22 January 2025 10:08 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HDFC Mutual Fund | श्रीमंत करणारी HDFC म्युच्युअल फंडाची योजना, मिळेल तगडा परतावा, इथे पैसा वेगाने वाढतो SBI Mutual Fund | नोकरदारांनो बँक FD विसरा, 'या' म्युच्युअल फंड योजना 31 टक्केपर्यंत परतावा देत पैशाने पैसा वाढवतील Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, स्टॉक BUY करावा का - NSE: TATASTEEL Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप कंपनीच्या नफ्यात घट, तरीही ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: TATATECH Penny Stocks | प्राईस 88 पैसे, एका वडापावच्या किंमतीत 20 शेअर्स खरेदी करा, यापूर्वी 633% परतावा दिला - Penny Stocks 2025 Apollo Micro Systems Share Price | डिफेन्स कंपनी शेअरने 1 महिन्यात 53% परतावा दिला, खरेदीची संधी सोडू नका - NSE: APOLLO Infosys Share Price | आयटी स्टॉक इन्फोसिसवर टॉप ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस मोठा परतावा देणार - NSE: INFY
x

खोट्या घोड्यावर बसत | दुसऱ्याच्या स्क्रिप्ट वाचल्याने कोणी झाशीची राणी होत नाही - आदेश बांदेकर

Adesh bandekar, Shivsena, Kangana Ranaut, Marathi News ABP Maza

मुंबई, ५ सप्टेंबर : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रानौतच्या मुंबई वक्तव्यावरुन राज्यभरात वातावरण पेटलं आहे. मुंबईबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर महाराष्ट्रभर संताप व्यक्त होत आहे. अनेक ठिकाणी आंदोलनं होत असून कंगनाविरोधात शिवसेना आक्रमक झाली आहे. कंगनाला मुंबईमध्ये पाय ठेवू देणार नाही असा धमकीवजा इशारा बीडच्या शिवसेना महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी दिला आहे.

शनिवारी बीडमध्ये कंगनाचा निषेध करत प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली. यावेळी घोषणाबाजी करत मुंबईमध्ये पाय ठेवून दिला जाणार नाही, तसंच देशद्रोही वक्तव्य करणाऱ्या कंगनाला पाकिस्तानात पाठवा असा संताप शिवसेना महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

कंगनानं आपण इस्लाम डॉमिनेटेड क्षेत्रात आपलं करिअर आणि जीव पणाला लावत झाशीच्या राणीवर आणि छत्रपती शिवाजी महाराजांवर चित्रपट केल्याचा उल्लेखही केला होती. दरम्यान, आता शिवसेना नेते आदेश बांदेकर यांनी कंगना रणौतवर संताप व्यक्त केला आहे.

“खोट्या घोड्यावर बसत, दुसऱ्यानी लिहिलेले स्क्रिप्ट वाचल्याने कधी कोणी झाशीची राणी होत नाही. त्यासाठी कर्मभूमीवर खरी निष्ठा आणि श्रद्धा असावी लागते. जी झाशीच्या राणीनी अखेरपर्यंत जोपासली. कुणालाही राणीची उपमा देऊन झाशीच्या राणीचा अपमान करण्यात काही राम नाही,” असं बांदेकर म्हणाले. त्यांनी ट्विटरवरून आपला संताप व्यक्त केला आहे.

 

News English Summary: Sitting on a false horse, reading a script written by someone else, one never becomes the queen of Jhansi. It requires true devotion and faith in the karma. Which the Queen of Jhansi cherished till the end. There is no point in insulting the Queen of Jhansi by likening anyone to a queen, said Adesh Bandekar.

News English Title: Shiv Sena Leader Adesh Bandekar Criticize Slams Kangana Ranaut Mumbai Pok Statement No Will Be Called Jhansi Ki Rani Sitting On Fake Horse Marathi News LIVE latest updates.

हॅशटॅग्स

#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x