24 November 2024 3:54 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Multibagger Stocks | पैशाचा पाऊस पाडतोय हा मल्टिबॅगर शेअर, तब्बल 4300% परतावा दिला, फायद्याची अपडेट - BOM: 543620 IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Sarkari Schemes | गुंतवणुकीसाठी 3 फायद्याच्या सरकारी योजना, सरकार देईल 8.2% पर्यंत परतावा, माहिती जाणून घ्या - Marathi News SBI Online | सरकारी SBI बँकेची जबरदस्त योजना, 50,000 रुपयांची गुंतवणूक देईल 13 लाखांपर्यंत परतावा - Marathi News 8th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर, नव्या वर्षात पगारात 186 टक्क्यांनी वाढ होणार, अपडेट जाणून घ्या Penny Stocks | 10 रुपयाचा शेअर श्रीमंत करणार, 6 महिन्यात 116% परतावा दिला, संधी सोडू नका - BSE: 540259
x

सुशांतच्या मृतदेहाचे घाईत शवविच्छेदन का | डॉक्टरांनी थेट मुंबई पोलिसांकडे बोट दाखवलं?

CBI investigation, Sushant Rajput house

मुंबई, २२ ऑगस्ट : सीबीआयच्या १५ सदस्यांची टीम या प्रकरणावर काम करत असून या टीमचे पाच छोट्या तुकड्या करण्यात आले आहेत. सुशांतसिंह मृत्यूप्रकरणी कूपर हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी सीबीआयकडे काही धक्कादायक खुलासे केल्याची माहिती समोर येत आहे. सुशांतचं पोस्टमॉर्टम करणाऱ्या ५ डॉक्टरांची सीबीआयने चौकशी केली. या डॉक्टरांच्या चौकशीसाठी सीबीआयने काही महत्त्वाचे प्रश्न तयार केले आहे.

कोरोनाचे रिपोर्ट येण्याआधीच सुशांतचं पोस्टमॉर्टम का केलं? असा सवाल सीबीआयने डॉक्टरांना विचारला. मुंबई पोलिसांच्या सांगण्यावरून आम्ही रात्री उशिरा सुशांतचं पोस्टमॉर्टम केल्याचं डॉक्टरांनी सीबीआयला सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सुशांतचे कोरोना रिपोर्ट येईपर्यंत पोस्टमॉर्टमसाठी थांबण्यात का आलं नाही? असा सवाल सीबीआयने विचारला, पण कोणत्याच डॉक्टरांना याचं समाधानकारक उत्तर देता आलं नसल्याचं सूत्रांनी सांगितलं. कोरोना रिपोर्टसाठी पोस्टमॉर्टम थांबवण्याची कोणतीही तरतूद नसल्याचं एका डॉक्टरने सीबीआयला सांगितल्याचीही माहिती आहे.

सीबीआयच्या एका टीमने आज कूपर महापालिका रुग्णालयातील डॉक्टरांचीही सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी चौकशी केली. कूपर रुग्णालयामध्येच सुशांतच्या मृतदेहावर करण्यात आलेल्या शवविच्छेदन करण्यात आल्याने त्याचसंदर्भात ही चौकशी करण्यात आली. या चौकशीदरम्यान डॉक्टरांनी शवविच्छेदनासंदर्भात धक्कादायक खुलासा केल्याचे वृत्त ‘टाइम्स नाऊ’ या वृत्तवाहिनीने दिलं आहे.

सीबीआयने शुक्रवारी चौकशी सुरु केल्यानंतर त्यांना मुंबई पोलिसांकडून सुशांतच्या शवविच्छेदनाचा अहवाल मिळाला. त्यानंतर आज सीबीआयच्या एका टीमने कूपर रुग्णालयात जाऊन डॉक्टरांची चौकशी केली. सुशांतच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करणाऱ्या पाचही डॉक्टरांची चौकशी करण्यात आली आहे. शवविच्छेदनाच्या अहवालामध्ये अनेक चूका असल्याचे सीबीआयच्या टीमच्या निदर्शनास आले आहे.

एवढ्या घाई घाईत सुशांतच्या मृतदेहाचे शवविच्छेदन का करण्यात आलं असा प्रश्न सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी विचारला असता एका डॉक्टरने थेट मुंबई पोलिसांचे नाव घेतले. मुंबई पोलिसांनी आम्हाला लवकरात लवकर शवविच्छेदन करण्यास सांगितलं होतं असा खुलासा या डॉक्टरने केल्याचे टाइम्स नाऊने आपल्या वृत्तात म्हटलं आहे. १४ जून रोजी सुशांत वांद्रे येथील त्याच्या राहत्या घरात पंख्याला लढकलेल्या अवस्थेत आढळून आला. त्याच दिवशी रात्री सुशांतच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करुन दुसऱ्याच दिवशी त्याच्यावर अत्यंसंस्कार करण्यात आले होते.

सुशांतच्या शवविच्छेदनाचा अहवाल समोर येण्याच्या आधीच म्हणजेच १५ जून रोजी रियाने शवगृहात गेल्याची माहिती समोर आली आहे. तिथे ती ४५ मिनिटं थांबली होती. या प्रकरणावरुन आता अनेक प्रश्न विचारले जात आहेत. रुग्णालय प्रशासन आणि मुंबई पोलिसांनी रियाला शवगृहामध्ये जाण्याची परवानगी कशी दिली असा प्रश्न उपस्थित होता. रिया सुशांतच्या कुटुंबातील सदस्य नव्हती. त्यात हे प्रकरण आत्महत्येचे असल्याने रियाला सुशांतचा मृतदेह पाहण्याची आणि तिथपर्यंत जाण्याची परवानगी कोणी आणि का दिली यासंदर्भातील अनेक प्रश्न आता विचारले जात आहेत. सुशांतच्या कुटुंबाच्या वतीने खटला लढणाऱ्या वकीलांनाही रिया शवगृहामध्ये का गेली होती असा प्रश्न उपस्थित केला आहे.

 

News English Summary: In an explosive revelation made by one of the doctors from Cooper hospital, once again questions are being raised on the Mumbai police investigation in Bollywood actor Sushant Singh Rajput’s death case. According to sources, after the CBI quizzed a team of five doctors who performed his post-mortem at Cooper Hospital, some startling revelations have been made. The CBI had prepared a list of crucial questions in place to ask the doctors.

News English Title: The CBI investigation cycle turned around and the team arrived at Sushant Rajput house with these persons News Latest Updates.

हॅशटॅग्स

#SushantSinghRajput(113)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x