13 November 2024 1:03 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
BHEL Share Price | BHEL शेअर फोकसमध्ये, कंपनीबाबत अपडेट आली, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: BHEL Penny Stocks | पैशाचा पाऊस पाडतोय 11 रुपयाचा शेअर, 5 दिवसात दिला 84% परतावा, रोज अप्पर सर्किट - Penny Stocks 2024 Yes Bank Share Price | येस बँक शेअर 20 रुपयांच्या खाली घसरला, स्टॉक टेक्निकल चार्टवर मोठे संकेत - NSE: YESBANK Vodafone Idea Share Price | व्होडाफोन-आयडिया कंपनीबाबत मोठी अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA PPO Number Online | तुमच्याकडे PPO नंबर आहे का, अन्यथा तुम्हाला पेन्शन मिळणार नाही, असा जाणून घ्या - Marathi News Salary Account Facility | खूप कमी पगारदारांना माहित नाही, सॅलरी अकाउंटवर मिळतात 'या' जबरदस्त मोफत सुविधा, लक्षात ठेवा IRB Infra Share Price | IRB इन्फ्रा शेअर फोकसमध्ये, स्टॉक प्राईस घसरतेय, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: IRB
x

कोलकाता येथील भाजप कार्यालयाजवळ 51 क्रूड बॉम्ब आढळले | पोलिसांकडून बॉम्ब हस्तगत

51 crud bombs

कोलकत्ता, ०६ जून | पश्चिम बंगालची राजधानी कोलकातामधून 51 क्रूड बॉम्ब म्हणजेच देशी बॉम्ब जप्त करण्यात आले आहेत. हे बॉम्ब खिदिरपूर चौकाजवळ एका प्लास्टिकच्या बॅगमध्ये सापडले. याबाबत माहिती मिळताच बॉम्ब स्कॉड घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, जिथे बॉम्ब आढळले, ती जागा भाजप कार्यालयाच्या जवळच आहे. हे बॉम्ब ताब्यात घेऊन पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मिल्ट्री इंटेलिजेंसकडून मिळालेल्या इनपुटच्या आधारे कोलकाता पोलिसांच्या अँटी राउडी सेक्शनने हे बॉम्ब हस्तगत केले आहेत.

दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या घोषणेनंतर 17 फेब्रुवारीला ममता बॅनर्जींच्या सरकारमधील राज्यमंत्री जाकिर हुसैन यांच्यावर बॉम्ब हल्ला करण्यात आला होता. त्याते गंभीर जखमी झाले होते. तो हल्ला रात्री 9:45 वाजता मुर्शिदाबाद जिल्ह्यातील निमतिता रेल्वे स्टेशनजवळ झाला होता. हल्लेखोरांनी एकानंतर एक असे अनेक बॉम्ब हुसैन यांच्या दिशने फेकले होते. त्या घटनेत 22 जण जखमी झाले होते. गृह मंत्रालयाने त्या हल्ल्याचा तपास एनआयला सोपवला होता.

हॅशटॅग्स

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x