30 April 2025 5:20 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bonus Share News | फ्री बोनस शेअर्सचा पाऊस, 1 शेअरवर 4 फ्री शेअर्स देणार ही कंपनी, सुवर्ण संधी सोडू नका SBI Mutual Fund | श्रीमंत करणारी SBI फंडाची योजना, महिना 5,000 रुपये SIP वर मिळेल 2 कोटी 56 लाख रुपये परतावा 8th Pay Commission | तुमच्या कुटुंबात सरकारी आहेत का? फिटमेंट फॅक्टर + DA मर्जर; पगारात किती वाढ होईल पहा Home Loan EMI | ईएमआय वर 77 लाखांचं घर घ्यावं की SIP करावी? तुमचा अधिक फायदा कुठे आहे समजून घ्या EPFO Pension Money | खाजगी कंपनी कर्मचाऱ्यांनो, अन्यथा तुम्हालाही महिना कमी पेन्शन घ्यावी लागेल, ही अपडेट जाणून घ्या Horoscope Today | 30 एप्रिल 2025, तुमच्यासाठी बुधवारचा दिवस कसा असेल? तुमचे बुधवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या IRB Share Price | गुंतवणूकदारांसाठी अलर्ट; डाऊनसाइड टार्गेट प्राईस अलर्ट, स्टॉक BUY, Sell की Hold करावा? - NSE: IRB
x

तुमच्या घराची भिंत पडल्याने तुम्हाला काश्मिरी पंडितांची दुःख समजू शकत नाही

Shikara writer Rahul Pandita, Kangana Ranaut, Kashmiri Pandits pain, Marathi News ABP Maza

मुंबई, 9 सप्टेंबर: अभिनेत्री कंगना मुंबईत दाखल झाली आहे. विमानतळावरुन ती थेट तिच्या घरी पोहोचली आहे. Y प्लस सुरक्षेत कंगना विमानतळावरुन आपल्या खार येथील घरी आली आहे. मुंबई महापालिकेने कंगनाच्या कार्यालयावर कारवाई केली आहे. यावर आता कंगना आक्रमक झाली आहे. कंगनाने थेट आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख करत त्यांना आव्हान दिलं आहे.

यानंतरच्या एका ट्विटमधून कंगनानं थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला. विशेष म्हणजे तिनं मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख केला आहे. ”उद्धव ठाकरे तुला काय वाटतं, तू बॉलिवूड माफियांसोबत मिळून माझं घर उध्वस्त करून मोठा बदला घेतला आहेस? आज माझं घर मोडलं आहे, उद्या तुमचा हा अहंकार मोडून पडेल. वेळ नेहमी एकसारखी नसते. हे करून तुम्ही माझ्यावर खूप उपकार केले.. काश्मीरी पंडितांवर काय संकट आलं असेल हे माहीत होतं, परंतु आज मी ते स्वतः अनुभवलं. आज मी देशाला वचन देते की, मी फक्त अयोध्यावर नाही, तर काश्मीर पंडितांवरही चित्रपट तयार करणार. जय हिंद, जय महाराष्ट्र,” असं कंगनानं ट्विटमध्ये म्हटलं आहे.

मात्र, तिच्या या घोषणेनंतर ‘शिकारा’ या काश्मिरी पंडितांवर आधारित हिंदी चित्रपटाचे लेखक राहुल पंडिता यांनी नाराजी व्यक्त केली आहे. केवळ काश्मिरी पंडितांवर चित्रपट बनवल्याने तुम्ही त्यांचं दुःख समजू शकत नाही, अशा शब्दांत त्यांनी कंगनाला सुनावलं आहे. ट्विटद्वारे पंडिता याने आपल्या भावना व्यक्त केल्या.

पंडिता ट्विटमध्ये म्हणतात, “मला माफ करा, पण तुमच्या घराची भिंत पाडण्यावरून तुम्हाला काश्मिरी पंडितांची वेदना समजू शकत नाही. तीन दिवसांत आपले केस पांढरे झाले की काय? वृद्ध लोक वनवासात मरतात आणि शेवटच्या क्षणापर्यंत आपल्याला घर पाहण्यास न मिळाल्याबद्दल रडतात.”

“आपल्या फायद्यासाठी, आमचं नाव घेऊ नका. आम्हाला तुमच्या अहंकाराच्या लढाईतील प्याद व्हायचं नाही. उद्या तुमच्या बोटाला कुठेतरी दुखापत झाली आणि तुम्ही म्हणाल मला काश्मिरी पंडितांची वेदना समजली?” कृपया असं होतं नाही.” अशा शब्दांत पंडिता यांनी कंगनाला सुनावलं आहे.

 

News English Summary: Rahul Pandita, who has penned screenplay for Shikara, slammed actress Kangana Ranaut for announcing a film on Kashmiri Pandits. He said that she cannot understand their pain from the demolition of a wall. Kangana Ranaut, who is fighting for the justice for Sushant Singh Rajput, engaged in war of words with Shiva Sena leaders.

News English Title: Shikara writer Kangana Ranaut demolition wall you can not understand Kashmiri Pandits pain Marathi News LIVE latest updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Bollywood(88)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या