9 November 2024 7:02 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IRB Infra Share Price | आयआरबी इन्फ्रा शेअर रॉकेट तेजीने देणार परतावा, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IRB Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन शेअर 60 रुपयांच्या जवळ आला, तज्ज्ञांकडून सकारात्मक तेजीचे संकेत - NSE: SUZLON Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक 8 रुपयांच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा रेटिंग अपडेट, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IDEA Yes Bank Share Price | येस बँकबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा का - NSE: YESBANK IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लागेल लॉटरी, प्राईस बँड फक्त 20 ते 24 रुपये, संधी सोडू नका - GMP IPO HAL Share Price | रॉकेट स्पीडने होणार कमाई, डिफेन्स शेअर करणार मालामाल, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग - NSE: HAL SJVN Share Price | SJVN शेअर चार्टवर तेजीचे संकेत, स्टॉक रेटिंग अपडेट, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SJVN
x

रेशन दुकानावर धान्य आणायला गेलेल्या महिलेकडे शरीरसुखाची मागणी | महिलेचे आमरण उपोषण

demand for sex

औरंगाबाद, २१ जून | धान्य आणण्यासाठी राशन दुकानावर गेली असता तेथील राशन चालकाने महिलेला शरीरसुखाची मागणी करत दोन वेळेस विनयभंग करण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. यानंतर पुरवठा विभागीय आयुक्त कार्यालय औरंगाबाद या ठिकाणी महिलेने आमरण उपोषणाला सोमवारी सुरुवात केली असून जिल्हा पुरवठा अधिकारी यांना न्याय मिळून द्यावा अशी मागणी केली आहे.

याबद्दल सविस्तर वृत्त असे की, अलकनंदा रामप्रसाद केंधळे (वय 35) केंधळे पोखरी, ता.मंठा, जि. जालना असे आंदोलनकर्त्या महिलेचे नाव आहे. गावातच गोविंदराव केंधळे यांचे राशन दु. नं.-171 आहे. सदर महिला या दुकानात राशन आणण्यासाठी गेले असता त्यांना राशन दिले नाही. तसेच दोन वेळा विनयभंगाचा प्रयत्न केला असल्याची माहिती अलकनंदा यांनी हॅलो महाराष्ट्राशी बोलताना दिली आहे.

कोरोनासारख्या काळात राशन न मिळाल्यामुळे महिलेवर आणि त्यांच्या परिवाराला उपाशी राहण्याची वेळ आली असल्याचे त्यांनी सांगितले.सदर घटनेबाबत महिलेने न्याय मिळवून द्यावा आणि स्वस्त धान्य दुकानाची चौकशी करून दुकानचालकाला निलंबीत करण्यात यावे, अशी मागणी महिलेने केली आहे. नाहीतर न्याय मिळेपर्यंत अमरण उपोषण चालू ठेवणार असल्याची माहिती दिली.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की पोहचावा.

News Title:

हॅशटॅग्स

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x