SSR Case | या वृत्तवाहिन्यांना २७ ते ३० ॲाक्टोबर दरम्यान जाहीर माफी मागण्याचे आदेश
मुंबई, २४ ऑक्टोबर : सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात आज तक वृत्तवाहिनीला एक लाखाचा दंड ठोठाविण्यात आला आहे. तर झी न्यूज, इंडिया टीव्ही, न्यूज २४ व आज तक (Aak Tak, ZEE News, India TV, News24) या वाहिन्यांना सार्वजनिक माफी मागायचे आदेश न्यूज ब्रॉडकास्टिंग स्टँडर्ड असोसिएशनच्या वतीनं देण्यात आले आहे.
‘आज तक’ या हिंदी वृत्तवाहिनीने चित्रपट अभिनेता सुशांतसिंग राजपूत यांच्या मृत्यूबद्दल असंवेदनशील प्रसारण केले होते. त्याचबरोबर सुशांत सिंह राजपूतचे खोटे ट्विट त्यांच्या वेबसाइट वर दाखल्याचा आरोप करत या वृत्तवाहिनीला प्रसारण करण्यास बंदी घातली पाहिजे, अशी तक्रार चित्रपट निर्माते निलेश नवलखा यांच्या वतीने न्यूज ब्रॉडकास्टिंग स्टँडर्ड अॅथॉरिटी (News Broadcasting Standards Association) व माहिती प्रसारण मंत्रालयाला दि. २० जून २०२० रोजी केली होती.
सुशांतसिंग राजपूत यांच्या मृत्यूविषयी वाहिनीचे विधान असंवेदनशील असल्याचेही व त्याच्या मृत्यूच्या बातमीनंतर लगेच चॅनेलने एक टिकर चालविला ‘तो कसा हिट विकेट आला’ आणि त्याच्या मृतदेहाची छायाचित्रे प्रकाशित केली.
या तक्रारीत असे म्हटले आहे की, चॅनलच्या रिपोर्टरने सुशांतच्या दु:खाच्या प्रसंगी कुटुंबातील सदस्यांवर असंवेदनशील प्रश्नांचा भडीमार केला. एवढेच नाही तर टीआरपीच्या नादात आजतक वाहिनीने सुशांत सिंह राजपूतचे ट्विटरचे स्क्रीनशॉट्स खरे म्हणून वर्णन केले आणि त्यांना अभिनेत्याचे अंतिम ट्विट म्हणून सादर केले व लोकांनी सोशल मीडियावर ते खोटे असल्याचा कांगावा केला म्हणून काही वेळाने ते ट्विट वेबसाइटवरून काढून टाकले.
या तक्रारीवर दिनांक ६ ऑक्टोबर २०२० रोजी न्यूज ब्रॉडकास्टिंग स्टँडर्ड असोसिएशन (News Broadcasting Standards Association) तर्फे अध्यक्ष निवृत्त सुप्रीम कोर्ट जस्टीस ए. के. सिकरी यांनी याबद्दल आज तक वृत्तवाहिनीला ७ दिवसांच्या आत एक लाख रुपयाचा दंड भरण्याचा आदेश दिला होता आणि शुक्रवार दिनांक २३ ॲाक्टोबर रोजी न्यूज ब्रॉडकास्टिंग स्टँडर्ड असोसिएशन (NBSA) ने आज तक, झी न्यूज, इंडिया टिव्ही, न्यूज२४ या वृतवाहिन्यांना २७ ॲाक्टोबर ते ३० ॲाक्टोबरच्या काळात प्राईम टाईम मध्ये सार्वजनिक माफी मागण्याचे आदेश दिले आहेत. याचबरोबर यूट्यूब व इतर व्हिडिओ संकेत स्थळावरून त्वरीत हटविण्याचे आदेश पारित केले आहे.
इलेक्ट्रॉनिक मीडिया विशेष हिंदी आणि इंग्रजी वृतवाहिन्यांनी काही दिवसात भारतात ‘मीडिया ट्रायल’ व द्वेष पसरवण्याचे काम चालवले आहे. याबाबत आम्ही माननीय उच्च न्यायालयात जनहित याचिकासुद्धा दाखल केलेली आहे. त्यावर लवकरच निर्णय होईल, अशी माहिती ‘फॅन्ड्री’, ‘शाळा’ या राष्ट्रीय विजेत्या चित्रपटाचे निर्माते व इंडिया अगेन्स्ट हेट्रेडचे संयोजक निलेश नवलाखा यांनी दिली.
News English Summary: The complaint was filed on October 6, 2020 by the News Broadcasting Standards Association (NBSA). K. Sikri had ordered the news channel to pay a fine of Rs 1 lakh within seven days till today and on Friday, October 23, the News Broadcasting Standards Association (NBSA) directed the news channels Aaj Tak, Zee News, India TV and News 24 to pay a fine from October 27 to October 30. A public apology has been ordered in time. It has also ordered the immediate removal of YouTube and other video sites.
News English Title: Sushant Singh Rajputs death case Aaj Tak was fined and this channels were severely punished News Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- Health Insurance Premium | हेल्थ इंश्योरेंसचा प्रीमियम कमी करायचा असेल तर करा केवळ 'हे' एक काम; मोठी बचत होईल
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, स्टॉक मालामाल करणार, मोठा परतावा मिळणार - NSE: TATAPOWER
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन
- 5 Star Rating Cars | 10 लाखांपेक्षा कमी किंमतीच्या 5 स्टार रेटिंग कार खरेदी करण्याचं स्वप्न पाहत आहात, मग इथे लक्ष द्या
- EPF Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला EPFO ची जास्तीत जास्त किती पेन्शन मिळेल; अर्ली पेन्शन नियम काय सांगतो