22 December 2024 6:14 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Nippon Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, टॉप 5 म्युच्युअल फंड योजना मालामाल करत आहेत, अनेक पटीत पैसा वाढवा Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, शेअर मालामाल करणार - NSE: RELIANCE Ashok Leyland Share Price | बंपर कमाई होणार, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज सहित या 7 शेअर्सवर ब्रोकरेज बुलिश, मिळेल मजबूत परतावा - NSE: TATATECH Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन सहित हे 5 शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत - NSE: SUZLON NHPC Share Price | NHPC सहित या 4 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC SIP Calculator | 12 बाय 12 चा फॉर्म्युला! 1000 रुपयांच्या बचतीतून मिळेल 1 कोटी रुपयांचा परतावा, लक्षात ठेवा
x

कोणता विवेकी माणूस असं बोलतो? प्रतिगामी मूर्खपणाचं वक्तव्य: सोनम कपूर

RSS, Mohan Bhagwat, Sonam kapoor

मुंबई : शिक्षण आणि श्रीमंतीमुळे उद्धटपणा येतो आणि त्यामुळे घटस्फोट होतात असं अजब तर्कट सरसंघचालक मोहन भागवतांनी मांडलंय. घटस्फोटांचं प्रमाण हे सुशिक्षित आणि श्रीमंत कुटुंबात अधिक आहे असं भागवत म्हणालेत. हिंदू समाज व्यवस्थेला पर्याय नाही असा दावा त्यांनी केला. मात्र त्याचवेळी महिला सबलीकरणावर भर देताना महिलांना घरात डांबून ठेवण्याला त्यांनी कडाडून विरोध केला.

महिलांना घराबाहेर पडू न दिल्यामुळे समाजाची दूरवस्था झाली असल्याचा दावा त्यांनी केलाय. २००० वर्षांपूर्वी ही स्थिती नव्हती. महिलांना स्वातंत्र्य होतं. तो आपल्या समाजव्यवस्थेचा सुवर्णकाळ होता असंही भागवत म्हणाले.

२ हजार वर्षांपासून चालत आलेल्या परंपरेचं पालन करत असल्यानंच समाजात अशी परिस्थिती आहे. आपण महिलांना घरांपर्यंत मर्यादित ठेवलं आहे. अशी स्थिती २ हजार वर्षांपूर्वी नव्हती. तो आपल्या समाजाचा सुवर्ण काळ आहे. हिंदू समाजानं सदगुणी आणि संघटित झालं पाहिजे. जेव्हा मी समाजासंदर्भात बोलतो तेव्हा फक्त ते पुरुषांसाठी नसतं. मी हिंदू आहे. मी सर्वच धर्मांच्या पवित्र स्थानांचा सन्मान करतो. परंतु मी आपल्या श्रद्धेच्या स्थानाप्रति कटिबद्ध आहे. मला हे संस्कार माझ्या कुटुंबीयांकडून मिळाले आहेत.

दरम्यान, त्यानंतर ट्विटरच्या माध्यमातून सोनमने मोहन भागवतांवर संताप व्यक्त केला. ‘कोणता विवेकी माणूस असं बोलतो? प्रतिगामी मूर्खपणाचं वक्तव्य’ अशा शब्दात सोनमने राग व्यक्त केला आहे. सोनमच्या ट्वीटला हजारच्या घरात रिट्वीट मिळाले आहेत. कोणी सोनमला पाठिंबा दर्शवला आहे, तर कोणी तिची खिल्लीही उडवली आहे.

मोहन भागवत काय म्हणाले होते?
‘घटस्फोटाची प्रकरणे आजकाल मोठ्या प्रमाणात वाढली आहेत. किरकोळ कारणांवरुन जोडपी भांडतात. सुशिक्षित आणि संपन्न कुटुंबांमध्ये घटस्फोटाची प्रकरणे अधिक आढळतात, कारण शिक्षण आणि संपन्नतेसोबत अहंकारही येतो. त्यामुळे कुटुंबं विभक्त होतात. समाजही विभाजित होतो, कारण समाज हेही एक कुटुंब आहे’, अशी भूमिका मोहन भागवत यांनी मांडल्याचं संघाने जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. सरसंघचालक मोहन भागवत रविवारी संघाच्या कार्यकर्त्यांना अहमदाबादमध्ये संबोधत होते.

 

Web Title: Story Bollywood actress Sonam Kapoor on RSS Chief Mohan Bhagwat statement over divorce ratio in highly educated and rich families.

हॅशटॅग्स

#Mohan Bhagwat(8)#RSS(65)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x