महत्वाच्या बातम्या
-
VIDEO | इंस्टाग्रामवर व्हिडिओ टाकण्यासाठी मॉडेल श्रेया कालराचा रोडवर डान्स | नंतर माफी
सवंग लोकप्रियतेसाठी भर रस्त्यात डान्स करत व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी शुक्रवारी संध्याकाळी मॉडेल श्रेया कालरा हिनं डीएसपी उमाकांत चौधरी यांची भेट घेतली आणि घडलेल्या घटनेबाबत माफीनामा सादर केला. व्हिडिओ करण्यामागचा उद्देश वेगळाच होता पण तो चुकीच्या पद्धतीनं सोशल मीडियात व्हायरल झाला असं तिनं आपल्या जबाबात म्हटलं आहे. याशिवाय वाहतूक विभागासोबत काम करुन वाहतुकीच्या नियमांबाबत जगजागृतीचं काम करण्याचीही तयारी तिनं दाखवली आहे.
3 वर्षांपूर्वी -
VIDEO | फडणवीस म्हणालेले 'मी पुन्हा येईन' आणि भाजपाची सत्ता गेली | आता योगी म्हणाले 'मी पुन्हा येईन'
उत्तर प्रदेशच्या राजकारणात गेल्या 35 वर्षांत कुठलाही मुख्यमंत्री दुसऱ्यांदा निवडून आला नाही? असा प्रश्न मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना विचारण्यात आला होता. त्यावर, उत्तर देताना योगींनी मै आऊंगा ना म्हणत मी पुन्हा येईन… असेच म्हटले आहे.
3 वर्षांपूर्वी -
VIDEO | BCCI सचिव जय शहा इंग्लिश बोलू लागले आणि समाज माध्यमांवर हास्यकल्लोळ
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे सुपुत्र जय शहा वडिलांचं राजकीय वजन वापरून थेट BCCI सचिव तर झाले, परंतु तिथला इंग्लिशचा वापर त्यांची सार्वजनिकरित्या कोंडी करत असल्याचं पाहायला मिळतंय.
3 वर्षांपूर्वी -
VIDEO | Jan Ashirwad Yatra | भाजपच्या वरिष्ठ नेत्याला जनआशीर्वाद यात्रेतून धक्के मारून बाहेर काढले
केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळालेल्या भाजपच्या नेत्यांनी जनआशीर्वाद यात्रा काढण्यास सुरुवात केली आहे. एकाबाजूला महाराष्ट्रातील चार मंत्र्यांनी यात्रेस प्रारंभ केला आहे. मोदींच्या मंत्रिमंडळात नागरी उड्डाण मंत्री असलेल्या ज्योतिरादित्य शिंदे यांनीदेखील जनआशीर्वाद यात्रेस सुरुवात केली. त्यात सहभागी होण्यासाठी गेलेले पक्षाचे वरिष्ठ नेते गोविंद मालू यांना धक्के मारून बाहेर काढण्यात आलं. पोलिसांनी मालू यांना धक्काबुक्की केली आणि त्यांना यात्रेत सहभागी होऊ दिलं नाही.
3 वर्षांपूर्वी -
VIDEO | हॉलिवूड सिनेमाप्रमाणे थरार | अफगाणी नागरिकांचा धावत्या विमानात प्रवेशासाठी प्रयत्न
तालिबानने अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यानंतर लोक कुठल्याही परिस्थितीत देश सोडण्याचा प्रयत्न करत आहेत. अशात तीन जणांचा हाच प्रयत्न त्यांच्या जीवावर बेतला. तालिबानच्या भीतीने देश सोडण्याच्या नादात हे तिघे अमेरिकेच्या लष्करी विमानातील चाकामध्ये लपले होते. चाकाच्या जागेत लपून आपण देश सोडता येईल असे त्यांना वाटत होते. पण, त्यापैकीच तीन जण विमान हजारो फुट हवेत असताना घसरून पडले. काहींच्या मते, हे लोक विमानावर बसून आणि लटकून प्रवास करण्याच्या नादात होते.
3 वर्षांपूर्वी -
VIDEO | तालिबानच्या प्रचंड दहशतीमुळे नागरिकांचे विमानाच्या खिडकीतून प्रवेश
तालिबानने अफगाणिस्तानच्या राजधानीवरच नव्हे, तर राष्ट्रपती भवनावर सुद्धा ताबा मिळवला आहे. आता हेच तालिबानी सरकार स्थापनेच्या हालचाली करत आहेत. राष्ट्राध्यक्ष अशरफ गनी आणि उपराष्ट्राध्यक्ष अमीरुल्लाह सालेह देश देश सोडून पसार झाले. परिस्थिती दिवसेंदिवस बिघडत असल्याने लोक लाखोंच्या संख्येने पलायन करत आहेत. तर विमानतळावर अशी हजारोंची गर्दी पाहायला मिळत आहे.
3 वर्षांपूर्वी -
VIDEO | स्वातंत्र्य दिनी अनिवासी भारतीयांची लंडनच्या ब्रीजवरुन मोदींच्या राजीनाम्याची मागणी
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इकडे स्वातंत्र्य दिनाचे सेलिब्रेशन केले असता, तिकडे लंडनमध्ये अनिवासी भारतीयांनी मोदींच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. यासंदर्भात घोषणाबाजी करत, बॅनरबाजीही करण्यात आली आहे.
3 वर्षांपूर्वी -
प्रवासात रोज लसीकरण प्रमाणपत्रं दाखवा | डोक्याला शॉट, त्याने पांढऱ्या टी-शर्टवर प्रमाणपत्रं प्रिंट केलं
देशात आणि राज्यांमध्ये अजून तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे. अनेक राज्यांमधील परिस्थिती तशी नियंत्रणात आहे. तसेच अनेक राज्यांनी निर्बंध शिथिल केले आहेत. मात्र बऱ्याच ठिकाणी प्रवासासाठी लसीकरणाची अट ठेवण्यात आली आहे. रेल्वे, बस ते हवाई मार्गानं प्रवास करताना विमानतळावर प्रवाशांची लसीकरण प्रमाणपत्रं तपासली जात आहेत. रोजरोज ते करण्याचा प्रवाशांना देखील कंटाळा आल्याचं पाहायला मिळतंय. परंतु, त्यावर एक भन्नाट कल्पना एन व्यक्तीने पुढे आणली आहे.
3 वर्षांपूर्वी -
VIDEO | श्याम रंगीलाकडून मोदींच्या आवाजात नीरज चोप्राला शुभेच्छा | तो शेवटचा प्रश्न आणि हसू आवरेना
टोकियो ऑलिम्पिकमध्ये पुरुष भालाफेकीमध्ये नीरज चोप्राने सुवर्णपदक पटकावल्यानंतर त्याच्यावर देशभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. दिग्गज खेळाडूंपासून ते मोठ्या राजकीय व्यक्तींपर्यंत सर्वजण नीरजची वाहवा करत आहेत. या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध कॉमेडियन श्याम रंगीलाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाजात मजेदार पद्धतीने नीरजला शुभेच्छा दिल्या आहेत. श्याम रंगीलाने दिलेल्या शुभेच्छांचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
3 वर्षांपूर्वी -
VIDEO | नारळाचं झाड ऑटो रिक्षा पडलं | देव तारी त्याला कोण मारी | या व्हिडिओत त्याचीच प्रचिती
पालघरच्या विरार भागातील या घटनेचा व्हिडिओही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. येथे ग्राहकाची वाट पाहत असलेल्या एका रिक्षावर एक मोठे नारळाचे झाड पडले, पण ऑटोमध्ये बसलेल्या चालकाला काहीच झाले नाही. ऑटो चालक पालघरच्या विसावा रिसॉर्टमध्ये एका ग्राहकाला घेण्यासाठी आला होता. जिथे ड्रायव्हरने ऑटो उभी केली तिथेच एक मोठे नारळाचे झाड होते.
3 वर्षांपूर्वी -
VIDEO | व्हिडिओ नीट बघा, त्या न्यायाधीशांचा अपघात नव्हे तर हत्या | काय चाललंय देशात?
धनबाद येथील जिल्हा तसेच सत्र न्यायालयाचे न्यायाधीश उत्तम आनंद हे बुधवारी सकाळी वॉकसाठी गेले होते. त्यावेळेस रणधीर वर्मा चौक येथे एका रिक्षाने त्यांना धडक दिली. या धडकेनंतर आनंद हे बराच वेळ रक्ताच्या थारोळ्यात रस्त्याच्या कडेला पडून होते. रस्त्यावरुन जाणाऱ्या एका व्यक्तीने त्यांना रुग्णालयामध्ये दाखल केलं. मात्र तिथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या सर्व अपघाताचा घटनाक्रम सीसीटीव्हीमध्ये केदा झालाय.
3 वर्षांपूर्वी -
VIDEO | मित्राची मोटारसायकल वाचविण्याच्या नादात तरुण नदीच्या जोरदार प्रवाहात वाहून गेला
विदर्भातही पावसाची संततधार सुरूच असून अनेक नद्यांनी पाण्याची पातळी ओलांडली आहे. तर, गावातील ओढे, बंधारे पाण्याने भरल्याचं दिसून येत आहे. अशा परिस्थितीतही जीव धोक्यात घालून नागरिक पूल ओलांडण्याचा प्रयत्न करत आहेत.
3 वर्षांपूर्वी -
VIDEO | रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या हिरकणीवाडीत दरड कोसळली
रायगडमध्ये दरडी कोसळण्याची मालिका सुरुच आहे. रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी हिरकणीवाडीत दरड कोसळली आहे. हे गाव डोंगराळ भागात आहे. इथे सतत पाऊस होत आहे. दरड कोसळली असली तरी सध्या तरी घरांना नुकसान झालं नाही. मात्र हिरकणीवाडीतील नागरिक भयभीत झाले आहेत. पाचाड गावाजवळ ही हिरकणीवाडी आहे. हिरकणीवाडीतील नागरिकांना पाचाड गावात हलवलं जात आहे.
3 वर्षांपूर्वी -
VIDEO | मुंबईतील गजबजलेल्या भररस्त्यात वकिलावर तलवार आणि हत्यारांनी सपासप वार
जवळपास आठ ते दहा जणांच्या टोळक्याने बोरिवलीत भररस्त्यात एका वकिलावर तलवारीने जीवघेणा हल्ला केल्याची थरारक घटना घडली आहे. आरोपी भररस्त्यात वकिलावर तलवारीने सपासप वार करून पळ काढतानाच व्हिडीओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला आहे. याप्रकरणी एमएचबी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तीन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. अन्य आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.
3 वर्षांपूर्वी -
VIDEO | आपल्याकडे काही चालतं | इकडे बघा तरुण विनामास्कचा रेल्वेमध्ये चढला आणि महिलांनी...
जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव असल्यामुळे अत्यंत खबरदारी घेतली जात आहे. कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणूम मास्क लावणे तसेच सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचे आवाहन केले जात आहे. मात्र, आपल्या भोवती असे काही लोक असतात, ज्यांना कितीही सांगितलं तरी ते कोरोना नियम पाळायला तयार नसतात. सध्या नियमांची पायमल्ली करणाऱ्या अशाच एका तरुणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये मास्क न लावणाऱ्या तरुणाला महिलांनी चांगलाच धडा शिकवला आहे.
3 वर्षांपूर्वी -
VIDEO | कळवा स्टेशनजवळचा रस्ता पाण्याखाली गेल्याने महिलांना रस्ता चाचपडताना प्रचंड त्रास
कल्याण डोंबिवलीत गेल्या 24 तासात 177 मिली मीटर पाऊस पडला आहे. ही अतिवृष्टी आहे. पावसामुळे सखल भागात पाणी साचले आहे. काही झोपडपट्टी परिसरातही पाणी साचले. नागरीकांची सोय केली जात आहे. रात्री नऊ वाजता 2.5 मीटरची भरती आहे. त्याचा परिणाम होणार आहे.
3 वर्षांपूर्वी -
VIDEO | मुंबई पंतनगर पोलीस वसाहतीत पाणी | पोलिसांच्या पोरांचे प्रशासनाला शब्दविरहित टोमणे
शनिवारी दुपार पासून सुरु झालेल्या पावसाने मुंबईत कहर केलाय. थोडीशी उसंत घेऊन पाऊस पुन्हा जोरदार बरसतोय. मुंबईला पावसाने अक्षरशः झोडपून काढलंय. मुंबईत पडत असलेल्या या बेभान पावसाने मागील 24 तासांत 33 जणांचे प्राण गेले आहेत.
3 वर्षांपूर्वी -
VIDEO | श्रीवर्धन-दिघी मार्गावर भूस्खलन | थरारक दृश्य कॅमेऱ्यात कैद
मुसळधार पावसाने कोकणसह रायगडला झोडपून काढलं आहे. रायगड जिल्ह्यातील नद्या दुथडी भरुन वाहत आहेत. ओढे, नद्या-नाल्यांनी पात्रं सोडली आहेत. बाळगंगा नदी, पटलगांगा नदी, भोगावती नदी, दादरखाडी ओवरफ्लो झाल्या आहेत. या नदींचे पाणी घराघरात घुसलं आहे. पेण तालुक्यातील रावे आणि साई गाव इथे पूरसदृश्य परिस्थिती आहे. माथेरानमध्ये जोरदार पाऊस कोसळत असून इथे दोन तासांपासून वीजपुरवठा बंद आहे. पनवेल, पेण या भागाला पावसाने झोडपलं आहे.
3 वर्षांपूर्वी -
VIDEO | ठाण्यातील तलाव पाळी ओव्हरफ्लो | शेजारील रस्ते पाण्याखाली
मुंबईसह उपनगरात जोरदार पाऊस बरसत आहे. दक्षिण मुंबईत पावसाचा जेव्हढा जोर आहे, तेव्हढाच किंबहुना त्यापेक्षा अधिक पाऊस उपनगरातही पाहायला मिळत आहे. दुसरीकडे ठाण्यासह कल्याण डोंबिवलीत गेल्या 24 तासात 177 मिली मीटर पाऊस पडला आहे.
3 वर्षांपूर्वी -
VIDEO | Delhi Rain | मुसळधार पावसामुळे राजधानी दिल्लीतील रस्त्यांना नदीचं स्वरूप
मुंबईला पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. यामुळे मुंबईतील अनेक सखल भागात पाणी साचले आहे. तर काही ठिकाणी वाहतूक कोंडी झाली आहे. मुंबईत रात्रभर कोसळणाऱ्या पावसामुळे तीन दुर्घटना समोर आल्या आहेत. एकाबाजूला नवी मुंबईतील खारघरमधील हे पर्यटक आहेत. रविवारी सुट्टीच्या दिवशी हे सर्व पर्यटक खारघरच्या डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या धबधब्यावर पर्यटकासाठी गेले होते. मात्र पावसामुळे डोंगरातून वाहणाऱ्या ओढ्याला पूर आला होता.
3 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Hair Style | कोणाचीही मदत न घेता साडी आणि सलवार कुर्त्यावर करा स्वतःची हेअर स्टाईल ; सणासुदीच्या दिवसांत मदत होईल
- Diwali Special Ubtan | दिवाळीच्या दिवसांत दररोज करा अभ्यंगस्नान; घरच्या घरी बनवा सुगंधित उटणे, चेहऱ्यावर येईल सुंदर चमक
- Salman Khan | सलमान खानला पुन्हा जिवे मारण्याची धमकी, मुंबई पोलिसांना 2 कोटींच्या मागणीचा आला मेसेज - Marathi News
- Diwali 2024 | आपण दिवाळी सण साजरा करतो, परंतु दिवाळीच्या या 4 दिवसांचे महत्व माहित आहे का, जाणून घ्या संपूर्ण माहिती
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: TATATECH
- Ather E Scooter | यंदाची दिवाळी एथर EV स्कूटरने खास बनवा, फीचर्स ऐकून चकित व्हाल आणि लगेच खरेदी करा - Marathi News
- Surabhi Jyoti Wedding | टेलिव्हिजन स्टार सुरभी ज्योती अडकली लग्न बंधनात, निसर्गरम्य वातावरणात थाटामाटात पार पडायला लग्नसोहळा
- Smart Investment | लय भारी, केवळ 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा फायदा, मॅच्युरिटीला मोठी रक्कम मिळेल
- Lakshmi Pujan | लक्ष्मीपूजनाच्या दिवशी या चूका टाळा; जीवनात भरभराट येईल, सोबतच काही गोष्टी काटेकोरपणे पाळा
- Apollo Micro Systems Share Price | डिफेन्स शेअरमध्ये तेजीत संकेत, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, कमाईची संधी - NSE: APOLLO