22 December 2024 1:24 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NHPC Share Price | NHPC सहित या 4 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC SIP Calculator | 12 बाय 12 चा फॉर्म्युला! 1000 रुपयांच्या बचतीतून मिळेल 1 कोटी रुपयांचा परतावा, लक्षात ठेवा SBI Mutual Fund | बिनधास्त गुंतवणूक करा, SBI फंडाची ही योजना श्रीमंत करतेय, संधी सोडू नका Motilal Oswal Mutual Fund | जबरदस्त फंड, 4 ते 5 पटीने परतावा मिळेल, दरवर्षी 44% दराने पैसा वाढले IRFC Share Price | IRFC सहित हे 4 शेअर्स मालामाल करणार, प्रभुदास लिलाधर ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: IRFC Quant Mutual Fund | पैशाचा पाऊस पाडत आहेत या म्युच्युअल फंड योजना, 10 लाखाचे होतील 67 लाख रुपये, पैसा वाढवा Mutual Fund SIP | बँक FD विसरा, श्रीमंतीचा मार्ग खुला करा, या फंडात 58 टक्क्यांनी पैसा वाढेल, लिस्ट सेव्ह करा
x

कंगनाची बाजू घेतली | त्या सर्वांची तोंडं काळी करून ती आज गेली - आ. प्रताप सरनाईक

Shivsena MLA Pratap Sarnaik, BJP leaders, Kangana Ranaut, Mumbai Exit, Marathi News ABP Maza

मुंबई, १४ सप्टेंबर : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रानौत आज सकाळी मुंबईतून मनालीसाठी रवाना झाली. मात्र जाता जाता कंगनानं महाराष्ट्र सरकार आणि शिवसेनेवर पुन्हा निशाणा साधला आहे. कंगनानं एका शेरोशायरीच्या माध्यमातून अप्रत्यक्षपणे शिवसेनेवर निशाणा साधत एका महिलेवर अन्याय करुन पक्षाची प्रतिमा मलिन केली आहे असा दावा तिने केला आहे.

त्याचसोबत कंगनानं आणखी एक ट्विट केले आहे त्यात लिहिलं आहे की, जड अंतकरणाने मी मुंबई जात आहे. ज्यारितीने माझ्यावर इतके दिवस हल्ले झाले. शिविगाळ केली, माझ्या कार्यालयानंतर आता घर तोडण्याचा प्रयत्न केला. माझ्या चहुबाजुने हत्यारबंद सुरक्षा यामुळे माझं पीओकेबद्दल बोलणं योग्य होतं असा उल्लेख तिने पुन्हा एकदा केला आहे.

दरम्यान, यावरून कंगनावर शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी टीका केली आहे. आ. सरनाईक यांनी ट्विट करताना म्हटलं आहे की, “कुत्रीचे शेपूट नळीत घातले तरी वाकडे ते वाकडेच’ या म्हणीचा अर्थ मला आज तंतोतंत कळला आहे. ज्या लोकांनी शिवसेनेला अडचणीत आणण्यासाठी गेले आठवडाभर कंगनाची बाजू घेतली, त्या सर्वांची तोंडे काळे करून ती आज गेली….आता मारा बोंबा…जय महाराष्ट्र !

 

News English Summary: Bollywood actress Kangana Ranaut left Mumbai for Manali this morning. However, Kangana has again targeted the Maharashtra government and Shiv Sena. She has claimed that Kangana has tarnished the image of the party by indirectly targeting Shiv Sena through a Sheroshire and doing injustice to a woman.

News English Title: Shivsena MLA Pratap Sarnaik slams BJP leaders after Kangana Ranaut Mumbai Exit Marathi News LIVE latest updates.

हॅशटॅग्स

#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x