सँडलवूड ड्रग्ज प्रकरण | विवेक ओबेरॉयच्या घरी पोलिसांकडून सर्च ऑपरेशन
मुंबई, १५ ऑक्टोबर : ड्रग्ज प्रकरणात आता अभिनेता विवेक ओबेरॉयच्या घरावरही धाड टाकण्यात आली आहे. सँडलवूड ड्रग्ज प्रकरणात (sandalwood drug scandal) विवेकचा मेहुणा आदित्य अल्वाचं (Aditya Alva) नाव आहे. तो सध्या गायब असल्याने आता त्याच्या तपासासाठी बंगलुरू पोलीस मुंबईत आले आहेत आणि त्यांनी विवेक ओबेरॉयच्या घरात तपास सुरू केला आहे.
विवेक ओबेरॉयच्या बायकोचा भाऊ आदित्य अल्वा हा बंगळुरू ड्रग्ज प्रकरणात आरोपी आहे. आदित्य हा कर्नाटकचे माजी मंत्री जीवराज अल्वा यांचा मुलगा आहे. हाय प्रोफाइल पार्टीमधील तो एक लोकप्रिय चेहरा आहे. प्रकरण उघडकीस आल्यापासून आदित्य गायब आहे. त्याच्याविरोधात लूक आऊट नोटीसही जारी करण्यात आली आहे. तो विवेकच्या घरात असल्याची माहिती बंगळुरू पोलिसांना मिळाली. त्यामुळे बंगळुरू पोलीस मुंबईत आले.
काय आहे प्रकरण?
कन्नड फिल्म इंडस्ट्रीत होणारे अमली पदार्थांचे सेवन आणि देवाण-घेवाण याविषयीच्या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या सेंट्रल क्राइम ब्रांचने (सीसीबी) एका व्यक्तीला चित्रपट सृष्टीतील व्यक्तींना ड्रग्ज पुरवल्याच्या आरोपाखाली अटक केली होती. या प्रकरणात कन्नड चित्रपटसृष्टीतील काही नावं समोर आली. सुरुवातीला अभिनेत्री रागिनी द्विवेदीचा मित्र रवीशंकरला अटक करण्यात आली. रवीशंकरने चौकशीदरम्यान रागिनीचं नाव घेतलं. त्यानंतर रागिनीच्याही घरी छापे टाकत तिला अटक करण्यात आली. आता या प्रकरणात आणखी नावं समोर आली आहेत.
News English Summary: Actor Vivek Oberoi’s home in Mumbai was searched by the Bengaluru police today in connection with a drugs case allegedly involving his brother-in-law Aditya Alva. “Aditya Alva is absconding. Vivek Oberoi is his relative and we got some information that Alva is there. So we wanted to check. So a court warrant was obtained and Crime Branch team has gone to his house in Mumbai,” said Sandeep Patil, Joint Commissioner, Bengaluru police.
News English Title: Vivek Oberoi Mumbai House Searched By Police As They Look For His Brother In Law Aditya Alva News updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- 15x15x15 Formula | श्रीमंतीचा राजमार्ग, 15x15x15 हा फॉर्म्युला वयाच्या 40 व्या वर्षी बनवेल करोडपती, फायदा जाणून घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोर असेल तरी सुद्धा मिळेल पर्सनल लोन; आता तुमचे काम रखडणार नाही, कसं समजून घ्या
- BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कंपनीकडून फायद्याची अपडेट - NSE: BEL
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर मालामाल करणार, मिळेल 57 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: RELIANCE
- Quant ELSS Tax Saver Fund | गुंतवणूक 10 हजारांची आणि नफा 3 कोटींचा; या फंडांची योजना करोडपती बनवतेय
- EPFO Passbook | पगारदारांनो, EPF खात्यातून पैसे काढायचे आहेत, पण क्लेम रिजेक्ट होतोय, अर्जापूर्वी ही काळजी घ्या
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATATECH
- EPF Passbook | पगारदारांनो, तुमची कंपनी EPF खात्यात नियमितपणे पैसे जमा करतेय का; असं तपासून घ्या, मोठं नुकसान टाळा
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स स्टॉक टेक्निकल चार्टवर महत्वाचे संकेत, ब्रोकरेजचा महत्वाचा सल्ला - NSE: TATAMOTORS
- Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांना प्रत्येक महिन्याला 20,000 रुपये देईल ही योजना, महिन्याचा खर्च भागेल