खटाटोप सिनेमाचा विषय जाहीर करण्यासाठी | अक्षय प्रमाणे सरकार स्पॉन्सर सिनेमाचा प्रयोग? - सविस्तर वृत्त

मुंबई, 9 सप्टेंबर: अभिनेत्री कंगना मुंबईत दाखल झाली आहे. विमानतळावरुन ती थेट तिच्या घरी पोहोचली आहे. Y प्लस सुरक्षेत कंगना विमानतळावरुन आपल्या खार येथील घरी आली आहे. मुंबई महापालिकेने कंगनाच्या कार्यालयावर कारवाई केली आहे. यावर आता कंगना आक्रमक झाली आहे. कंगनाने थेट आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख करत त्यांना आव्हान दिलं आहे.
कंगना विरुद्ध शिवसेना हा वाद आता शिगेला पोहोचला आहे. येणाऱ्या काळात आता याला वेगळं वळण लागलं आहे. विरोधकांनी देखील शिवसेनेवर टीका केली आहे. कंगना विरुद्ध शिवसेना शाब्दिक युद्ध सुरु असताना मुंबई महापालिकेने कंगनाच्या कार्यालयावर कारवाई केली. कंगनाच्या कार्यालयातील अनधिकृत बांधकाम दाखवत पालिकेने त्यावर हातोडा चालवला. गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेचे नेते कंगनाच्या विरुद्ध आक्रमक होत असताना आता मात्र कंगनावर न बोलण्याचे आदेश मातोश्रीने नेत्यांना दिले आहेत.
यानंतरच्या एका ट्विटमधून कंगनानं थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला. विशेष म्हणजे तिनं मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख केला आहे. ”उद्धव ठाकरे तुला काय वाटतं, तू बॉलिवूड माफियांसोबत मिळून माझं घर उध्वस्त करून मोठा बदला घेतला आहेस? आज माझं घर मोडलं आहे, उद्या तुमचा हा अहंकार मोडून पडेल. वेळ नेहमी एकसारखी नसते. हे करून तुम्ही माझ्यावर खूप उपकार केले.. काश्मीरी पंडितांवर काय संकट आलं असेल हे माहीत होतं, परंतु आज मी ते स्वतः अनुभवलं. आज मी देशाला वचन देते की, मी फक्त अयोध्यावर नाही, तर काश्मीर पंडितांवरही चित्रपट तयार करणार. जय हिंद, जय महाराष्ट्र,” असं कंगनानं ट्विटमध्ये म्हटलं आहे.
#VIDEO – तुमने जो किया अच्छा किया!’ उद्धव ठाकरेंबद्दल काय बोलली पाहा.#KanganaRanaut #MumbaiHome pic.twitter.com/ewAOAlX8Ag
— महाराष्ट्रनामा न्यूज (@MahaNewsConnect) September 9, 2020
काही वर्षांपूर्वी अभिनेता अक्षय कुमारने देखील मोदी सरकारच्या प्रसिद्धीसाठी सरकार स्पॉन्सर सिनेमे बनविल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. सध्याचा कंगनाचा एकूण प्रवास पाहता तिला बॉलीवूडमधील कोणतंही प्रोडक्शन हाऊस सिनेमात संधी देणार नाही. त्यामुळे तिला तिची स्वतःची सिनेमा निर्मिती करावी लागेल, अन्यथा अक्षय कुमार प्रमाणे काही मार्ग स्वीकारावे लागतील. कंगना ही जाहीरपणे मोदी सर्मथक आहे आणि त्यात तिच्यातील कलाकार संपुष्ठात आला असून केवळ राजकीय व्यक्ती शिल्लक राहिली आहे. त्यामुळे रागाने काही सिनेमा निर्मिती करेल, पण त्यात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपने शिवसेनेविरुद्ध बोट ठेवण्याचा प्रयत्न केला जाईल असं तज्ज्ञांना सध्याच्या राजकीय घटनांवरून वाटतं आहे. आजच्या विमान प्रवासात कंगनाला असे बिगबजेट सिनेमाचे विषय अचानक सुचले असं ज्यांना वाटतं असेल त्यांना खरंच राजकारण कळत नाही असंच म्हणावं लागेल.
वारंवार उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख करून त्यांचं राजकीय वजन कमी करणं आणि एका विशिष्ट राजकीय विचारसरणीतून त्यांना लक्ष करणं हाच तिचा अजेंडा असेल असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येतं आहे. राज्यातील भाजप कितीही बोलत असलं तरी महाविकास आघाडी सरकार कोसळणार नाही हे भाजपमधील नेत्यांना देखील माहित आहे. त्यामुळे २०२४ पर्यंत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेला अन्य लोकांच्या मार्गे देशभर बदनाम करत राहणं हाच कंगना रानौत आणि तत्सम समर्थकांचा अजेंडा असेल असं राजकीय तज्ज्ञांशी बोलल्यावर समजलं.
News English Summary: The dispute between Kangana and Shiv Sena has now reached Shige. In the time to come, it has taken a different turn. Opposition has also criticized Shiv Sena. While the Shiv Sena was waging a war of words against Kangana, the Mumbai Municipal Corporation took action against Kangana’s office. Showing the unauthorized construction of Kangana’s office, the corporation used a hammer on it.
News English Title: Will make movie on Kashmiri Pandit Kangana Ranaut makes announcement Marathi News LIVE latest updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर 71 रुपयांची टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक रेटिंग अपडेट, फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर 5 टक्क्यांनी घसरला, घसरणीचे वादळ येणार की पुन्हा तेजी येणार – NSE: RVNL
-
BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स डिफेन्स शेअर फोकसमध्ये, पुढे तेजी की मंदी येणार – NSE: BEL
-
Tata Steel Share Price | 131 रुपयांचा टाटा स्टील शेअर 190 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक आजही तेजीत – NSE: TATASTEEL
-
NHPC Share Price | पीएसयू एनएचपीसी शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, फायद्याचे संकेत - NSE: NHPC
-
Post Office GDS Recruitment | महाराष्ट्र सहित ग्रामीण टपाल सेवेक पदाच्या 21,413 जागांसाठी भरती, महिना 29,380 रुपये पगार
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्समध्ये सातत्याने घसरण सुरू, गुंतवणूकदार संभ्रमात – NSE: RELIANCE
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरबाबत तज्ज्ञांकडून मोठे संकेत, टॉप ब्रोकरेज बुलिश - NSE: RELIANCE
-
Zomato Share Price | मजबूत कमाईचे संकेत, 214 रुपयांचा झोमॅटो शेअर 400 रुपयांची पातळी गाठणार – NSE: ZOMATO
-
Post Office Scheme | मुद्दलापेक्षा जास्त व्याज मिळणार या पोस्ट ऑफिस योजनेत, 20 लाख रुपयांपेक्षा जास्त व्याज मिळेल