13 November 2024 1:01 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
BHEL Share Price | BHEL शेअर फोकसमध्ये, कंपनीबाबत अपडेट आली, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: BHEL Penny Stocks | पैशाचा पाऊस पाडतोय 11 रुपयाचा शेअर, 5 दिवसात दिला 84% परतावा, रोज अप्पर सर्किट - Penny Stocks 2024 Yes Bank Share Price | येस बँक शेअर 20 रुपयांच्या खाली घसरला, स्टॉक टेक्निकल चार्टवर मोठे संकेत - NSE: YESBANK Vodafone Idea Share Price | व्होडाफोन-आयडिया कंपनीबाबत मोठी अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA PPO Number Online | तुमच्याकडे PPO नंबर आहे का, अन्यथा तुम्हाला पेन्शन मिळणार नाही, असा जाणून घ्या - Marathi News Salary Account Facility | खूप कमी पगारदारांना माहित नाही, सॅलरी अकाउंटवर मिळतात 'या' जबरदस्त मोफत सुविधा, लक्षात ठेवा IRB Infra Share Price | IRB इन्फ्रा शेअर फोकसमध्ये, स्टॉक प्राईस घसरतेय, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: IRB
x

त्यांना कामधंदा नाही म्हणून रोज ती एकच गोष्ट उकरून काढत आहेत - अजित पवार

Deputy Chief minister Ajit Pawar

मुंबई, ०६ जून | अजित पवार यांच्यासोबत सत्ता स्थापन करणं ही चूक होती, अशी कबुली विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. त्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही अजितदादांना सत्ता स्थापन करता येते, पण टिकवता येत नाही, असं सांगत निशाणा साधला. त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पलटवार केला आहे. विरोधकांना काही कामधंदा नाही. त्यामुळे ते ती गोष्ट उकरून काढत आहेत, अशी टीका अजित पवार यांनी केली आहे.

अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी पहाटेच्या शपथविधी सोहळ्यावरून विरोधकांवर टीकास्त्र सोडलं. त्या गोष्टीला आता 14 महिने झाले आहेत. तरीही मागची गोष्ट उकरून काढत आहेत. ज्यांना काही काम नाही ते लोकं या गोष्टीवर बोलत आहेत, असा टोला लगावतानाच आज आनंदाचे वातावरण आहे. त्याकडे लक्ष द्या, असं पवार म्हणाले.

माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी बॉम्बची भाषा केली होती. त्यावरूनही त्यांनी नरेंद्र पाटलांवर टीका केली. काही लोक भावनेच्या आहारी जाऊन काहीही बोलतात. कायदा आणि संविधान काही बघत नाहीत. अशा स्टेटमेंट झाल्याने बातम्या उचलून धरल्या जातात. ही लोकं एकेकाळी आमच्याबरोबर होती. त्यांचा अवाका आम्हाला माहीत आहे. शरद पवारही या लोकांना ओळखून आहेत. आम्हीच त्यांना आमदार केलं होतं. त्यामुळे त्यांना महत्त्व द्यायचं नाही, असं ते म्हणाले.

हॅशटॅग्स

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x