9 November 2024 7:26 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IRB Infra Share Price | आयआरबी इन्फ्रा शेअर रॉकेट तेजीने देणार परतावा, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IRB Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन शेअर 60 रुपयांच्या जवळ आला, तज्ज्ञांकडून सकारात्मक तेजीचे संकेत - NSE: SUZLON Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक 8 रुपयांच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा रेटिंग अपडेट, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IDEA Yes Bank Share Price | येस बँकबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा का - NSE: YESBANK IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लागेल लॉटरी, प्राईस बँड फक्त 20 ते 24 रुपये, संधी सोडू नका - GMP IPO HAL Share Price | रॉकेट स्पीडने होणार कमाई, डिफेन्स शेअर करणार मालामाल, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग - NSE: HAL SJVN Share Price | SJVN शेअर चार्टवर तेजीचे संकेत, स्टॉक रेटिंग अपडेट, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SJVN
x

मुंबईतील वांद्रे परिसरात इमारतीचा भाग कोसळला | एकाचा मृत्यू,७ जण जखमी

Mumbai Bandra

मुंबई, ०७ जून | मुंबईतील वांद्रे परिसरात एका इमारतीचा भाग कोसळला आहे. यात एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. तर सात जण जखमी झाले असून जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील वांद्रे परिसरात बेहराम पाडा परिसरात चार मजली रझाक चाळ आहे. काल (रविवारी 6 जून) रात्री 2 च्या सुमारास या 4 मजली इमारतीच्या स्लॅबचा काही भाग कोसळला. या दुर्घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तर सात जण जखमी झाले आहेत. सध्या जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

सद्यस्थितीत घटनास्थळी रेस्क्यू ऑपरेशन सुरु आहे. या ठिकाणी सध्या अग्निशमन दलाचे जवान, स्थानिक पोलीस उपस्थित आहेत. या अपघातानंतर अग्निशमन दलाचे जवान ढिगारा हटवण्याचे काम करत आहेत. ढिगाऱ्याखाली कोणी अडकलेले नाही ना याची खातरजमा केली जात आहे. जिथे घराचा भाग कोसळला ती जागा अतिशय चिंचोळी आहे. दुर्घटना घडली त्यावेळी मुंबईत जोरदार पाऊसही बरसत होता. परिणामी अग्निशमन दलाच्या जवानांना ढिगारा हटवण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत होता.

हॅशटॅग्स

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x