अखेर रियानेच सांगितली त्या औषधाची गोष्ट | चॅटींगमधून वेगळा अर्थ लागला?

मुंबई, २७ ऑगस्ट : सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूला रिया चक्रवर्ती जबाबदार असल्याचा आरोप के. के. सिंह यांनी याआधी केला आहे. त्यांनी पाटण्यातील पोलीस ठाण्यात याप्रकरणी एफआयआर नोंदवला. रिया आणि तिच्या कुटुंबीयांमुळेच सुशांतनं आत्महत्या केली. त्यांनीच सुशांतला आत्महत्या करण्यास भाग पाडलं, असे आरोप सिंह यांनी केले होते. मात्र आता त्यांनी थेट रियानं सुशांतवर विषप्रयोग केल्याचा आरोप केला आहे. रिया बऱ्याच दिवसांपासून माझ्या मुलाला विष देत होती. ती माझ्या मुलाची मारेकरी आहे, असा गंभीर आरोप सिंह यांनी केला आहे.
दरम्यान, सीबीआय तपास करत असल्यापासून सुशांत सिंह राजपूतच्या केसमध्ये रोज नव्याने खुलासे होत आहे. अशातच आता सुशांतची गर्लफ्रेन्ड रिया चक्रवर्ती पहिल्यांदाच समोर आली आहे. रियावर आता ड्रग्ससंबंधी आरोप लावले जाात आहे. तसे पुरावे तिच्या चॅटींगमधून मिळाले आहेत. त्यामुळे या केसमध्ये एक वेगळं वळण आलं आहे.
आजतक सोबत बोलताना रियाने यूरोप ट्रिपच्या आणखी काही गोष्टी सांगितल्या. ती म्हणाली की, यूरोपच्या ट्रिपवर जेव्हा आपण जात होतो, तेव्हा सुशांतने सांगितले होते की, त्याला फ्लाइटमध्ये बसण्याची भीती वाटते. त्यासाठी तो एक औषध घेत होता. ज्याचं नाव मोडाफिनिल आहे. फ्लाइटआधी त्याने ते औषध घेतलं. कारण ते औषध त्याच्याकडे नेहमी राहत होतं.
रिया चक्रवर्ती म्हणाली की, आम्ही पॅरिसमध्ये लॅंड झालो. त्यानंतर तीन दिवस सुशांत रूममधून बाहेर निघाला नाही. कारण जाण्याआधी तो खूप आनंदी होता. त्याला त्याचा वेगळा अंदाज दाखवायचा होता. पण पॅरिसला पोहोचल्यावर तो रूममधून बाहेरच आला नाही. पण स्वित्झर्लॅंड पोहोचलो तर तो आनंदी होता. इटलीला पोहोचलो तेव्हा आमच्या रूममध्ये एक वेगळंच स्ट्रक्चर होतं.
रियाने सांगितले की, रूममध्ये मला भीती वाटत होती. पण सुशांत म्हणाला होता सगळं ठिक आहे. रिया म्हणाली, सुशांत बोलला होता की, इथे काहीतरी आहे. पण मी म्हणाले होते की, हे एक वाईट स्वप्न ठरू शकतं. त्यानंतर सुशांतची हालत बिघडली आणि तो रूममधून बाहेर आलाच नाही. रियाने मुलाखतीत सांगितले की, २०१३ मध्ये त्याच्यासोबत काहीतरी झाले होते. तेव्हा त्याच्यासोबत डिप्रेशनसारखी काही गोष्ट झाली होती. त्यावेळी मानसोपचारतज्ज्ञांना भेटला होता. त्यांचं नाव हरेश शेट्टी आहे. त्यांनीच औषधाबाबत सांगितलं होतं.
News English Summary: Rhea Chakraborty in an exclusive interview with India Today’s Rajdeep Sardesai talked about her October 2019 Europe Trip with Sushant Singh Rajput. The couple went to Europe in October 2019. The actress revealed that it was on that trip that she got to know about Sushant’s mental illness. Rhea claimed that she was not living off Sushant’s money, and that it was the actor who loved living life king-size.
News English Title: Sushant Singh Rajput Case Rhea Chakraborty talks about Sushant and Europe trip News Latest Updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
RVNL Share Price | आज शेअर कोसळला, पण लॉन्ग टर्ममध्ये आहे प्रचंड फायद्याचा, ही असेल टार्गेट प्राईस - NSE: RVNL
-
IRFC Share Price | पीएसयू शेअरने 1 महिन्यात 9.37 टक्के परतावा दिला, ही आहे पुढीची टार्गेट प्राईस - NSE: IRFC
-
BHEL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर लवकरच 240 रुपयांची लेव्हल गाठणार, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BHEL
-
Vodafone Idea Share Price | थेट शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक रेटिंग डाऊनग्रेड, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL
-
Reliance Share Price | 1640 रुपये टार्गेट प्राईस, सध्या 1187 रुपयांवर ट्रेड करतोय, फायद्याची अपडेट आली - NSE: RELIANCE
-
IRB Infra Share Price | शेअर प्राईस 43 रुपये, आयआरबी इन्फ्रा कंपनी शेअरला SELL रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB