महत्वाच्या बातम्या
-
करण जोहर आणि आदित्य ठाकरे चांगले मित्र, त्यामुळे अजून चौकशी झाली नाही - कंगना रानौत
अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमध्ये असलेल्या घरणेशाहीवरून वाद चांगलाचं पेटताना दिसत आहे. मुख्य म्हणजे या वादाच्या भोवऱ्यात अभिनेत्री कंगना रानौतने आता राज्याचे पर्यावरण मंत्री व शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांना देखील ओढले आहे. दिग्दर्शक करण जोहर आणि आदित्य ठाकरे एकमेकांचे चांगले मित्र असल्यामुळे अद्याप करणची चौकशी झाली नसल्याचा आरोप कंगनाने केला आहे.
4 वर्षांपूर्वी -
सुशांत सिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी पोलिसांनी आदित्य चोप्रांचा जबाब नोंदवला
अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येची बातमी सर्वांच्या मनाला चटका लावून गेली आहे. सध्या त्याच्या आत्महत्येप्रकरणी पोलीस कसून चौकशी करत आहेत. परंतु अद्यापही त्याच्या आत्महत्येमागचे ठोस कारण समोर आलेले नाही. सुशांतच्या आत्महत्येबाबतीत आतापर्यंत ३५ जबाब नोंदवण्यात आले आहेत. आता वांद्रे पोलिसांनी दिग्दर्शक आदित्य चोप्रांचा जबाब नोंदवला आहे. तब्बल चार तासांच्या या प्रक्रियेनंतर ते पोलीस स्थानकाबाहेर आले.
4 वर्षांपूर्वी -
अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन आणि मुलगी आराध्या कोरोना पॉझिटिव्ह
बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन आणि अभिनेता अभिषेक बच्चन या दोघांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांच्या कुटुंबातील सर्वांच्या चाचण्या घेण्यात आला. या चाचण्यांचा अहवाल आला असून अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन आणि अभिषेक-ऐश्वर्याची आठ वर्षांची मुलगी आराध्या यांनाही कोरोनाची लागण झाल्याचं समोर आले आहे. सुदैवाने जया बच्चन यांचा अहवाल निगेटीव्ह आला आहे.
5 वर्षांपूर्वी -
सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी संजय लीला भन्साळींची मुंबई पोलिसांकडून चौकशी
अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येप्रकरणी दिग्दर्शक संजय लीला भन्साळी चौकशीसाठी वांद्रे पोलीस ठाण्यात हजर झाले आहेत. सुशांतने १४ जून रोजी आत्महत्या केली. त्यानंतर कलाविश्वात एकच खळबळ उडाली आहे. बॉलिवूडमधील घराणेशाहीला कंटाळून सुशांतने आत्महत्या केल्याचं म्हटलं जात आहे. या प्रकरणी कलाविश्वातील अनेक दिग्गजांवर घराणेशाहीचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळेच सध्या पोलीस यंत्रणा या प्रकरणी कसून चौकशी करत आहे.
5 वर्षांपूर्वी -
सामान्यांना २ किमीच्या मर्यादा असताना अक्षय कुमार हेलिकॉप्टरने नाशिकला, चौकशीचे आदेश
बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार नाशिक दौऱ्यामुळे अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. जुलै महिन्याच्या सुरुवातीला अक्षय कुमार दोन दिवस नाशिकजवळ मुक्कामी होता. अक्षय कुमार हेलिकॉप्टरने नाशिकमध्ये आला होता त्यामुळे अक्षय कुमारचा हा दौरा वादात सापडण्याची शक्यता आहे. लॉकडाउनच्या काळात हेलिकॉप्टरला परवानगी व शहर पोलिसांनी दिलेला बंदोबस्त या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिले आहेत.
5 वर्षांपूर्वी -
सेतू App चा ब्रँड अँबेसिडर अजय देवगण भारत-चीन संघर्षावर फिल्म निर्मिती करणार
लडाखमधील गलवान खोऱ्या भारत आणि चीन सैन्यामध्ये झालेल्या हिंसक झटापटीवर लवकरच चित्रपट बनणार आहे. या झटापटीत शहीद झालेल्या भारताच्या 20 सैनिकांची शौर्यगाथा आणि पराक्रम मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. बॉलिवूड अभिनेता आणि निर्माता अजय देवगण हा चित्रपट बनवणार आहे. चित्रपट समीक्षण आणि ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी ट्वीट करुन याबाबत माहिती दिली.
5 वर्षांपूर्वी -
बॉलिवूडच्या प्रसिद्ध कोरिओग्राफर सरोज खान यांचे मुंबईत निधन
बॉलिवूडच्या प्रसिद्ध कोरिओग्राफर सरोज खान यांचे आज पहाटे मुंबईत निधन झाले. त्या ७१ वर्षांच्या होत्या. काही दिवसांपूर्वी त्यांना श्वास घेण्यात त्रास होत होता. त्यानंतर सरोज खान यांना २० जून रोजी वांद्रे येथील गुरु नानक रुग्णालयात दाखल केले होते. आज सरोज खान यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. तसेच त्यांची कोविड-१९ची चाचणीही घेतली होती. मात्र, त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला होता. दरम्यान, मालाड येथील मिठी चौकी कब्रिस्तानमध्ये सरोज खान यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आलेत.
5 वर्षांपूर्वी -
सुशांतचं सोशल मिडिया अकाऊंट दुसरं कोणतरी हाताळतंय? अनेक शंका उपस्थित
अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्या प्रकरणाचं कोडं अदयाप उलगडलेलं नाही. ही आत्महत्या नैराश्यामुळे नव्हे तर अन्य कारणामुळे झाली असल्याचा दावा अनेक चाहत्यांकडून केला जात आहे. तर काहीजण ही आत्महत्या नसून हत्या असल्याचं देखील बोलत आहेत. अशातच ज्येष्ठ अभिनेत्री आणि भाजप नेत्या रूपा गांगुली यांनी सुशांतच्या आत्महत्या प्रकरणाबाबत खळबळजक आरोप केले आहेत. सुशांतचं सोशल मिडिया अकाऊंट इतर कोणीतरी हाताळत असल्याचा आरोप रूपा यांनी केला आहे. यासंदर्भातील वृत्त एका माध्यमाने दिलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
अक्षय तू कार वापरणं बंद केलं आहेस का? वर्तमानपत्र वाचत नाहीस का? - जितेंद्र आव्हाड
लॉकडाऊन शिथिल झाल्यापासून आज सलग १९व्या दिवशी पेट्रोल-डिझेल महागले आहे. दररोज होणाऱ्या या इंधन दरवाढीमुळे ग्राहकांचे कंबरडे मोडून निघाले आहे. आज दिल्लीत पेट्रोलच्या दरात १६ पैशांची तर डिझेलच्या दरात १४ पैशांची वाढ करण्यात आली. या दरवाढीनंतर दिल्लीत पेट्रोलचे दर ७९.९२ रुपये प्रति लिटर तर डिझेलचे दर ८०.०२ रुपये प्रति लिटर इतके झाले आहेत. यासह राजधानीत डिझेलच्या दराने पहिल्यांदाच ८० रुपयांचा टप्पा पार केला आहे.
5 वर्षांपूर्वी -
सुशांतच्या आत्महत्येनंतर सलमानची प्रथमच समाज माध्यमांवर प्रतिक्रिया
सुशांतसिंगच्या आत्महत्येनंतर बॉलिवूड इंडस्ट्रीमधील नेपोटीझ्मवर जोरदार चर्चा रंगतेय. सलमान खान, आलिया भट्ट, सोनम कपूर, करिना कपूर, शाहीद कपूर, सैफ अली खान यांच्यावर चहुबाजुनी टीका होतेयं. या सेलिब्रिटींच्या सोशल मीडियावरील अकाऊंटवरील फॉलोअर्स कमी झालेयत. त्यांनी शेअर केलेल्या पोस्टवरुन त्यांना ट्रोल केलं जातंय. ट्वीटरवर देखील सुशांत सिंह राजपूत नाव ट्रेंड होतंय. या पार्श्वभुमीवर सलमान खान पहिल्यांदाच बोललाय. सुशांतच्या फॅन्सना सपोर्ट करण्याचे आवाहन त्याने आपल्या फॅन्सना केलंय.
5 वर्षांपूर्वी -
बॉलिवूडचे प्रसिद्ध संगीतकार वाजिद खान यांचे निधन
अभिनेता इरफान खान आणि ऋषी कपूर यांच्या मृत्यूच्या धक्क्यातून सावरत असतानाच बॉलिवूडला आणखी एक धक्का बसला आहे. वॉन्टेड, दबंग, एक था टायगर यांसारख्या सुपरहिट चित्रपटांना संगीत देणारे प्रसिद्ध संगीतकार वाजिद खान यांचे निधन झाले आहे. ते अवघ्या ४२ वर्षांचे होते.
5 वर्षांपूर्वी -
बॉलिवूड अभिनेता इरफान खान यांचं निधन
बॉलिवूड अभिनेता इरफान खान यांचं वयाच्या ५४ व्या वर्षी निधन झालं. मंगळवारी कोलन इन्फेक्शनमुळे त्यांना इस्पितळात भरती करण्यात आलं होतं. यादरम्यान त्यांच्या आरोग्याविषयीच्या अनेक अफवा पसरत होत्या. मात्र इरफान यांच्या टीमने ते लढवय्ये असून लवकर बरे होतील अशी आशा व्यक्त केली होती. मात्र बुधवारी दिग्दर्शक शूजित सरकारने इरफान यांच्या निधनाचं ट्वीट करत खान कुटुंबियांचं सांत्वन केलं.
5 वर्षांपूर्वी -
कोरोनाविरोधातील लढाईसाठी अक्षय कुमारकडून २५ कोटींची मदत
जगभरात करोना विषाणूने हाहाकार माजवला असून जगभरात २४ हजारांहून अधिक रुग्णांचा बळी गेला आहे. भारतातही या विषाणूचा संसर्ग वाढत असून आतापर्यंत भारतात साडेसातशेहून अधिक लोकांना करोनाचा लागण झाली आहे. लॉकडाऊनचा आज चौथा दिवस असून करोनाची आज काय स्थिती आहे, याकडे सर्व भारतीयांचे लक्ष लागले आहे.
5 वर्षांपूर्वी -
लॉकडाउन'मध्ये नैराश्यात भर घालू नका; वाईनशॉप खुली करा
राज्यातील करोना रुग्णांचा आकडा थांबताना दिसत नाही. राज्यात आज पुन्हा सात नवे रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी मुंबईत पाच आणि नागपूरमध्ये दोन रुग्ण आढळल्याने राज्यातील करोना रुग्णांची संख्या १६०वर गेली आहे.दरम्यान, देशभरात करोनाचे १९ नवे रुग्ण आढळल्याने देशातील करोना रुग्णांची संख्या ८३४वर पोहोचली असून देशात आतापर्यंत २० जणांचा मृत्यू झाला आहे. संपूर्ण देशातच करोनाचे रुग्ण वाढत चालल्याने आरोग्य यंत्रणेसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे.
5 वर्षांपूर्वी -
तिचे हॉस्पिटलमध्ये VVIP देखभालीसाठी ‘नखरे’, हॉस्पिटलला भीती कनिकाच्या पळण्याची
बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका कनिका कोरोना पॉझिटीव्ह असल्याचं निदान झाल्यानंतर देशभरात एकच खळबळ उडाली. कारण तिला कोरोनाचं निदान होण्याआधी तिनं एका हायप्रोफाइल पार्टीमध्ये हजेरी लावली होती. त्यामुळे सध्या पार्टीत सहभागी झालेले सर्व लोक सेल्फ आयसोलेशनमध्ये आहेत. कनिकावर सर्वजण लोकांच्या आरोग्याशी खेळल्याचा आरोप करताना दिसत आहेत. दरम्यान कनिकावर FIR सुद्धा दाखल करण्यात आली आहे. त्यानंतर कनिकाबाबत आता नवी माहिती समोर आली आहे. कनिका ज्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे. त्या ठिकाणचा स्टाफ तिच्या नखऱ्यांमुळे वैतागला आहे. या हॉस्पिटलच्या डायरेक्टरनं स्वतः याबाबत माहिती दिली आहे.
5 वर्षांपूर्वी -
भाजप नेत्या वसुंधरा राजे सेल्फ आयसोलेशनमध्ये; त्या पार्टीत कणिकाची उपस्थित होती
बेबी डॉल, चिटियां कलाईया सारखी सुपरहिट गाणी देणारी गायिका कनिका कपूर हिची कोरोना टेस्ट पॉझिटीव्ह आल्यानं एकच खळबळ उडाली आहे. देशभरातील सर्वच सेलिब्रेटी घरी राहण्याची विनंती त्यांच्या चाहत्यांना करत आहे. हॉलिवूडच्या काही कलाकरांना आतापर्यंत कोरोनाची लागण झाली आहे. मात्र बॉलिवूड सेलिब्रेटींमध्ये अधिकृतरित्या कोरोना पॉझिटीव्ह असलेली कनिका कपूर ही पहिलीच सेलिब्रेटी आहे.
5 वर्षांपूर्वी -
गायिका कनिका कपूरला कोरोनाची लागण, त्या पार्टीत १०० सेलिब्रेटी सहभागी होते
बेबी डॉल, चिटियां कलाईया सारखी सुपरहिट गाणी देणारी गायिका कनिका कपूर हिची कोरोना टेस्ट पॉझिटीव्ह आल्यानं एकच खळबळ उडाली आहे. देशभरातील सर्वच सेलिब्रेटी घरी राहण्याची विनंती त्यांच्या चाहत्यांना करत आहे. हॉलिवूडच्या काही कलाकरांना आतापर्यंत कोरोनाची लागण झाली आहे. मात्र बॉलिवूड सेलिब्रेटींमध्ये अधिकृतरित्या कोरोना पॉझिटीव्ह असलेली कनिका कपूर ही पहिलीच सेलिब्रेटी आहे.
5 वर्षांपूर्वी -
कोणता विवेकी माणूस असं बोलतो? प्रतिगामी मूर्खपणाचं वक्तव्य: सोनम कपूर
शिक्षण आणि श्रीमंतीमुळे उद्धटपणा येतो आणि त्यामुळे घटस्फोट होतात असं अजब तर्कट सरसंघचालक मोहन भागवतांनी मांडलंय. घटस्फोटांचं प्रमाण हे सुशिक्षित आणि श्रीमंत कुटुंबात अधिक आहे असं भागवत म्हणालेत. हिंदू समाज व्यवस्थेला पर्याय नाही असा दावा त्यांनी केला. मात्र त्याचवेळी महिला सबलीकरणावर भर देताना महिलांना घरात डांबून ठेवण्याला त्यांनी कडाडून विरोध केला.
5 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- Health Insurance Premium | हेल्थ इंश्योरेंसचा प्रीमियम कमी करायचा असेल तर करा केवळ 'हे' एक काम; मोठी बचत होईल
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, स्टॉक मालामाल करणार, मोठा परतावा मिळणार - NSE: TATAPOWER
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- 5 Star Rating Cars | 10 लाखांपेक्षा कमी किंमतीच्या 5 स्टार रेटिंग कार खरेदी करण्याचं स्वप्न पाहत आहात, मग इथे लक्ष द्या
- Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन
- EPF Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला EPFO ची जास्तीत जास्त किती पेन्शन मिळेल; अर्ली पेन्शन नियम काय सांगतो
- Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांसाठी खास सरकारी स्कीम, महिना कमवाल 20,000 रुपये, जबरदस्त फायद्याची योजना