21 December 2024 6:49 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: NTPCGREEN IPO Watch | आला रे आला IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, मजबूत कमाईची संधी - IPO GMP Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल सहित हे 4 शेअर्स मालामाल करणार, 45% पर्यंत परतावा मिळेल - NSE: JIOFIN Penny Stocks | 4 रुपयाचा पेनी शेअर खरेदीला ऑनलाईन गर्दी, कंपनीबाबत अपडेट, मोठी कमाई होईल - Vikas Lifecare Share Price Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस मोठा परतावा देणार - NSE: TATAMOTORS NBCC Share Price | एनबीसीसी कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर रॉकेट तेजीत परतावा देणार, फायदा घ्या - NSE: NBCC Gold Rate Today | खुशखबर, लग्नाच्या हंगामात आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या
x

प्रसिद्ध पार्श्वगायक एस. पी. बालसुब्रमण्यम यांचं निधन

Singer S P Balasubrahmanyam, Passed Away, Bollywood Singer, Marathi News ABP Maza

नवी दिल्ली, २५ सप्टेंबर : प्रसिद्ध पार्श्वगायक एस. पी. बालसुब्रमण्यम यांचं निधन झालं आहे. वयाच्या ७४ वर्षीय त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दोन आठवड्यांपूर्वी बालासुब्रमण्यम यांनी करोनावर मात केली होती. मात्र त्यानंतर अचानक त्यांची प्रकृती खालावली. त्यामुळे त्यांना लाइफ सपोर्टवर ठेवण्यात आलं होतं. परंतु, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली आहे. बालसुब्रमण्यम यांच्या निधनामुळे कलाविश्वावर शोककळा पसरली असून अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

त्यांच्या आजारपणाबद्दल समजल्यानंतर सोशल मीडियावर त्यांच्या तब्येतीसाठी प्रार्थना करण्यात आली होती. अनेकांनी त्यांचे फोटो देखील शेअर केले आहेत. देशभरातील अनेक दिग्गजांनी देखील त्यांच्यासाठी प्रार्थना केली होती. मात्र त्यांच्या जाण्याने मनोरंजन विश्वात न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. दाक्षिणात्य सिनेमांतील संगितामध्ये त्यांच्या सिंहाचा वाटा होता. अभिनेता कमल हसन आणि अन्य काही अभिनेत्यांसाठी त्यांनी गाणी गायली होती. गुरुवारी अभिनेता कमल हसन यांनी त्यांच्या या गायक मित्राची हॉस्पीटलमध्ये जाऊन भेट देखील घेतली होती.

काही दिवसांपूर्वीच त्यांची कोरोना चाचणी नेगेटिव्ह आली. त्यांचा मुलगा एसपी चरण यांनीदेखील 19 सप्टेंबरला आपल्या सोशल मीडियावर व्हिडीओ जारी करत आपल्या वडिलांच्या आरोग्याबाबत माहिती दिली होती. माझे वडील आता व्हेंटिलेटरवर आहेत. त्यांचे रिपोर्ट्स आणि इतर पॅरामीटर्सही नॉर्मल आहेत. आता ते पूर्णपणे ठिक आहे. लवकरात लवकरत त्यांना डिस्चार्ज मिळेल अशी आशा आम्हाला आहे. त्यांना कोणतंही संक्रमण नाही. मात्र फुफ्फुस, श्वासोच्छवास आणि शारीरिक शक्ती यामध्ये अजून सुधारणा होण्याची गरज आहे”, असं त्यांनी व्हिडीओतून सांगितलं होतं.

 

News English Summary: Legendary singer SP Balasubrahmanyam, who had been undergoing treatment at a private hospital in Chennai after testing positive for COVID-19 during the first week of August, passed away today after a long battle with the coronavirus. On August 5, SPB, as he was fondly called, announced through a video recording, which he posted on his Facebook page, that he had tested positive for COVID-19, and had gotten admitted in a hospital.

News English Title: Singer S P Balasubrahmanyam Passed Away Marathi News LIVE latest updates.

हॅशटॅग्स

Bollywood(88)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x