15 January 2025 3:51 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांना दर महिन्याला 20,000 रुपये मिळतील, ही सरकारी योजना ठरेल खूप फायद्याची NBCC Share Price | पीएसयू NBCC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मिळेल मजबूत परतावा - NSE: NBCC IREDA Share Price | मल्टिबॅगर इरेडा शेअर मालामाल करणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली - NSE: IREDA Apollo Micro Systems Share Price | अपोलो मायक्रो सिस्टीम शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: APOLLO Quant Mutual Fund | पगारदारांनो, टॅक्स वाचेल आणि पैसा 3 ते 4 पटीने वाढेल, ही म्युच्युअल फंड योजना मालामाल करेल IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, प्राईस बँड सह डिटेल्स नोट करा, कमाईची संधी सोडू नका 8th Pay Commission | 8'व्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी
x

भाजप नेत्या वसुंधरा राजे सेल्फ आयसोलेशनमध्ये; त्या पार्टीत कणिकाची उपस्थित होती

Bollywood Singer Kanika Kapoor, Corona Crisis, Vasundhara Raje

मुंबई, २० मार्च : बेबी डॉल, चिटियां कलाईया सारखी सुपरहिट गाणी देणारी गायिका कनिका कपूर हिची कोरोना टेस्ट पॉझिटीव्ह आल्यानं एकच खळबळ उडाली आहे. देशभरातील सर्वच सेलिब्रेटी घरी राहण्याची विनंती त्यांच्या चाहत्यांना करत आहे. हॉलिवूडच्या काही कलाकरांना आतापर्यंत कोरोनाची लागण झाली आहे. मात्र बॉलिवूड सेलिब्रेटींमध्ये अधिकृतरित्या कोरोना पॉझिटीव्ह असलेली कनिका कपूर ही पहिलीच सेलिब्रेटी आहे.

या पार्टीमध्ये अनेक बॉलिवूड स्टार्स आणि नामांकित व्यक्ती उपस्थित होत्या. या पार्टीला वसुंधरा राजे आणि त्यांचा मुलगा दुष्यंत हेदेखील उपस्थित होते. त्यामुळे सावधगिरीचा उपाय म्हणून वसंधुरा राजे आणि दुष्यंत सिंह यांनी स्वत:ला इतरांपासून वेगळे करण्याचा निर्णय घेतला. आम्ही योग्य ती काळजी घेत असल्याचे वसुंधरा राजे यांनी सांगितले. त्यामुळे आता या पार्टीला उपस्थित असणाऱ्या इतर लोकांनाही कोरोनाची लागण झाल्याचा संशय बळावला आहे. या पार्टीमध्ये बॉलिवूडचे जवळजवळ १०० सेलिब्रेटी सहभागी झाल्याची माहिती आहे. तसेच अनेक बडे राजकीय नेतेही पार्टीला उपस्थित होते. त्यामुळे आता आरोग्य विभागाकड़ून पार्टीला उपस्थित असणाऱ्या लोकांचा शोध घेतला जात आहे.

लंडनवरुन परतल्यावर माझी तपासणी करण्यात आली होती. मात्र चार दिवसांपूर्वीच माझ्यात कोरोनाची लक्षणं आढळून आली आहेत. मला आणि माझ्या कुटुंबीयांना स्वविलग व्हायला सांगितले आहेत. माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तींच्या चाचण्या करून त्यांच्या आरोग्याची तपासणीही करण्यास सांगितली आहे. मी आता ठिक आहे. प्रत्येकानं आरोग्याची काळजी घ्या असं तिनं म्हटलं आहे.

 

News English Summery:  Former Rajasthan Chief Minister and BJP leader Vasundhara Raje has isolated herself. Bollywood singer Kanika Kapoor’s Corona Test (COVID-19) came out positive recently. Vasundhara Raje had attended a party organized by Bollywood singer Kanika Kapoor a few days ago in Lucknow. Many Bollywood stars and celebrities attended the party. Vasundhara Raje and his son Dushyant were also present at the party. Therefore, as a precautionary measure, Vasundhara Raje and Dushyant Singh decided to separate themselves from others. Vasundhara Raje said that we are taking proper care. Therefore, other people present at this party have also been suspected of having coronary infection. About 100 Bollywood celebrities are reported to have attended the party. Many big political leaders also attended the party. As a result, people attending the party are being sought from the health department.

 

News English Title:  Story Vasundhara Raje and his son go into self quarantined attended party with Bollywood Singer Kanika Kapoor News Latest Updates.

हॅशटॅग्स

#filmy(45)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x