9 November 2024 2:04 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IRB Infra Share Price | आयआरबी इन्फ्रा शेअर रॉकेट तेजीने देणार परतावा, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IRB Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन शेअर 60 रुपयांच्या जवळ आला, तज्ज्ञांकडून सकारात्मक तेजीचे संकेत - NSE: SUZLON Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक 8 रुपयांच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा रेटिंग अपडेट, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IDEA Yes Bank Share Price | येस बँकबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा का - NSE: YESBANK IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लागेल लॉटरी, प्राईस बँड फक्त 20 ते 24 रुपये, संधी सोडू नका - GMP IPO HAL Share Price | रॉकेट स्पीडने होणार कमाई, डिफेन्स शेअर करणार मालामाल, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग - NSE: HAL SJVN Share Price | SJVN शेअर चार्टवर तेजीचे संकेत, स्टॉक रेटिंग अपडेट, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SJVN
x

VIDEO | तालिबानच्या प्रचंड दहशतीमुळे नागरिकांचे विमानाच्या खिडकीतून प्रवेश

Taliban in Afghanistan

काबुल, १६ ऑगस्ट | तालिबानने अफगाणिस्तानच्या राजधानीवरच नव्हे, तर राष्ट्रपती भवनावर सुद्धा ताबा मिळवला आहे. आता हेच तालिबानी सरकार स्थापनेच्या हालचाली करत आहेत. राष्ट्राध्यक्ष अशरफ गनी आणि उपराष्ट्राध्यक्ष अमीरुल्लाह सालेह देश देश सोडून पसार झाले. परिस्थिती दिवसेंदिवस बिघडत असल्याने लोक लाखोंच्या संख्येने पलायन करत आहेत. तर विमानतळावर अशी हजारोंची गर्दी पाहायला मिळत आहे.

अफगाणिस्तानच्या विमानतळावर सध्या इतकी गर्दी पाहायला मिळते जणू ते विमानतळ नसून बस स्टँड आहे. आपल्या जीवासमोर सामानाची काय चिंता. आपले सर्वस्व सोडून हजारोंच्या संख्येने लोक विमानतळ गाठत आहेत. जिथे जागा मिळेल तिथे बसावे असे चित्र आहे. राजधानीत लोकांना आपले मोबाईल रिचार्ज सुद्धा करता येत नाही. तर काही लोक आपले कॉल बॅलेन्स आणि इंटरनेट जीवन मरणाच्या परिस्थितीसाठी राखून ठेवत आहेत.

विमानात खिडकीतून प्रवेश:
तालिबानच्या दहशतीमुळे भेदरलेले नागरिक काही करून देश सोडत आहेत. त्यासाठी आपल्या प्रियजनांना थेट विमानात खिडकीतून वर खेचत आहेत. हे चित्र सध्या जगभरातील माध्यमांमध्ये प्रसिद्ध होतं आहे. त्यामुळे तालिबानमध्ये परिस्थिती किती भीषण झाली आहे त्याचा अंदाज येऊ शकतो.

विमानावर बसून प्रवास आणि उड्डाणानंतर खाली कोसळले:
विशेष म्हणजे तालिबानाच्या सत्तेत राहण्याची मानसिकता नसलेले नागरिक मिळेल त्या मार्गानं देश सोडताना दिसत आहेत. काबूल विमानतळावर अफगाण नागरिकांची प्रचंड गर्दी झाल्याचं समोर आलं होतं. अफगाणिस्तानच्या नागरिकांची धडपड व्हिडीओमधून स्पष्ट दिसतेय. अफगाणिस्तान सोडण्यासाठी काबूल विमानतळावरुन उड्डाण घेणाऱ्या विमानाच्या चाकाला लटकलेल्या दोघांचा उंचावरुन पडून मृत्यू झाल्याचं कळतंय. तर, काही नागरिक विमानाच्या पंख्यावर बसून जीवघेणा प्रवास करताना दिसत असल्याचं दिसतंय.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Afghanistan after Taliban ruling Airplane entry from window news updates.

हॅशटॅग्स

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x