22 January 2025 5:58 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | नोकरदारांनो बँक FD विसरा, 'या' म्युच्युअल फंड योजना 31 टक्केपर्यंत परतावा देत पैशाने पैसा वाढवतील Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, स्टॉक BUY करावा का - NSE: TATASTEEL Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप कंपनीच्या नफ्यात घट, तरीही ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: TATATECH Penny Stocks | प्राईस 88 पैसे, एका वडापावच्या किंमतीत 20 शेअर्स खरेदी करा, यापूर्वी 633% परतावा दिला - Penny Stocks 2025 Apollo Micro Systems Share Price | डिफेन्स कंपनी शेअरने 1 महिन्यात 53% परतावा दिला, खरेदीची संधी सोडू नका - NSE: APOLLO Infosys Share Price | आयटी स्टॉक इन्फोसिसवर टॉप ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस मोठा परतावा देणार - NSE: INFY Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल कंपनीबाबत मोठी अपडेट, शेअर मालामाल करणार - NSE: JIOFIN
x

कंगनाला ९ तारखेला येऊ द्या | एअरपोर्टवर शिवसेना स्टाईलमध्ये समाचार घेतला जाईल

Shivsena, Kangana Ranaut, MP Sanjay Raut, Marathi News ABP Maza

मुंबई, ५ सप्टेंबर : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतशी व्यक्तिगत भांडण नाही आहे. तिनं मुंबईची तुलना थेट पाकव्याप्त काश्मीरशी (POK) केली आहे. महाराष्ट्रचा, मुंबईचा अपमान करणारा कोणी असेल, मुंबईला पाकिस्तान म्हणण्याचा कृत्य हे अत्यंत गंभीर आहे. कंगनाला 9 तारखेला येऊ द्या, एअरपोर्टवर तिचं शिवसेना स्टाईलमध्ये समाचार घेतला जाईल, असा थेट इशारा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिला आहे.

शिवसेना खासदार यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितलं की, शिवरायांच्या महाराष्ट्रावर एखादी व्यक्ती अशा प्रकारे घाणेरड्या शब्दात टिप्पणी करत असेल तर हा एक पक्षाचा विषय नाही. 11 कोटी जनतेचा विषय आहे. कंगनाला मराठी समजत का? तिनं स्वतःचा ट्विटर हँडल स्वतः हँडल करावा. कोणत्या राजकीय पक्षाच्या आयटी टीमला द्यायची काय गरज आहे, असंही राऊत यावेळी म्हणाले.

“मी काल भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांच्या भूमिकेचे वाचन केले. भाजपा नेते आशिष शेलार यांनी म्हटले की कंगना राणौतने मुंबईला अक्कल शिकवायची गरज नाही. आशिष शेलार यांनी हे अधिक आक्रमकपणे बोलले पाहिजे, हा महाराष्ट्र त्यांचा सुद्धा आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे एका पक्षाचे नाही, एका जातीचे नाहीत तर देशाचे आणि महाराष्ट्राचे आहेत. अशा शिवरायांच्या महाराष्ट्रावर एखादी व्यक्ती अशा प्रकारे घाणेरड्या शब्दांत टिप्पण्णी करत असेल तर विषय एका राजकीय पक्षाचा नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचा आहे, ” असे संजय राऊत म्हणाले.

याचबरोबर, मराठी वाचता येतं का? मुंबईत १०-१५ वर्षे राहतात आपण मराठी शिकलात का? म्हणून स्वत:चे ट्विटर हँडल स्वत:च वापरायचे, दुसऱ्यांना द्यायचे नसते. राजकीय पक्षांच्या आयटी टीमला देऊ नये म्हणून असे घोळ होतात, असा टोलाही संजय राऊत यांनी कंगना रानौतला लगावला आहे.

 

News English Summary: Whoever insults Maharashtra, Mumbai, the act of calling Mumbai Pakistan is very serious. Let Kangana come on the 9th, she will be reported at the airport in Shiv Sena style, Shiv Sena MP Sanjay Raut has given a direct warning.

News English Title: Shivsena warning to Kangana Ranaut she come on ninth at Mumbai what did MP Sanjay Raut say Marathi News LIVE latest updates.

हॅशटॅग्स

Bollywood(88)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x