राज्यात मोठं वादळ निर्माण झालं होतं. मात्र आता तशीच अप्रत्यक्ष मागणी काँग्रेसच्या मंत्र्याने केल्याने पुन्हा वादळ निर्माण होण्याची शक्यता आहे.
4 वर्षांपूर्वी -
आदित्य ठाकरेंबाबत रिया चक्रवर्तीकडून अधिकृत खुलासा | वकिलांमार्फत निवेदन प्रसिद्ध
बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजूपत याच्या आत्महत्येनंतर देशभर वादळ निर्माण झालं. सुशांतच्या कुटुंबासह भाजपने या प्रकरणाच्या तपासाबाबत मुंबई पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं. महाराष्ट्र सरकारमधील एका युवा मंत्र्यांच्या दबावामुळे सुशांत आत्महत्या प्रकरणात योग्य दिशेने तपास होत नसल्याचा आरोप करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र आणि कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधण्यात आला. त्यामुळे आदित्य ठाकरे आणि सुशांतची गर्लफ्रेण्ड रिया चक्रवर्तीची भेट झाली का, याबाबत चर्चा सुरू होती. मात्र आता याप्रकरणी अखेर रिया चक्रवर्तीने खुलासा केला आहे.
4 वर्षांपूर्वी -
दिग्दर्शक निशिकांत कामत काळाच्या पडद्याआड
‘मुंबई मेरी जान’, ‘दृश्यम’, ‘फोर्स’, ‘मदारी’ यांसारख्या बॉलिवूड चित्रपटांचे मराठमोळे दिग्दर्शक निशिकांत कामत यांचे निधन झाले. हैदराबादमधील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. ते ५० वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून निशिकांत यांना यकृताचा आजार होता, त्यांचं हेच दुखणं पुन्हा एकदा बळावल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
4 वर्षांपूर्वी -
सुशांतने फ्लॅट घेऊन दिल्याचा आरोप झाला | अंकिताने दिले पुरावे आणि....
सुशांतसिंग राजपूत आत्महत्या प्रकरणात एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडे यांचा साडेचार कोटींचा फ्लॅटचा ईएमआय अभिनेता स्वत: भरत असल्याचा एक नवीन खुलासा समोर आला आहे. पण, आता स्वत: अभिनेत्रीने सोशल मीडियावर या आरोपांबाबत स्पष्टीकरण दिले असून पुरावे दाखवून सत्य दाखविले आहे. अंकिताने बँक स्टेटमेंट फोटो सोशल मीडियावर शेअर केला आणि म्हटले की फ्लॅटची देयकेची ही बाब चुकीची आहेत.
4 वर्षांपूर्वी -
सुशांतच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करणाऱ्या रुग्णालयातील डॉक्टरांची कसून चौकशी करा - सुब्रमण्यम स्वामी
अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूसंदर्भात भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी सोमवारी आणखी एक खळबळजनक दावा केला. सुशांतचा मृतदेह रुग्णवाहिकेतून शवविच्छेदनासाठी नेला जात असताना त्याचा घोट्याखालील पाय फिरलेला (तुटल्यासारखा) होता. रुग्णवाहिकेतील कर्मचाऱ्यांकडून ही माहिती पुढे आली होती. त्यामुळे केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने CBI सुशांतच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करणाऱ्या कूपर रुग्णालयातील पाच डॉक्टरांची कसून चौकशी केली पाहिजे. त्याशिवाय, या प्रकरणाचा गुंता सुटणार नाही, असे ट्विट सुब्रमण्यम स्वामी यांनी केले.
4 वर्षांपूर्वी -
मुंबई पोलीस रियाला वाचवण्याच्या प्रयत्नात | सुशांतच्या वडिलांकडून कोर्टात प्रतिज्ञापत्रही सादर
बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर त्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती मुख्य आरोपीच्या जाळ्यात अडकल्याचे दृष्य समोर येत आहे. या प्रकरणी ईडीने रियाची तब्बल ८ तास चौकशी केली. त्यानंतर आता तिचा भाऊ शोविक चक्रवर्ती वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. ईडीकडून शोविकची देखील चौकशी करण्यात आली आहे. शनिवारी रात्री ईडी कडून चौकशी करण्यात ही चौकशी जवळपास १८ तास सुरू होती.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर HAL सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 57 टक्केपर्यंत परतावा - NSE: HAL
- Smart Investment | स्मार्ट गुंतवणुकीचा हा फॉर्म्युला तुम्हाला 2 कोटी रुपये परतावा देईल, समजून घ्या आणि श्रीमंत व्हा
- Tata Technologies Share Price | टाटा टेक शेअर नीचांकी पातळीवर, चार्टवर ओव्हरसोल्ड, BUY करावा की SELL - NSE: TATATECH
- LPG Gas New Connection | एलपीजी गॅस कनेक्शन योजनेसह मिळेल 450 रुपयांच्या गॅस सिलेंडरचं कनेक्शन, कसा अप्लाय करा
- RVNL Share Price | RVNL आणि Just Dial शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, मिळेल 190% परतावा - NSE: RVNL
- Tata Technologies Share Price | टाटा ग्रुपचा शेअर 30 टक्क्यांनी स्वस्त मिळतोय, स्टॉक BUY करावा का - NSE: TATATECH
- Life Insurance Policy | लाईफ इन्शुरन्सचे एकूण प्रकार किती; तसेच जनरल आणि लाइफ इन्शुरन्समधील नेमका फरक काय लक्षात ठेवा
- IRFC Share Price | आयआरएफसी शेअर बुलेट ट्रेनच्या गतीने मालामाल करणार, स्टॉक ब्रेकआऊट देणार, टार्गेट नोट करा - NSE: IRFC
- Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल सहित हे 4 शेअर्स फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN
- 8th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार आणि DA लवकरच वाढणार? 8'वा वेतन आयोगाबाबत महत्वाची अपडेट